खोलेश्वर महादेव मंदिर, वांबोरी, ता. राहुरी –
अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरी येथे वाल्मिकींनी वाम तीर्थावर रामायण लिहिल्याची आख्यायिका आहे. गर्भगिरीच्या डोंगररांगातून मांजरसुंबा आणि रामेश्वर यांच्या बरोबर मधून वांबोरी घाटातून खाली उतरले की वांबोरी गावात जाऊन पोहोचतो, अहमदनगर शहरापासून गावाचे अंतर २५ किमी असून गावात गेल्यानंतर निजामशाही राजवटीच्या पाऊलखुणा जपणारा ‘मांजरसुंबागड’ आपले लक्ष वेधून घेतो.खोलेश्वर महादेव मंदिर.
याच वांबोरी गावात खोलेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. या मूळच्या प्राचीन मंदिराला रंगरंगोटी करून कळस पुन्हा नव्याने बांधन्यात आला आहे. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून पश्चिमेला देखील प्रवेशद्वार आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना असून गर्भगृहात शिवलिंग आहे. गर्भगृहाची द्वारशाखा सुंदर शिल्पांनी शिल्पांकीत असून रंगरंगोटी जरी केलेली असली तरी मूळ सौंदर्य कुठेही कमी झालेले नाही. मंदिरा समोर नंदी विराजमान असून मंदिराच्या परिसरात काही विरगळींचे अवशेष देखील आपल्याला पहायला मिळतात.
Rohan Gadekar