खांदेरीचा रणसंग्राम भाग ५
खांदेरीचा रणसंग्राम भाग ५ – खांदेरी वर मालकी दाखवणारे इंग्रज बेट ताब्यात येण्यासाठी शेकडो प्रयत्न करत होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी लहान आरमाराचे सामर्थ्य इंग्रज विसरत होते . खरं तर या भूमीवर यांचा अधिकार तो काय?. हि भूमी इथल्या स्थानिक लोकांची पण तरीही व्यवसायास आलेले हे इंग्रज आपल सामर्थ्य वाढवण्याच्या तयारीत होते. पण इथल्या लोकांच्या मनातील स्वराज्याची निष्टा कदाचित इंग्रजांना ठाऊक नव्हती म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत खांदेरी बेट ताब्यात घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न इंग्रज करताना दिसून येतात. याच काळात विल्यम मिन्चीन आपल्या मुंबईतल्या अधिकाऱ्यांना दिनांक २६ सप्टेंबर रोजी पत्र लिहून सांगतो.(खांदेरीचा रणसंग्राम भाग ५)
Yours of the 25th I received the 26th. I am very sorry about that worship is so misinformed of boats of coming of to the Island when there has not been a boate come off to them ever since the other Shibarr came , neither can any stirr to it without coming in the very mouthes of us , which this impossible for them to escape us. Tusday last there was two small boates that had layn in the bay and were making off to sea to make their escape into the shore. Our shibarrs chased them. But they being small boates were to light a foote for them , and she chased them both ashores and killed one man dead upon the sand, there was two more fell downe whither they were wounded I cannot tell , the men coming so thick downe out of the woods beat our men off.
I have received but one of the Dutchmen on board that your worship ordered. Our gunner , the bearer hereof , is come very sick on shoare to seek recovery of his health. Serjant Nash likewise is very ill, and if he doth not mend within a day or two must be forced to Come ashore likewise. Sir , our ship now lyes so neare that we can heare them call out to their centinells to have a care ; and further we are daily in expectation of seeing Sevagy fleet come in upon in me, then I shall be imbayed and may be glad to know which way to gett out againe, for noe wind but a southerly wind will carry me cleare againe ; which is your Worships gennerall orderes to have a care of inbaying myselfe that Sevagys fleete comes not upon me unawares , and now I lye in a condition to Make resistance to defend the Shibarrs till I gett them off to me.
आपले २५चे पत्र मिळाले. शत्रूची एकही होडी आलेली नसताना अनेक होड्या आल्याची गैरखबर कोणी दिल्याबद्दल खेद होतो. गेल्या मंगळवारी त्यांच्या दोन होड्यांचा आमच्या शिबाडाने पाठलाग केला. परंतु त्या हलक्या असल्यामुळे आमच्या तावडीतून निसटल्या. लगेच एक लहान बोट पाठलागास आम्ही पाठिवली. तिने त्या दोन्ही होड्यांचा किनाऱ्यापर्यंत पाठलाग केला आणि त्यांच्याकडील एका व्यक्तीस ठार केले व दोघांना खाली पाडले. इतक्यात रानातून भराभर माणसे बाहेर येऊन त्यांनी आमच्या लोकांना पळवून लाविले. हल्ली आमचे काही लोक आजारी पडले आहेत. आम्ही बेटापासून इतके जवळ आहोत कि, त्यांच्या गस्तीचा आवाज आम्हाला सहज ऐकू येतो. शिवाजीचे आरमार आज येईल उद्या येईल अशी अपेक्षा आम्ही धरून आहोत. त्यांच्या तोफा मारून काढण्याकरिता जर कदाचित मी आखातात शिरलोच तर शिवाजीच्या आरमाराकडून आम्ही कोंडले जाऊ आणि कदाचित आम्हास बाहेर पडण्याची नंतर संधीच मिळणार नाही. म्हणून आता सध्या आमच्या शिबाडांचे रक्षण करणे हि माझी प्राथमिक जबाबदारी समजून मी उभा राहिलो आहे.
बेटावर रोज मोठ्या प्रमाणात बांधकाम चालूच होते. मराठे अधूनमधून इंग्रज बोटींवर हल्ले करत होतेच. इंग्रजांचा अधिकारी मीचिंग यानंतर बेटाच्या जवळ जाऊन थांबला त्या. तो इतक्या जवळ थांबला होता कि बेटावरील लोकांनी खबरदार राहण्याकरता दिलेल्या आरोळ्या त्याला ऐकू येत होत्या. शिवाजी महाराजांचे आरमार येण्याची अपेक्षा आम्ही धरून आहोत. त्यांच्या तोफां नष्ट करायच्या असतील तर मला आखातात शिरले पाहिजे. पण मी इथे असताना जर शिवाजी महाराजांचे आरमार चालून आले तर मी कोणत्या मार्गाने बाहेर पडायचे हा प्रश निर्माण झाला आहे. कारण दक्षिणेकडून येणारा वाराच मला बाहेर काढू शकेल.
इकडे इंग्रज युध्याच्या तयारीत असतानाच मराठ्यांचे आरमार दौलतखानाच्या अधिपत्याखाली येणार अशी बातमी इंग्रजाना लागली होती. मुंबई कौंसिल ला हि खबर लागली आणि त्यांनी नौकांच्या देखभालीकरिता व डागडुजीकरिता ताबडतोब पार्ट यावे असा हुकूम त्यांनी २९ सप्टेंबर १६७९ ला दिला. डागडुजी चालू असतानाच सार्जंट फुलर याच्या अधिपत्याखाली एक छोटा मचवा , सैनिकांच्या दोन फाईलींसह खांदेरी व मुख्य भूमी यांच्या दरम्यान दिवस गस्त घालणार होता. संध्याकाळी मुंबईच्या आखातात परत येणार होता आणि सकाळी पुन्हा गस्त सुरु करणार होता.
खांदेरी वर बांधकाम थांबवण्याचे प्रयत्न इंग्रज पावलोपावली करत होतेच. या जागेचा अधिकार प्राप्त करून घेण्या करता इंग्रज सर्वोत्तम प्रयत्न करत होते. पण शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि मायनाक आणि दौलतखान यांच आरमारी योजना या इंग्रजांच्या मध्ये येत होत्या. कॅप्टन विलियम मिंचिन, रिचर्ड केग्वीन, जॉन ब्रॅंडबरी, फ्रान्सिस थॉर्प या नाविक अधिकाऱ्यांना खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांचे सुरु होते. रिवेंज नावाची फ्रीगेड खांदेरीच्या त्या बेटाजवळ गस्त घालत होतीच.
या सगळ्या गोष्टीचा विचार करायला गेलो तर सागराची भरती-ओहोटी, खोल-उथळ पाणी, मतलय वारे, इत्यादींचे स्थानिक ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा अधिक होते म्हणूनच इंग्रजांना जो विजय सहज वाटत होता तो दिवसेंदिवस कठीण वाटू लागत होता. ह्या सगळ्यांवर कड म्हणून आता मराठी सैन्य जमिनीवर कारवाईसाठी तयारीला लागले होते. या सगळ्या युद्धात हाती काही यश लागत नव्हतेच उलट इंग्रजांचा खर्चच वाढत चालला होता.
क्रमशः खांदेरीचा रणसंग्राम भाग ५
संदर्भग्रंथ : शिवछत्रपतींचे आरमार
English Records
छत्रपती शिवाजी महाराज ( उत्तरार्ध )
माहिती साभार – स्वराज्याचे वैभव