महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,447

क्रांतीकारी लहूजी वस्ताद साळवे

Views: 5149
6 Min Read

क्रांतीकारी लहूजी वस्ताद साळवे –

लहु राघोजी साळवे यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी पेठ या गावात झाला.लहूजी वस्ताद साळवे हे भारतीय क्रांतिकारक  होते. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते. लहूजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. लहूजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराकर्मी पुरुष होते, युद्ध कलेमध्ये त्यांचा कोणीही हात धरत नसे. एकदा राघोजी साळवे यांनी वाघाबरोबर युद्ध करून जिवंत वाघाला खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या राजदरबारी सादर केले होते व आपल्या प्रचंड शक्तीचे प्रदर्शन केले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. साळवे घराने सशस्त्र विद्येमध्ये निपुण व तरबेज होते. दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी व  निशानेबाजी या सर्व युद्ध कलेमध्ये लहुजी निपुन होते. लहुजींचे पिळदार शरीर व त्यांची भरलेली छाती पाहून शत्रूला सुद्धा घाम फुटत असे. जीवघेण्या शस्त्रांबरोबर अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळत असत. त्यामुळे, शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात साळवे घराण्याची योग्यता ओळखून पुरंदरकिल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजी साळवे यांचे आजोबा यांच्याकडे सोपवली होती. पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणासाठी साळवे घराण्यातील अनेक वीर पुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत ‘ या पदवीने गौरविले होते.

पुढे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व २३ वर्षे वयाच्या लहुजी यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. लहुजीं चे वडील राघोजी साळवे वाऱ्याच्या वेगाप्रमाणे शत्रू वर तुटून पडले होते व सपासप तलवारीचे वार करत शत्रुंना जमिनीवर लोळवत होते. अखेर या संकटातुन बाहेर पडण्यासाठी घाबरलेल्या इंग्रजांनी एकत्र वार करून राघोजींना संपवले.राघोजी या युद्धात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. पुढे इ.स. १८१८मध्ये मराठा साम्राज्याचाभगवा ध्वज शनिवारवाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.

या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. यावेळी देशांत अनेक बलाढ्य राजे होते सरदार होते जवळपास 564 संस्थाने देशात अस्तित्वात होती जर ही सर्व ताकत एकत्र आली असती तर आज देशाचे भविष्य वेगळे दिसले असते कदाचित या देशात केवळ हिंदू दिसले असते पण तशी स्वप्ने कोणी पाहिली की नाही कळालं ठाऊक पण लहुजींनी असे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी १८२२ आली पुण्यात गंजपेठेत तालीम सुरू केली ही देशातील पहिली क्रांती शाळा जिथे अनेक क्रांतिकारी घडले या तालमीचे उद्घाटन सरदार रास्ते यांनी केले. यावेळी लहुजींनी त्याचे अनेक खेळ करून दाखवले. त्याच बरोबर बंदुकीने धरणे तलवारबाजी असे मर्दानी खेळ दाखवून लोकांना व तरुणांना आकर्षित करून घेतले.

त्यानंतर अनेक तरुण लहुजी च्या तालमीत दाखल झाले लहुजी वस्ताद म्हणू लागले त्यांना वेगळे करून लहुजी वस्ताद निवडक पट्ट्यांना वेगळे करून त्यांना मातृभूमिवीषयी सांगून त्यांच्यात देशभक्ती निर्माण करू लागले अशांचा वेगळा गट निर्माण करून त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड करीत तयार केले व बंडाला सुरुवात झाली बंडकरी अनेक ठिकाणी गुप्तपणे बंद करू लागले सुरुवातीला इंग्रजांना हे बंड वाटत नव्हते याच काळात उमाजी नाईक यांचेही बंड सुरू होते. उमाजी नाईक  व लहुजी वस्ताद  एकाच भागातील होते. गावाला लागून लागून त्यांची गावे होती. एकदा उमाजीने एका दरोड्या साठी काही पट्ट्यांची मागणी त्यांच्याकडे केली .पण वस्ताद यांनी त्यांना नकार दिला. ते म्हणाले,” आमचे काम वेगळे आहे. तुम्ही इंग्रजांच्या विरुद्ध लढायला उभे राहा. माझ्यासहित सर्वजण तुमच्याबरोबर असू. तुम्ही या मुलकाचे राजे व्हा.” नाईकांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड करून प्रतिसरकार ‘ ची घोषणा केली. काही दिवसात फुटीर त्यामुळे नाईक पकडले गेले तेव्हा वस्ताद आणि त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला.

पुढे लहुजी च्या तालमीत अनेक जण येऊ लागले. तसे महात्मा ज्योतिबा फुलेही यांच्या आखाड्यात आले.लहूजींच्या आखाड्यात तेही तयार झाले. वस्ताद यांचे ते आवडते शिष्य होते .त्यांच्या शैक्षणिक कार्यात लहुजी वस्ताद हिमालयासारखे त्यांच्या पाठीशी उभे होते .त्याकाळात वस्ताद यांचे नाव पंचक्रोशीत गाजत होते. पुण्याच्या बाहेरूनही तरुण येत होते. पुणे, नगर ,सातारा या भागापर्यंत लहुजींचे क्रांतिकारक पसरले होते.लहूजी यांनी  दूरदृष्टीने अनेक मुलांना शिकवले. हे ओळखून महात्मा  ज्योतीबांच्या मदतीने दलित  मुलांसाठी गंजपेठेत १८५१ साली  शाळा सुरू केली. सर्वप्रथम या शाळेत त्यांनी त्यांची पुतणी मुक्ता हिला घातले व इतर दलित मुलेही त्या शाळेत शिकू लागली.

१८५७ च्या बंडात लहूजींचे अनेक बंडकरी सामील होते,ते सर्वच्या सर्व  स्वातंत्र्यासाठी शहीद झाले. सातारच्या बंडातही अनेकजण होते,तेही पकडले गेले.आणि सातारच्या झेंडा मैदानावर फाशी गेले.

लोकमान्य टिळक यांनीही वस्ताद यांच्या तालमी स्वातंत्र्याचे धडे घेतले होते. त्याचप्रमाणे वासुदेव बळवंत फडके हे तर वस्तादांचे जीव की प्राण होते .कारण मुलकाला स्वतंत्र  करण्यासाठी लहुजी वस्ताद यांना त्यांच्या रुपाने कदाचित शेवटचा आशेचा किरण दिसत होता. वासुदेवाने जोमाने बंडाला सुरुवात केली. इंग्रजांच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या. खजिने लुटले .वस्तादांना खुप आनंद होत होता. पण वासुदेव फडके यांनी इंग्रजांनी १८७९ मधे पकडले आणि खटला भरला.त्यांना संगमाच्या जवळ असलेल्या तुरुंगात ठेवले वस्ताद यांना तेथून सोडवण्यासाठी म्हणून सांगा माझ्या परिसरात असलेल्या महादेव मंदिरा जवळ राहू लागले यावेळी वस्ताद यांचे वयही झाले होते तरी त्यांची इच्छाशक्ती प्रबळ होते वासुदेवाचा खटला सुरू होऊन यांना जन्मठेपेची शिक्षा झाली व त्यांना सांगण्यावरून हलवून वेड्यांच्या तुरुंगात पाठवण्यात आले ही बातमी वस्ताद त्यांना कळल्यावर त्यांना खूप वाईट वाटले तेव्हा स्वतःचे इंग्रजांवर हल्ला करण्याचा बेत आपण त्याच परिसरात ते राहू लागले.

स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरले. आपल्या वडिलांना आपल्या डोळ्या समोरच शहीद झालेले पाहून लहूजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली व भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी उभारली. ही समाधी अजूनही पुणे-शिवाजीनगरजवळच्या ‘वाकडेवाडी’ येथे आहे.

लेखन –  डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Leave a Comment