महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,802

सरदार कृष्णाजी गायकवाड

By Discover Maharashtra Views: 3838 3 Min Read

सरदार कृष्णाजी गायकवाड…

सन १६४० मध्ये बंगळूर मुक्कामी झालेल्या शिवरायांचा प्रथम विवाहानंतर,शिवराय उभयंतास घेऊन,शहाजीराजे आपल्या लवाजम्यासहित विजापुरास गेले.तेथील मुक्कामात एके दिवशी शिवराय आपल्या अंगरक्षकासह शहरात फिरत असताना भर रस्त्यात एक कसाई गाय कपात असताना त्यांना दिसला.तो गोवध होताना पाहून अकरावर्षीय शिवरायांच्या नेत्रांत अंगावर उसळला आणि त्यांनी आपल्या अंगरक्षकास तो गोवध थांबवण्याची आज्ञा दिली.शिवरायांच्या आदनेवरून शिवरायांचा शरीररक्षक कृष्णाजीम्ह्याच्या कमरेची समशेर म्यानातून उसळली आणि ती नागवी समशेर उगारून कृष्णाजी त्या खाटीकावर धावला.कृष्णाजीने आर्त हंबरडा फोडत असलेल्या त्या गायीच्या मानेवर पडणारा,सुर घेतलेल्या त्या कासयाचा हात,समशेरीच्या एकाच वारानिशी खांद्यापासून वेगळा केला.रस्त्यावर थोडा गलबला झाला.पण शहाजीराजांच्या पुत्र हे जाणून विजापूर शहर कोतवालाने माघार घेतली.सरदार कृष्णाजी गायकवाड.


त्याच सायंकाळी दिवेलागणीच्या सुमारास विजापूरमधील वास्तव्याच्या महालात जिजाऊसाहेबांना हा प्रसंग कळला कि, शिवरायांचे आज्ञेवरून कृष्णाजी ह्याने गायीचा कैवार केला.भर मजाललसीस आऊसाहेब म्हणाल्या कि,कृष्णाजी “गायकैवारी” झाला.ह्यापुढे त्यास गायकैवारी आडनावे संबोधणे.कृष्णाजी “गायकैवारी”उपनाव पावला.गायकैवारी च बोलीभाषेत “गायकवाडी “तसेच गायकवाड आडनाव मराठा कुळात रूढ झाले.शिवराय महाराष्ट्र देशी आल्यावर कृष्णाजी गायकैवारी-गायकवाड किल्ले राजगडवरील;दिवाण-ए-आम चा द्वारपाल म्हणजे बांकी झाला

शिवरायांची पत्नी राणीसाहेब सकवारबाई यांचे बंधू सरदार कृष्णाजी बंकी गायकवाड , कवी पारामंद यांच्या परमानंद काव्यात शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून जी नावे आहेत त्यामध्ये कृष्णाजी बांकी गायकवाड हे अग्रभागी होते
अफजल खान चालून आला त्यावेळी माणकोजी दहातोंडे , सुभानजी इंगळे ,जिवाजी देवकाते पिलाजी बेलदरे व संताजी बोबडे हे सरदार भेटायला गेले सोबत कृष्णाजी गायकवाड होते.

शिवाजी राजांनी विचारले कि बेत कसा आखावा तेव्हा सरदार कृष्णाजी गायकवाड बोलले “आतून बारीक चिलखती झगा घाला बाहेरून मुसेजरी वापरा डाव्या हातात बिचवा आणि उजवीकडे छुपी वाग नखे पंजात लपवा कारण खान कापटी आहे दगाबाज आहे …….” आणि झाले तसेच झाले खानाने कपाट केले महाराजांवर वार केला महाराजांनी खानच्या पोटात बिचवा फेकला वाघ नखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला . महाराज जिंकले पण त्याच्या मागे गनिमी कावा होता तो सरदार कृष्णाजी बांकी गायकवाड यांचा हे इतिहास विसरला ……। पण शिवराय विसरले नव्हते म्हणून अफजल खानच्या वधाच्या नंतर शिवाजी राजांच्या राजदरबारात अज्ञान दासाकडून पोवाडा सादर झाला त्यामधल्या ओळी

राजा विचारी भल्या लोकांला । “कैसें जावें भेटायाला” ॥
बंककर कृष्णाजी बोलला । “शिवबा सील करा अंगाला” ॥
भगवंताची सील ज्याला—-। आंतून, (तो) बारिक झगा ल्याला ॥
मुसेजरीच्या सुरवारा । सरजा (जें) बंद सोडुन दिला ॥
डावे हातीं बिचवा त्याला (ल्याला) । वाघनख सरज्याच्या पंजाला ।
पटा जिव म्हाल्याप दिला । सरजा बंद सोडुन चालिला ॥२४॥

2 Comments