महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,591

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १७ | फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन

By Discover Maharashtra Views: 2587 6 Min Read
चित्रकार प्रकाश तांबटकर, ललितकला भवन, खिरोदा

फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन | खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १७ –

फैजपूर काँग्रेसचे आगळेपण अनेक बाबींमध्ये आढळते, महाराष्ट्रात लोकजागृती करण्यासाठी ऑलिंपिक ज्योती सारखी ज्योती घेऊन या काँग्रेसच्या जन्म स्थानापासून स्वयंसेवकांनी धावत जाऊन,  फैजपूरच्या टिळक नगरला पहिल्या झेंडावंदनाच्या वेळी पोहोचवली. मुंबई ते फैजपूर   या मार्गावर लोकांनी ज्योतीचे उत्साहाने स्वागत केले. अखेरच्या टप्प्यात साने गुरुजींनी ज्योत स्वीकारली. व २६ डिसेंबरला  शंकरराव देवांच्या हाती सुपूर्त केली आणि नंतर जवाहरलाल  नेहरूजींनी स्वीकारून दीप प्रज्वलित केला.(फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन – खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १७)

शिवाय अहमदनगर मधील किसान कार्यकर्त्यांनी देवळाली पासून फैजपुर पर्यंत पदयात्रा काढली. ग्रामीण भागातील काँग्रेसने प्रभावित होऊन आखिल किसान परिषदेचे सचिव स्वामी सहजानंद यांनी तर बिहार प्रांतातून किसान यांचा पदयात्रा मोर्चा फैजपूरला आणला. गरीब पिडीत शेतकरी जागृत व्हावा व आपल्या हक्कासाठी त्याने सरकारला आपली संघशक्ती दाखवावी, यासाठी वाटेत ठिकाणी सभा घेतल्या.  किसान परिषदेची बैठक प्रा.एन.जी.रंगा यांच्या नेतृत्वाखाली झाली.

गांधीजींच्या प्रेरणेनेनुसार अधिवेशनाला जोडून उत्कृष्ट एखादी व ग्रामोद्योग प्रदर्शन भरवण्यात आले. अखिल भारतीय चरखा संघ व अखिल भारतीय ग्रामोद्योग संघाने आयोजित केलेल्या प्रदर्शनास गांधीजींचे खास मार्गदर्शन लाभले. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी सांगितले की यापुढे प्रत्येक कॉंग्रेस अधिवेशन खेडे गावातच भरवण्यात यावे. अधिवेशनासाठी लागणारी सर्व सामुग्री स्थानिकरीत्या गोळा केलेली होती. फैजपूरच्या या सोहळ्यात आदर्श खेडे व लहान सुसंवादी  नगर यांचे मिश्रण असल्याचा गांधीजींनी निर्वाळा दिला. शांतिनिकेतन येथील श्रेष्ठ कलाकार नंदलाल बोस  यांनी केलेले सुशोभिकरण व मुंबईचे वास्तु रचनाकार रामदास गुलाटी यांनी केलेले नियोजन, यामुळे या सोहळ्यास विशेष शोभा आली.

लखनऊ प्रमाणेच फैजपूरलाही अधिवेशनात महायुद्धाचा संभाव्य धोका, वर्ल्ड पीस काँग्रेस पुढील प्रश्न, नागरी स्वातंत्र्यापासून भारतीयांना वंचित ठेवल्याचा विषाद, इत्यादी विषयावर गंभीर चर्चा झाली. रोमाँ रोलंडच्या  आमंत्रणावरून कॉंग्रेसचा प्रतिनिधी ब्रुसेल्सच्या वर्ल्ड पीस काँग्रेसमध्ये गेला होता, सप्टेंबर १९३६ मध्ये. साम्राज्यशाही कडून गरीब देशांचे शोषण थांबवल्या खेरीज जागतिक शांतता टिकणार नाही हा ब्रुसेल्सच्या काँग्रेसचा निष्कर्ष होता. त्याचा फैजपूरला सखोल विचार होऊन साम्राज्यवाद यांच्या संभाव्य युद्ध प्रयत्नांना कोणत्याही प्रकारचे सहाय्य न करण्याचा निर्धार झाला. त्याची प्रचिती १९३८ मध्ये आली. मात्र  फैजपूरला  घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये समावेश होता तो प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका, घटना समिती, काँग्रेसचा जाहीरनामा, कृषी विषयक कार्यक्रम, निवडून आल्यावर सभासदांचे भरवायचे अधिवेशन, ब्रिटिश साम्राज्याच्या राज्यारोहण सोहळ्यावर बहिष्कार आणि एक एप्रिल १९३६ संकल्पित देशव्यापी हरताळ यांचा. या शेवटच्या निर्णयाचा हेतू होता, १९३६ च्या कायद्यानुसार इंग्रजांनी देऊ केलेल्या राज्य घटनेचा धिक्कार करणे. इंग्रजांनी देऊ केलेल्या राज्यघटनेने भारताच्या संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. या  मागणीची इंग्रजांनी देऊ केलेल्या राज्यघटनेने भारताच्या संपूर्ण स्वराज्याची प्रतारणा केली होती. किंबहुना त्यामुळे भारतीय संघराज्याच्या वर ब्रिटिशांची पकड अधिक पक्की होऊन भारताला स्वातंत्र्य प्राप्ती पासून वंचित ठेवल्यास मोठी मदत झाली असती. म्हणून १९३५ च्या कायद्यातील  कायद्यातील फक्त प्रांतिक स्वायत्ततेचा भाग स्वीकारून संघराज्य याबाबतच्या तरतुदी काँग्रेसचे झिडकारल्या आणि त्याविरुद्ध राष्ट्रव्यापी मोहीम हाती घेण्याचे ठरवले. भारताला आपली राज्यघटना स्वतः करावयाची असून लोकनियुक्त प्रतिनिधी यांनी तयार केलेली राज्यघटना हवी होती. खरी लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तयार केलेल्या संविधानानुसारच भारतीय जनतेकडे अ सत्तांतर  व्हावयास हवे, त्यात परकीय हस्तक्षेप नको अशी काँग्रेसने ठाम भूमिका घेतली. घटना समिती बाबतच्या या ठरावास केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय महत्त्व होते.

कृषी विकासाचा कार्यक्रम –

हा खूप महत्त्वाचा होता, खंड व जमीन महसुलात परिस्थितीनुसार कपात, अल्पभूधारकांना सूट, शेतीवरील आयकर,  पाट बंधाऱ्यावरील शुल्कात कपात, वेठबिगारीस आळा, प्रत्‍यक्ष कसणार्यांना जमिनीची मालकी, सहकारी शेती,  ग्रामीण कर्जबाजारीतून शेतकऱ्यांना सुटका,  शेतकऱ्यांना संरक्षण, शेतमजुरांना मजुरी बाबत कायदेशीर संरक्षण, किसानांच्या   संघटना यामधील बऱ्याच बाबी १९३७ च्या काँग्रेस जाहीरनाम्याततच अंतर्भूत करून टाकल्या. फैजपूर  काँग्रेसच्या २१ ठरावापैकी ऐतिहासिक महत्त्वाच्या निर्णयांचा संमत झालेला  मसुदा तयार करण्यात आला.

फैजपूरपुर काँग्रेसच्या अधिवेशनामुळे  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जनतेशी संवाद आणि संपर्क वाढला.  या अधिवेशनामुळे मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. पूर्व खानदेशात काँग्रेसचे संख्याबळ वाढून दहा हजार सभासद नोंदवण्यात आले.तर  महाराष्ट्रात त्या वेळी काँग्रेसचे ४५ हजार सभासद नोंदवले गेले. त्याचे संभाव्य परिणाम सरकारच्या लगेच लक्षात आले. त्यामुळे या प्रसारामुळे राष्ट्रीय क्रांतीस पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता सरकारच्या लक्षात आली, म्हणून सभाबंदी, झेंडावंदन यावर बंधने, काही पुढाऱ्यांना ठराविक प्रांतात प्रवेश बंदी यासारखे उपाय सरकारने हाती घेतले. याचा प्रत्यय लगेचच आला, खान अब्दुल गफार खान यांना वायव्य प्रांतात प्रवेश बंदी करणारा  आदेश पूर्व खानदेशच्या पोलीस जिल्हा अधिक्षक यांनी  गफार खान यांच्या हातात फैजपूरलाच दिला.

आपल्या स्वतःच्या प्रांतात प्रवेश करण्याच्या नैसर्गिक अधिकाऱ्याला खान अब्दुल गफार यांच्यासारख्या गांधीवादी नेत्यास प्रांतिक निवडणुकांच्या पूर्वसंध्येलाच अटकाव  करणे हे सरकारच्या सूड बुद्धीचे द्योतक होते.

दुसरा महत्त्वाचा परिणाम फैजपूर अधिवेशनामुळे झाला तो म्हणजे काँग्रेसचा  पुढच्या निवडणुकांचा ही प्रचार झाला. अपेक्षेप्रमाणे धनाजी नाना प्रांतिक विधिमंडळावर प्रचंड बहुमताने निवडून आले. काँग्रेसचे दुसरे उमेदवार राजमल लखीचंद हे यशस्वी झाले . मात्र तिसरे र. बा. वाडेकर अयशस्वी होऊन व्ही.एन.. पाटील हे विरोधी पक्षाचे उमेदवार निवडून आले. लोकशाही स्वराज्य पक्ष आतील हरीभाऊ पाटसकर काँग्रेसमध्ये १९३७ मध्ये आले व प्रांतिक विधिमंडळावर निवडून आले. काँग्रेसने निर्माण झालेल्या उत्साहवर्धक वातावरणातून खिरोदा आश्रमाचे जनता शिक्षण मंडळात रूपांतर झाले आणि जिल्ह्यातील युवक व शेतकरीवर्ग काँग्रेसच्या भावी आंदोलनासाठी तयार झाला.

माहिती संकलन  –

संदर्भ: महाराष्ट्र राज्य गॅझेटियर जळगाव जिल्हा १९९४

Leave a Comment