महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,37,524

मुघलकालीन खानदेशातील जमीन महसूल पध्दती

By Discover Maharashtra Views: 3443 12 Min Read

मुघलकालीन खानदेशातील जमीन महसूल पध्दती –

अकबराने जेव्हा खानदेश जिंकला तेव्हा प्रचलित पध्दत नस्कची जमिन महसूल पध्दती प्रचलित होती. या पध्दतीने शेतकऱ्यावर वैयक्तिक पातळीवर जमीन महसूल आकारणी न करता ती खेड्यावर केली जाई. या पध्दतीत किती जमिनीचे क्षेत्र लागवडीखाली आहे याचा विचार करून एकूण खेड्यातील जमा निश्चित करून आणि त्यावरून कर आकारला जात असे. तसेच प्रत्येक शेतकऱ्याकडील किती बैलांच्या जोड्या आहे आणि नांगर आहे यावरून शेतकऱ्याचा सारा ठरवला जात असे. या पध्दतीने शेतीच्या उत्पन्नावर न ठरवल्याने प्रत्येक परगण्याच्या आकारणीवर बरीच तफावत पडत असे.(मुघलकालीन खानदेशातील जमीन महसूल)

खानदेशातील मुर्शिद कुलीखान येण्यापूर्वी महसूल आकारणी करण्याची कार्यक्षम पध्दत नव्हती. सर्वत्र एकसारखी पध्दत नसल्याने मुगल अधिकारी फसवणूक करत आणि जास्त रक्कम उकळत असत. त्यात युध्द, शत्रूंची आक्रमणे दुष्काळ यामुळे शेतकरी कंटाळून शेती आणि गाव सोडून दुसरीकडे निघून गेले होते आणि शेती लागवडीखाली रहात नसे. त्यासाठी शाहजहान ने औरंगजेब सुभेदार असतांना जमीन लागवडीखाली आणली होती आणि महसूल आकारणी निम्म्याने कमी केली होती.

बादशहा शाहजहान याने दख्खनचा दिवाण मुर्शिद कुलीखान याची नियुक्ती केली. तो एक अनुभवी आणि प्रामाणिक अधिकारी होता. दख्खनमधील इतर सुभ्यांप्रमाणे खानदेशात महसूल व्यवस्थेत  सुधारणा  केल्या, प्रथम तोरडमल च्या सुधारणेप्रमाणे शेतकऱ्यांना पुनर्वसन व्हावे म्हणून प्रयत्न केला आणि महसूल गोळा करण्यासाठी प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी अमीनाच्या आणि अमीलांच्या नेमणूका केल्यात. खानदेशातील जमीन मोजमाप करून पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी तसेच वेगळ्या ठरवण्यासाठी गुणी मुकादमांच्या नेमणूका केल्यात शिवाय प्रोत्साहन दिले. शेतकऱ्यांना तकवी म्हणजे कर्ज देण्याची व्यवस्था केली. या पध्दतीनुसार दिवाणाने खेड्यातील मुकादमाच्या भरवश्यावर शेतकऱ्यांना  कर्जपुरवठा करून  शेतकऱ्यांना असा आदेश दिला होता की त्यांनी कर्जफेड ही हंगामात हप्त्याहप्त्याने करावी. औरंगजेब बादशहा याच्या कारकीर्दीत पैनघाटाच्या दिवाणाकडे खानदेशातील सूभ्याची व्यवस्था सोपविण्यात आली तेव्हा  बादशहाने खानदेशात धरणे बांधण्यासाठी पन्नास हजार रुपये रक्कम मंजूर केली. मात्र शेतकऱ्याला सरकारी कर्ज घेतांना मुकादम हा जबाबदार आणि साक्षीदार मानला जाई.

जमिनीच्या मोजणीचे परिमाण हे परतन म्हणजे चार बिघ्यांचा एक परतन होई. तीन हजार सहाशे धारा मिळून एक बिघा होई. वीस परतन मिळून ऐशी बिघा होई तर ऐशी बिघ्यांचा एक औत होई. ऐशी बिघा जमिनीची मशागत एका बैलजोडीने होई त्यास एक औत म्हणत.

जमिन सारा आकारणीच्या पध्दती

खानदेशात तीन प्रकारच्या जमिन सारा आकारणी पध्दती प्रचलित होत्या.

१. सिरबस्थ – तशरवीर

दर नांगराप्रमाणे एकुण अंदाजे सारा ठरवला जाई.

२ बटाई

या पध्दतीत जमिनीतून आलेल्या उत्पन्नाची वाटणी सरकार आणि शेतकरी यांच्यात होई. मुर्शिद कुलीखानने तीन प्रकारच्या आकारणीचा तपशिल सांगितला आहे. नैसर्गिक पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या शेतीच्या उत्पन्नावर निम्मा हिस्सा शेतकरी आणि निम्मा सरकार असा तर रब्बी व खरीप दोन्ही हंगामात पीक विहीरीच्या पाण्यावरील उत्पन्नाचा एक तृतीयांश भाग सरकार आणि दोन तृतीयांश भाग शेतकऱ्याने घ्यावा तर द्राक्षे,ऊस,हळद,आलू,आंबा यांचा एक नमांश ते एक चतुर्थांश भाग सरकारला पाठवावा लागे.

३ जारिब पध्दती

जारिब पध्दती या पध्दतीने जमिनीचे मोजमाप करून प्रत्यक्ष लागवडीखाली आणलेल्या जमिनीतील

उत्पन्नावर महसुलाचा सारा आकारला जात असे. प्रत्यक्ष पिकापासून उत्पन्न किती आले याचा विचार या पध्दतीने केला जाई. त्यामुळे या फध्दतीत लागवडीखाली आणलेल्या जमिनीचे मोजमाप मोठे काटेकोर पद्धतीने केले जाई.

मोजणी करतांना काही चुका होऊ नये म्हणून काही ठिकाणी मुर्शीद कुलीखान जारिब दोराचे टोक स्वत: धरत असे. असे खाफीखानाने म्हटले आहे. विहीरीच्या पाण्यावरील लागवडीखाली पिकलेल्या जमिनीवर वेगळा जास्त सारा असे. तर कालव्याखालील पाण्याखाली भिजणाऱ्या जमीनीतील पिकावर आकारलेला सारा हा कमी होता.

खानदेशातील जमिनीचा महसूल हा धान्य अथवा रोकड रकमेत स्विकारण्यात येई. मुर्शिद कुलीखानाने प्रत्येक पिकासाठी दर ठरवून दिले होते. तसेच बाजारपेठेतील जिवनावश्यक वस्तूंच्या किंमतीचा विचार करून दर बिघ्याला साऱ्याचा दर ठरविला जाई. साधारणपणे रोकड  शेतकरी रोकड रकमेत सारा देण्याचे पसंत करीत असे. परंतु मुर्शिद कुलीखानाने लागू केलेला धान्याचा हिस्सा वाटणीच्या पध्दतीमुळे मात्र खानदेशात लागवडीखाली आणावयाच्या जमिनीचे क्षेत्रफळ पूर्वीपेक्षा जास्त पटीने वाढण्यास मदत झाली.

नस्क मुघलकालीन ही भुमापन पध्दती होती काय होती ही पद्धत?  परंतु त्याबाबत विस्तृत माहिती मिळत नाही. यात दरवर्षी मोजणी न करता पटवारी जवळच्या नोंदीवरून सारा वसूल होत असे.

साऱ्याची रक्कम निर्धारण हे नस्क पध्दतीने होत असे आणि पिकांची उत्पादकता यावरून ठरत असे. या प्रकारच्या कच्च्या व्यवस्थेस कनकूत असेही म्हणत.  मागील वर्षी आलेल्या उत्पादनावरून ही निर्धारीत केली जायची.( संदर्भ भारत विश्र्वकोश)

जिझीया कराबद्दल फारच चर्चा केली गेली आहे त्यामुळे येथे थोडक्यात आढावा घेते, हा एक धार्मिक कर होता. जो बिगर मुस्लिम लोकांकडून घेतला जाई. म्हणजे एका प्रकारे मुस्लिम राज्यात फक्त मुस्लिम लोकांना रहायची परवानगी होती. बिगर मुस्लिम लोकांना त्याकरीता कर द्यायचा ही प्रमुख भूमिका यामागे होती. भारतात अकराव्या शतकात हा कर लागू करण्यात आला.

पहिल्या पुरावा मुहम्मद बिन कासीम स्वारी नंतर  प्रथम भारतात तो सिंध प्रांत देवल मध्ये नोंद करण्यात आली होती, पण अल्लाउद्दीन खिलजी यांच्या काळात विस्तार झाला. फिरोज शहा तुघलक हा दिल्ली सल्तनतचा पहिला सुलतान होता जिझिया कर लादणारा. यापूर्वी या करातून ब्राह्मणांना सूट देण्यात आली होती. ब्राह्मणांवरही जिझिया कर लादणारा हा पहिला सुलतान होता.  यांनी तो ब्राम्हण सोडून इतर हिंदूवर सुरू ठेवला त्यामुळे बरेच उठाव झाले.

फिरोज तुघलक दिल्लीला तसे करण्यास विरोध करत ब्राह्मण उपोषणाला गेले. तरीही फिरोज तुघलक यांनी ते संपविण्याकडे लक्ष दिले नाही. सरतेशेवटी, दिल्लीच्या लोकांनी ब्राह्मणांऐवजी स्वत: कर देण्याचा निर्णय घेतला. यानंतर लोदी वंशाचा शासक अलेक्झांडर लोदी याने जिझी कर लादला. काश्मीरमध्ये सिकंदर याने जिझीया आणि जकात असे दोन्ही लागू केले. अकबर बादशहाच्या काळात रद्द करण्यात आला होता पण औरंगजेबाने परत सुरू केला. १७०४ मध्ये दख्खनमध्ये या विरोधात आंदोलने झाली.  अलाउद्दीन खिलजी यांनी जझिया व न भरणा-या लोकांना गुलाम करण्याचा कायदा केला. त्याचे कामगार अशा लोकांना गुलाम बनवून गुलाम कामगारांची मोठी मागणी असलेल्या सल्तनत शहरात त्यांना विकायचे.  मुस्लिम कोर्टाचे इतिहासकार झियाउद्दीन बारानी यांनी लिहिले आहे की बयानाच्या काजी मुगीसुद्दीनने अलाउद्दीनला सल्ला दिला होता की हिंदूंचा अनादर दाखवण्यासाठी आणि त्यांचा अपमान करण्यासाठी इस्लामला हिंदूंवर जिझिया लादण्याची गरज आहे. जिझिया लादणे हे सुलतानचे कर्तव्य आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.

सल्तनतच्या बाहेर देखील मुस्लिम राज्यकर्त्यांनी हिंदूंवर जिझिया कर लादला. जाकिया कर प्रथम काश्मीरमध्ये सिकंदर शहा यांनी लादला होता.  हा धर्मांध राज्यकर्ता होता आणि त्याने हिंदूंचा छळ केला. यानंतर, त्याचा मुलगा जैनुल आबेदीन (इ.स.१४२०-७०) राज्यकर्ता झाला आणि सिकंदरने लादलेला जिझिया रद्द केला. जिझिया कर रद्द करणारा तो पहिला शासक होता. नंतर गुजरातमध्ये अहमद शहा (१४११- ४२) च्या काळात  प्रथम जजियाची स्थापना झाली. त्याने जाझियावर इतका कठोरपणे लावला की बरीच हिंदू बळजबरीने मुसलमान बनली.

जाझिया कर रद्द करणारा अकबर हा पहिला मुघल शासक होता. अकबर यांनी १५६४ मध्ये जिझिया कर संपवला, परंतु १५७५ मध्ये पुन्हा लागू केला. औरंगजेबाने १६७९  मध्ये जिझी कर लादला. त्याच्या राज्यामध्ये हिंदूंनी जझिया करविरूद्ध बंड केले, ज्यामुळे काही ठिकाणी दरम्यान जाझिया हटविला गेला. इ.स. १७१२ मध्ये, जहदारशाह यांनी आपल्या मंत्री झुल्फिकार खान आणि असद खान यांच्या आदेशानुसार जाजियाची योग्यरित्या खात्मा केली. यानंतर फर्रुखशियार यांनी १७३१ मध्ये जिझिया कर काढून टाकला पण १७७१ मध्ये त्याने जिझियाची नावे बदलली. अखेरीस, १७२०  मध्ये, महंमद शाह रंगीला यांनी जयसिंगच्या विनंतीवरून जझिया कर रद्द केला.

जमीन महसूल अधिकारी

महसूल आकारणी आणि सरकारी दप्तरात नोंद करण्यासाठी देशमुख, देशपांडे, पटवारी, मुकादम इत्यादि अधिकारी वंशपरंपरागत पद्धतीने नेमले असत तर खालसा परगण्यात मात्र रूस्तुमबंग तहसीलदार असल्याचा उल्लेख सापडतो. काही वेळा देशमुखाकडे कुलकर्णी आणि मुकादमांचे कामकाज सुध्दा सोपवण्यात येई. याचा मोबदला करविरहीत जमीन इनाम मिळत असे. परंतु त्याच्या बदल्यात त्यांना बादशहाला ठराविक रक्कम पेशकाश म्हणून द्यावी लागे. परगण्याच्या देशमुखाला तेल्याकडून पाचशेर तेल, तांबोळ्याकडून पंचवीस पाने, तसेच धान्य व्यापाऱ्याकडून काही शेर धान्य, माळ्या कडून भाजीपाला व फळफळावळ मिळत असे.

खानदेशातील मुगल काळात मोठ्या नद्या, उपनद्यांमुळे शेतीला पोषक वातावरण होते तर दुष्काळ वगळता धरणे कालवे यांच्या मदतीने भरभराट होती. अबुल फजल म्हणतो की,” अकबराच्या कारकिर्दीत ज्वारी, तांदूळ, कापूस हे पिके विपुल येत ज्वारी हे सर्वात महत्त्वाचे पीक होते.खानदेशातील तांदूळ विशेषतः नंदूरबार परिसरातील विशेष प्रसिध्द होता. तांदळाई देवी जिला साय म्हणजे तांदुळाच्या ओंब्या वहायची पध्दत आहे. आजही ही पूजा होते ती नवापूरजवळ पांढराईदेवी मिहणून होय.

बऱ्हाणपूर परिसरात कापूस उत्पादन चांगले येत होते असे टॅव्हर्नियर याने केलेल्या नोंदीत सापडते तर तांदूळ आणि निळीचे उत्पादन चांगले मिळत होते हे ही तो नोंदवतो. नवापूर भागातील सुगंधी तांदूळ उत्पादन होई. त्याबद्दल तो म्हणतो की, येथील तांदूळ इतका  सुरेख होता आणि सुवासिक होता की त्याचे नाव “बासमती” हे पडले. कापसाची पैदास यावल, चोपडा, नवापूर, नंदुरबार, एरंडोल, ब-हाणपूर परिसर येथे  मुबलक होई.  आजही हीच पिके अर्थात निळ, तंबाखू  सोडून घेतली जातात. फळांतील विविधता जाऊन तिथे फक्त केळी लागवड होते हे सुदैव की दुदैव हे काळच जाणे.

बऱ्हाणपुर ते अडावद भागात निळीचे उत्पादन होई. जवळजवळ एक लाख किमतीपेक्षा अधिक निळ विकली जाई. तंबाखू आणि अफूची निर्यात सुरत आग्रा भागाकडे होई.ऊसाचे पीक ही महत्वाचे होते. नंदुरबार, नवापूर भागात हे मुबलक होई तर साल्हेर, मुल्हेर, चांदवड या भागात द्राक्षे होत. एरंडोल, थाळनेर  येथे  मीर अहमदखान या मुगल अधिकाऱ्याने आंब्यांची बाग चांगली फुलवली होती. त्यातील आंबा केला हा एक होता. शाहजहान याने यास बादशहापसंद हे नाव दिले होते. शेंदुर्णी ते फर्दापुर भागात आंब्यांची चांगले लागवड होते. असे वर्णन फ्रॅकाइस मार्टिनने आपल्या प्रवास वर्णनात केले आहे.

(फ्रंकोईस मार्टीन १६३४-३१ हा फ्रेंच प्रवासी सुरवातीला नंतर गव्हर्नर जनरल पांडेचरीचा १६७३ मध्ये शेरखान लोधी जो वेलोकोंडापुरम येथील विजापूरच्या सुलतानाने वसाहतीस जागा दिली होती. हा मुसलीपट्टम येथील प्रमुख होता त्याने पांडेचरीची स्थापना केली जी भविष्यात फ्रेंच इंडिया कंपनीची वसाहत झाली त्यास पांडेचरीचा जनक म्हटले जाते.तो फेंच ईस्ट इंडीया कंपनीचा कमीशनर होता.

संदर्भ: Donald F. Lach, Edwin J. Van Kley, Asia in the Making of Europe, Volume III: A Century of Advance (1998), p. 258. या वरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे हे व्यापारी शक्यता पडताळून बघायला प्रवास करत असत.)

खानदेशातील दुष्काळ आणि महापूराचे वर्णन हे पीटर मुंडी तसेच महापूराचे वर्णन मार्टीनने केले आहे. एरंडोल येथील शहराचा पुरापासून बचाव करण्यासाठी देशमुख व पाटील चंदीदास देशमुख व मालाजी पाटील यांनी शहराभोवती तटबंदी करून शहराचे संरक्षण केले असेही तो उल्लेख करतो.  तापीकाठच्या तसेच गिरणाकाठच्या गावांत तशा तटबंदीचे अवशेष दिसतात.विशेषत: बऱ्हाणपूर येथे आणि थाळनेर ही तर महत्त्वाचे शहरे होती पण कानळदा, सावदा, फैजपूर या गावात अशी तटबंदी दिसते. भडगाव येथील तसच विचखेडा आणि शहादा तालुक्यातील काही गावांमध्ये तटबंदी आहे. नीट सर्वेक्षण करून पट मांडता येईल.

पीटर मुंडी हा सुद्धा १५९७-१६६७ ब्रिटीश व्यापारी व प्रवासी होता. आणि लेखक होता. त्याचे हे पुस्तक प्रसिध्द आहे.( Itinerarium Mundi (‘Itinerary of the World’)

चीनमधील चहा पिणारा तसेच रशिया, युरोप आणि चीन मध्ये प्रवास करणारा प्रवासी होता.

निकोलस मनुची १६३८-१७१७ हा एक इटालियन लेखक, डॉक्टर आणि प्रवासी होता. मुगल काळातील त्याने प्रवास केलेल्या आठवणी लिहिल्या आहेत. ही माहिती ही मुगल इतिहासाचे एक प्रमुख साधन आहे. शाहजहान, औरंगजेब, शिवाजी,दारा शुकोह शाह आलम,राजा जयसिंग आणि किरात सिंग तो कधीच परत गेला नाही आणि भारतातच स्थिरस्थावर झाला. ही साधने वापरतांना तो किंवा इतरांची साधने वापरतांना ते प्रवासी होते. खोलवर रूजलेली संस्कृती समजण्यास असमर्थ होते हे लक्षात घ्यायला लागते.

– सरला

Leave a Comment