पत्थरगडची लुट आणि पानिपतचा बदला
शुक्रताल मराठ्यांच्या हातात आले. शाही सेनेने आणि मराठी फौजेने तेथे मोठी लूट केली. गुजर आणि मेवातनीही मोठी लूट केली. आता मराठी फौज पत्थरगडाकडे आली. हा किल्ला रोहिल्यांची राजधानी नजीबाबादच्या पूर्वेला एका मैलावर नजीबखान रोहिल्याने बांधला होता. मराठी फौजेने पत्थरगडाला वेढा घातला. स्वतः बादशाह जलालाबादेला आला होता. पत्थरगड बळकट किल्ला होता. तोफा आणि दारूगोळा भरपूर होता पण अन्नाचा साठा मात्र कमी होता. अफगाण तराईच्या जंगलात दडून बसले होते, पण त्यांची बायकामुले मात्र पत्थरागडातच होती. मराठे आणि अफगाण यांच्यात पंधरा दिवस गोळीबार झाला.(पत्थरगडची लुट)
सुलतानखान पत्थरगडाचा किल्लेदार होता. पण वयोवृद्ध होता. त्याच्याने लढाई करना. त्याचा आत्मविश्वास खचत होता. शेवट किल्ल्यातील बायकांच्या अजूला धक्का पोहोचू नये. लोकांच्या जीविताला धोका न हो या अटींवर त्याने किल्ला मराठ्यांच्या हवाली करण्याचे कबूल मराठ्यांनी ही मागणी तात्काळ मान्य केली. १६ मार्च रोजी रोहिले अफगाणांनी पत्थरगड खाली केला. मराठी फौज पत्थरगडाच्या दरवाजात आली. प्रत्येकाची कसून झडती घेऊन त्यांना सोडण्यात आले. काहींनी जवाहिर पेट्यात भरून त्या खंदकात टाकल्या होत्या. मराठ्यांनी अफगाण स्त्रियांच्या अंगाला हात लावला नाही. अफगाणांनी जडजवाहिर पाट खंदकात फेकल्याची बातमी मराठ्यांना कळली. खंदक खोल होता, पण खणून त्यातील पाणी शेजारच्या प्रवाहात सोडण्यात आले. खंदकात प्रचंड संपत्ती मिळाली. हिरे, मोती, माणके, सोनेनाणे अशी अपार लूट मराठ्यांनी मिळवली. तोफाही ताब्यात घेतल्या. मात्र बादशाह आणि मराठे यांच्यात या लूटीबाबत वाद निर्माण झाला. मोहिमेच्या आधी केलेल्या कराराचा भंग मराठ्यांनी केला, असा आरोप बादशाहाने केला.
मराठ्यांनी मोठी लूट जमा केली आणि त्यातील नाममात्र वाटा बादशाहाला दिला, असे बादशाहाचे म्हणणे होते. बादशाहाचे मुतालिक यांच्यातील लुटीबाबतची बोलणी हमरीतुमरीवर आली. मराठ्यांचे मध्यस्त संतापून बोलणी थांबवून निघून आले. अखेरीस महादजी शिंदे यांच्या मध्यस्थीने तडजोड झाली. पत्थरगडाची वस्तभाव निघाली ती निमे पातशाहास दिली. बाकी राहिली ती सरकारात निमे व निमे सरदारास दिली. मराठ्यांनी रोहिल्यांवर मोठा विजय मिळवला.
पत्थरगड मध्ये नजीबाची समाधी होती ती फोडून त्याची हाडे फेकून त्यांवर नाचणारा ,साऱ्या अंगाला त्याची भुकटी फासणारा विसाजी पंत बिनीवाले..आणि अख्ख्या रोहिलखंडात जमिनीवर 2 इंचही बांधकाम असेल तर तोफा लावून उडवण्याची प्रतिज्ञा घेतलेले महादजी शिंदे, दत्ताजी शिंदे यांच्या वधाचा आणि पानिपतच्या पराभवाचा कलंक धुवून टाकला. मराठी पराक्रम उत्तरेत निनादू लागला. कुठे पुणे आणि कुठे पत्थरगड? पण या भीमथडी तट्टानी गंगा-यमुना यांचा प्रदेश जोरदार तुडवला. रोहिल्यांचा त्यांच्याच प्रदेशात पराभ करणे सोपे नव्हतेपण हे अवघड काम मराठी फौजेने सहज करून दाखवले. शक्ती आणि यक्ती दोन्ही उत्तम रीतीने वापरली. मराठ्यांना पत्थरगडाच्या लुटीत नाणी आणि सोनेचांदी एकूण दहा लाखांची मिळाली. २२९८ घोडे मिळाले. दारूगोळातीन मोठ्या तोफा, २ जेजाला, ७ जंबुरे, १८४२ तोफगोळे, १०० दारूचे बाण, ५३० मण दारूची भुकटी मिळाली.
माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची