धुंद वेडा मी दुर्ग संवर्धनाचा
नेहमीप्रमाणे आजही एका किल्यावर फिरायला जानार होतो मी आणि माझी ती. अता अम्ही घरातुन बाहेर पडलो आणि तीही मी घरातुन येताना एक कलरचा डबापण सँकमध्ये आनला होता कारण आमच्या अदृश्य प्रेमाचा इतिहास अम्हाला त्या पावने चारशे वर्षापुर्वीच्या इतिहासावर रंगवायचा होता अता आमची गाडी गडावर पोहचली आम्ही महा दरवाज्यातुन आत गेलो दरवाज्यावरच एक मोठा बदाम काढुन काही जणांनी नाव लिहली होती.
मलाही नाव लिहु वाटल पण नाय लिहलं कारण माणस तोंडाकडं बघत होती आम्ही लगबगीन तेथुन आत गेलो आणि तटबंदिच्या बाजुच्या रस्त्यान चालु लागलो थोड पुढं गेल्याव दुसरी कमान लागली आता मला लगेच महा दरवाजा आठवला त्यावरील नाव आठवली मी लगेच कलरचा डबा काढला आणि आमच नाव लिहु लागलो मोठ्या बदामात आता तिथे बघनार कोण नव्हत फक्त दोन लहान मुले होती ९ वी १० वीत असतील बहुतेक तेही त्याच कमाणीवर गिरवल्यागत करत होती मी त्यांच्याकड न पाहतच आमच नाव लिहु लागलो पण ती पोर आता अलीकड अलीकड सरकत आली होती अता मलाही जरा ते विचित्र वाटल पण मी तरीही त्यांच्याकड लक्ष दिल नाही कामाला लागलो.
माझापण बदाम काढुन झालेला आणि ती मुलही आता माझ्या जवळ पोहचली मला काही न बोलता माझ्या शेजारी उभे राहुन तेथे लिहलेली नाव ती ब्रशने घासुन काढायला लागली मला अत्ता कळाल कि ते गिरटल्यावाणी काय करत होते मग मी त्यांना म्हनालो कारे नाव खोडताय कीती कष्टाने हे लिहले होते त्यांनी ते या गडाव आलेल्याची ती निशानी होती आणि तुम्ही खोडुन टाकली मी एवढच बोल्लो तरीही ती मुल शांतच होती.
धुंद वेडा मी दुर्ग संवर्धनाचा
मला काय न बोलता ती त्यांच काम करत होती नंतर मी त्यांना जाब विचारला का खोडताय म्हनुन तेव्हा ते शातपणे मला म्हणाले आम्ही काँट्रँक्ट घेतले आहे हे पुसायचे कारण आमचे बापजादे या गडकिल्यांच्या तटा बुरजांवर उभे राहुन यांची सुरक्षा केली याच गडकिल्ल्यावर महाराजांनी आपल आयुष्य घालवले याच गडकिल्यांवर जन्म घेतला याच गडकिल्यांवर देह त्याग केला आपल्या प्राणाची आहुती या स्वराज्याच्या होमात दिली तीपण याच गडकिल्यासाठी आणि आज याच गडकिल्यांवर तुमच्यासारखे स्वराज्याचे नावाचे मावळे , माफ कर दोस्ता चुकुन मावळे म्हनालो . कावळे या गडावर येऊन अशी नाव लिहतात जणु तुमच्या बापजाद्यांची ही खरेदीच आहे आरे आज जर शिवराय असते तर या गडकिल्यांवर राहायला त्यांचाच दम गुदमरला असता तुमच्यासारख्या कावळ्यांना घेऊन……
येवढे बोलुन ते निघुन गेले अता माझीच मला लाज वाटत होती जीव गुदमरल्यागत वाटत होता आज पहीलीबार मी चुकीचा असल्यागत वाटत होतो अता तेथे न थांबता मी तो कलरचा डबा घेऊन घरी निघालो मन अता कशातच रमत नव्हत कारण ते शब्द अजुन कानात वाजत होते ” आमचे बापजादे या गडकिल्यांच्या तटा बुरजांवर उभे राहुन यांची सुरक्षा केली याच गडकिल्ल्यावर महाराजांनी आपल आयुष्य घालवले याच गडकिल्यांवर जन्म घेतला याच गडकिल्यांवर देह त्याग केला आपल्या प्राणाची आहुती या स्वराज्याच्या होमात दिली तीपण याच गडकिल्यासाठी आणि आज याच गडकिल्यांवर तुमच्यासारखे स्वराज्याचे नावाचे मावळे , माफ कर दोस्ता चुकुन मावळे म्हनालो . कावळे या गडावर येऊन अशी नाव लिहतात जणु तुमच्या बापजाद्यांची ही खरेदीच आहे.
धुंद वेडा मी दुर्ग संवर्धनाचा
आरे आज जर शिवराय असते तर या गडकिल्यांवर राहायला त्यांचाच दम गुदमरला असता तुमच्यासारख्या कावळ्यांना घेऊन” ना झोप लागत होती ना चैन पडत होता कारण इतक्या दिवस होता तो एक रहीवाशी होता पण आज जो बाहेर पडनार होता तो एक शिवभक्त होता मीपण क्षणाचाही विचार न करता स्वताशीच एक पण केला कि आजपासुन ही गडकिल्यांचे संवर्धन म्हनजेच माझे ध्येय माझ सर्वस्व कारण हेच माझ्या मातृभुमीचे दागिणे आहेत असाच पण प्रत्येकाने केला तर महाराष्टाला पुन्हा सजायला वेळ नाही लागनार.. मी तर ठरवलय अता माझ्या मातृभुमीला सजवायच मला वेड लागलय अता या दुर्गसंवर्धनाच आणि म्हनुनच मी अता झालोय धुंद वेडा या दुर्गसंवर्धनाचा…….
मित्रांनो हि कथा जरी एक काल्पणिक असली तरी हे घडतय ते सत्य आहे यातील पात्र जरी काल्पणिक असली तरी गडकिल्यांवर नासधुस करनारी माणस खरी आहेत दादांनो सुधरा अता तरी जस तुमच अंग आणि घरापुढील अंगण स्वच्छ ठेवता कारण ते सुंदर दिसन्यासाठी तस हे गडकिल्ले स्वच्छ ठेवा उभा महाराष्ट्र सुंदर दिसेल हा शब्द आहे या छोट्या शिवभक्ताचा विचार करा नायतर पुन्हा विचार करायला गडकिल्ले नसतील….
बहुत काय बोलणे
आपण जाणते आहातच…