लाल महाल
छत्रपती शिवराय प्रत्यक्ष लाल महालांवरच एका मध्यरात्री छापा घालणार होते… सव्वा लाख फौजेच्या गराड्यात असलेला लालमहाल पूर्ण बंदोबस्तात होता… महाराजांचं हेर खातं अत्यंत सावध आणि कुशल होतं… सव्वा लाखाची छावणी… त्यात बंदिस्त लाल महाल… त्यात एका बंदिस्त दालनात खान… अन त्याला गाठून छापा घालायचा… हे कवितेतच शक्य होते. पण असं अचाट धाडस महाराजांनी आखले… ही संपूर्ण मोहिम मुख्यत: हेरांच्या करामतीवर अवलंबून होती… हेर म्हणजे शिवरायांचा तिसरा डोळा… लाल महालावरच्या छाप्यासाठी महाराजांनी चैत्र शुद्ध अष्टमीची मध्यरात्र निवडली… याच महिन्यात मोगलांचे रोज्याचे उपवास सुरू झाले होते… छाप्याच्या रात्री सहावा रोजा होता… पण याचा इथं कुठं संबंध आला..? मोगली सैन्य रोजाच्या उपवासामुळे रात्र झाल्यावर भरपूर जेवण करून सुस्तावणार हा अंदाज खरा ठरणार होता… खुद्द शाहिस्तेखानाच्या कुटुंबातही हीच स्थिती असणार…
राजगडावरून महाराज सुमारे एक हजार सैनिक घेऊन निघाले… (दि ५ एप्रिल १६६३, चैत्र , शुद्ध अष्टमी , रात्री) ते कात्रजच्या घाटात आले… शाहिस्तेखानाने आपल्या पुण्यातल्या छावणीच्या भोवती रात्रीची गस्त घालण्याकरता आवश्यक तेवढे आपले सैनिक रोजी ठेवले होते… यात काही मराठी सरदार आणि सैनिकही होते… आपल्या बरोबरच्या सुमारे पाचशे सैनिकांपर्यंत एक जरा मोठी टोळी त्यांनी आपल्यापाशी ठेवली आणि बाकीच्या मराठ्यांना , ठरविल्याप्रमाणे पुढच्या उद्योगास छावणीत पाठविली… हे सैनिक, जणू काही आपणच मोगली छावणीभोवती गस्त घालणारे नेहमीचेच लोक आहोत अशा आविर्भावात छावणीत प्रवेश करू लागले… चौकीदारांनी त्यांना हटकलेही… पण ‘ आम्ही रोजचेच गस्त घालणारे… आम्हाला ओळखलं नाही..? गस्तीहून परत आलो..! असा जवाब धिटाईनं करून आत प्रवेशले… चौकीदारांना वाटलं की होय, ही रोजचीच गस्तीची मंडळी परत आली आहेत…
लाल महाल
महाराजांना आपलाच लाल महाल चांगला परिचयाचा होता… महाराजांनी आत प्रवेश केला…मुदपाकखान्याच्या दाराच्या आतल्या बाजूला जो पहारेकरी होता त्याच्यावर पहिला घाव घालताच तो ठार झाला… त्याच्या ओरडण्याच्या आवाजानं माडीवर असलेला शाहिस्तेखान एकदम खडबडून जागा झाला… तो धनुष्यबाण घेऊन माडीवरून खाली अंगणात धावत आला… आता रात्रीच्या अंधारात खानाच्या बापाने धनुष्य बाण वापरला होता काय..? त्याचा एक मुलगा, अबुल फतहखान आपल्या वडिलांवर कोणीतरी घाव घालू पाहतोय हे त्याच्या लक्षात आलं… तो वडिलांना वाचविण्यासाठी पुढं आडवा आला अन महाराजांच्या तलवारीखाली ठार झाला… काही मावळ्यांनी लाल महालाच्या मुख्य दरवाज्याच्या माथ्यावर असणाऱ्या नगारखान्यात घुसायचे, तेथे झोपलेल्या वाद्य वादकांना असेच एकदम उठवायचं आणि तेथील नगारे, कणेर, तुताऱ्या, ताशे, मफेर इत्यादी वाद्ये वाजवायला लावायचे हा आणखी एक गोंधळ उडवून देण्याचा प्रकार ठरविलेला होता अन तो अगदी तसाच घडला…
खान जिन्याने धावत होता… महाराज आता त्याचा पाठलाग करीत होते… खान पुढे आणि महाराज मागे असा प्रकार चालू झाला अन गोंधळलेला खान केवळ जीव वाचविण्याकरताच पळत होता… स्त्रियांच्या त्या दालनात खान शिरला… खान घाबरून धावत आल्याचे तेथील बायकांनी पाहिले… पडद्याला पडलेल्या भगदाडातून शिवरायांची आकृती आत येताना स्त्रियांनी पाहिली… तिथं असलेली शमादाने कोणा शहाण्या स्त्रीने फुंकून विझविली… अधिकच अंधार झाला… महाराज आता अंदाजाने खानावर धावून जात होते… महाराजांना वाटले खान येथेच आहे… म्हणून त्यांनी आपल्या तलवारीचा खाडकन घाव घातला… घाव लागल्याचे त्यांना जाणवले… त्यांना वाटले घाव वमीर लागून खान मेला… अन् महाराज तेथून तडक आल्या वाटेने परत परतले… संपूर्ण लाल महालाची वास्तु भयंकर कल्लोळाने दणाणत होती… त्यातच नगारखान्यातील वाद्यांचा कल्लोळ चालू होता… महाराजांचा मुख्य उद्देश मात्र अंधारात अधांतरीच राहीला… खान बचावला… त्याची फक्त तीन बोटे, उजव्या हाताची तलवारीखाली तुटली… आपले छाप्याचे काम फत्ते झाले असे समजून पूर्वयोजनेप्रमाणे महाराज आणि मावळे लाल महालातून निसटले..
(संदर्भ : राजा शिवछत्रपती कादंबरी बाबासाहेब पुरंदरे लिखित)
असंख्य फौजेचा पडलेला अजगरविळखा नगराला बाळअंगणी समशेर पुन्हा घेऊनी आली शिवबाला,
अवचित बिजली कोसळली अन क्षणात बोटे तुटली, स्वराज्यदौलत शाहिस्त्याच्या काळमुठीतुन सुटली.
#शिवतेज_दिन अर्थातच शाहिस्तेखानाची बोटे छाटली हा जाज्वल्ल्य पराक्रम दिन.
शब्द रचना
#जगदंब_प्रतिष्ठान,
महाराष्ट्र राज्य
#लाल महाल | Lal Mahal History