महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,830

औरंगजेबाच्या मृत्युपत्रातले शेवटचे वाक्य

By Discover Maharashtra Views: 2259 1 Min Read

औरंगजेबाच्या मृत्युपत्रातले शेवटचे वाक्य –

“एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे अनेक वर्षं मानहानी नशिबी आली… मी बेसावध राहिल्यामुळे तो दगाबाज सिवा निसटून गेला आणि मला आयुष्यभर मराठ्यांशी लढावं लागलं…” – औरंगजेबाच्या मृत्युपत्रातले शेवटचे वाक्य.

१७ फेब्रुवारी १७०७ ला तो आजारी पडला आणि अहमदनगरजवळ भिंगार येथे २० फेब्रुवारी रोजी शुक्रवारी सकाळी प्रार्थना करत जपमाळ ओढत त्याचा वयाच्या ८९व्या वर्षी मृत्यू झाला. औरंगजेबाने स्वतःच्या हस्ताक्षरात हे मृत्युपत्र लिहिले आणि त्याच्या मृत्यूनंतर ते त्याच्या उशीखाली सापडले. (इंडिया ऑफिस लायब्ररी – हस्तलिखित १३४४, फोलिओ ४९-ब)

या मृत्युपत्रात त्याने त्याच्या वारसदारांना महत्त्वाचे उपदेश तसेच त्याच्या बारा इच्छा विस्ताराने लिहिलेल्या आहेत. हे मृत्युपत्र तसेच त्याने त्याच्या मुलांना शहजादा आझम व कामबक्ष यांना लिहिलेली शेवटची उद्बोधक पत्रही सर्वांनी आवर्जून वाचण्यासारखी आहेत. त्या मृत्युपत्रात शेवटच्या औरंगजेब लिहितो, “एक क्षणभर जरी बेसावधपणा असला तरी वर्षानुवर्षे केलेले कार्य वाया जाण्याचा प्रसंग येतो. माझ्या निष्काळजीपणामुळे शिवाजी माझ्या नजरकैदेतून निसटला आणि परिणामी माझ्या जीवनाच्या अखेरीपावेतो मला मराठ्यांशी जीवनमरणाचा कसा लढा द्यावा लागला हे आपण जाणताच.”

१२ हा आकडा शुभ मानला जातो. मी सुद्धा १२ च सूचना दिलेल्या आहेत.

“तुम्ही जर ह्यापासून धडा घ्याल तर
तुमच्या शहाणपणाचे कौतुक !
तुम्ही जर त्याकडे दुर्लक्ष कराल तर
ते तुमचे दुर्दैव !!”
(औरंगजेबाने केलेले काव्य)

प्रणव कुलकर्णी

Leave a Comment