महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,11,272

खटाव भुईकोट

Views: 3937
2 Min Read

खटाव भुईकोट…

सातारा जिल्ह्यातील खटाव या तालुक्याच्या गावी एक भुईकोट किल्ला होता. सद्यस्थितीत खटाव भुईकोट अखेरच्या घटका मोजत आहे. थोडेफार तटबंदीचे अवशेष आहेत आणि काही वाडे आहेत. त्यातल्या  पण काही वाड्यांची पडझड झाली आहे. खटाव ही ऐतिहासिक नगरी सातारापासून ४५ कि.मी अंतरावर आहे. खटाव मध्ये यादव कालीन हेमाड पंथी मंदिरे आहेत. खटाव गावी छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेल्याची नोंद आहे.गाव पूर्वी लष्करी ठाणे असल्याने येेथे लढाया होत.नेताजी पालकर यांची खटाव मध्ये लढाई झाल्याची नोंद आहे.गावात रणखांब आहे येथे लढाया होत असे.तसेच मुघल सैन्याचे देखील हे लष्करी ठाणे होते. तेराव्या शतकात येथील रामोशी लोकांनी बहामनी सरदाराविरुद्ध लढाई केल्याचा उल्लेख आहे.

कृष्णराव खटावकर हे खटावचे रहिवासी होते आणि मराठी साम्राज्यांत धुमाकूळ घालणारे म्हणून प्रख्यात होते. यांचे पूर्वज निजामशाहींत बाराहळ्ळी येथें रहात होते. गावचे पाटील त्यांची होते. कृष्णरावांच्या वडिलांचें नांव मंबाजी. त्यांनां दोन मुले होती राघोजी व कृष्णराव.दिल्लीकर मुघलांनी कृष्णराव यास खटावची ठाणेदारी दिली. कृष्णराव हे फार शूर होते त्यांनीं खटाव येथील कोटांतील मशीद पाडली व दत्ताचें मंदिर बांधलें. या मंदिरांत त्यांची पुस्तकशाळा होती. ते विद्वान् होते. त्यांनी १२ लेखक पदरीं बाळगले होते. ते स्वतः न्याय व व्याकरण यांत पारंगत होते. यांचें कुलदैवत खंडोबा. त्यांनीं जेजूरींचें देऊळ बांधिलें. हल्लींचे खंडोबांचें जें मुख्य देऊळ ते यांच्या हातचें असून भोंवतालचा परिसर होळकरांनी बांधलेला आहे. चंपाषष्ठीच्या दिवशीं पहिला नैवेद्य यांच्याकडील असतो.

शाहु महाराज दक्षिणेंत उतरले व सातार्‍यास येऊन गादीवर बसले त्यावेळीं कृष्णराव हे महाराणी ताराबाईंच्या बाजूस होते. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हे मुघलांना मिळाले होते व त्यांच्या आश्रयानें मराठी साम्राज्यांत लुटालूट करीत असत.असे करत इ.स.१७०८ मध्ये माणदेशाचा परिसर आपल्या वर्चस्वाखाली आणला. मुघलांनी यांना राजा हा किताब दिला होता. बुध व मलवडीच्या घाटग्यांचे देशमुखी उत्पन्न यांनीं दाबले. मुघलांनी खटाव परगणा यांनां जहागीर दिला. स्वराज्याविरुद्ध यांनीं मुघलांना पुष्कळ वर्षे मदत केली. मुळापासून हे बंडखोरच. पुढे शाहू महाराजांनीं बाळाजी विश्वनाथ व श्रीपतराव प्रतिनिधी यांना त्यांच्यावर धाडले. या युद्धात कृष्णराव शौर्यानें लढले. परंतु अखेरीस ते व त्यांचा जेष्ठ पुत्र हे दोघे लढाईंत धारातीर्थी पडले.त्यांचे दुसरे दोन पुत्र महाराजांस शरण आले. तेव्हां त्यांना क्षमा करून त्यांना स्वराज्यात सामावून घेतले व ते एकनिष्ठ राहिले.

टीम- पुढची मोहीम

1 Comment