खंडोबा मंदिर, कसबा पेठ –
कसबा पेठेमध्ये गुंडाच्या गणपती जवळ एक फारसे प्रसिद्ध नसलेले खंडोबा मंदिर आहे. मंदिर सुमारे २०० ते २५० वर्षे जुने दगडी बांधणीचे आहे. पूर्वी मंदिरासमोर वाडा होता त्यामुळे मंदिर सहज लक्षात येत नसे. वाडा पडल्यामुळे मंदिरासमोर मोकळी जागा उपलब्ध झाली.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर खालच्या बाजूला कीर्तिमुख कोरलेले आहे. मंदिरामध्ये काळ्या पाषाणाच्या मूर्ती आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरामध्ये खंडोबाबरोबर म्हाळसा आणि बानू या दोघींच्या मूर्ती आहेत. बानुबाईने एक कोकरू उचलून कमरेवर घेतलेलं आहे. खंडोबाच्या वरच्या एका हातात शंख तर दुसर्या हातात त्रिशूल आणि डमरू आहे. तर खालच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हाताने म्हाळसाला पकडले आहे. खाली जेजुरीसारखी पंचलिंग आहेत.
संदर्भ: मंदार लवाटे
पत्ता : https://goo.gl/maps/LqDVWMGkx2mtW92S9
आठवणी इतिहासाच्या
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल