महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,982

मढ, मेहकर

By Discover Maharashtra Views: 2523 1 Min Read

मढ, मेहकर –

पैनगंगा नदीच्या काठावर ‘मढ’ ही वास्तू मेहकरला आहे. प्राचीन मेहकर नगरला दोन हजार वर्षाची पौराणिक पार्श्वभूमी आहे.ब्रम्हांड, मत्सपुराणात शहराच्या भव्य मंदिरांचा उल्लेख येतो पण जुनी मंदिरे आता आपल्याला आढळत नाही. स्थानिक भाषेत मढ म्हटल्या जाणारी वास्तू पैनगंगेच्या घाटावर आहे ,यामध्ये कोणत्याही देवतांच्या मुर्ती नाहीत किंवा मंदिरासारखी रचना नाही म्हणजेच घाटावर श्राद्ध, तर्पन करण्यासाठी येणाऱ्या भाविकाच्या सोयीसाठी बांधली असावी.धर्मशाळा असण्याचा ही कोणता पुरावा नाही.

पण या वास्तू च्या अवशेषावरुन ही मोठे छत्र असावे कारण येथे एकुण ६० दगडी खांबाची रचना आहे सद्यस्थितीत फक्त २५ कोरीव दगडी खांब आहेत ,छताची ही पडझड झालेली दिसते.आता भारतीय पुरातत्व विभागाकडून देखभाल ,दुरुस्ती चे कामांची सुरुवात झाली आहे आनंदाची बाब म्हणजे येथे मध्यभागी असलेल्या कुंडाचे उत्खनन होत आहे.

भौमितिक आकाराच्या पानांफुलांची रचना असलेली ही वास्तू तर २३×२३ चे पाण्याच्या कुंडाची रचना कशी असेल ? नदी जवळ असल्याने पाण्याचे झरे आहेत की अजून काही शिलालेख इत्यादी. वास्तू त एक दोन नावे कोरलेली आहेत जसे की ढेला वगैरे … कारागीर ची नावे असावीत. पुरातत्व विभागाचा पुढचा टप्पा आहे कंचणी चा महाल ताब्यात घेऊन देखभाल ,दुरस्ती करणे. आवड असणाऱ्या नी आवर्जून भेट द्यावी संवर्धन, जतन आपल्यासाठी च आहे.

फोटो साभार – Sandeep Sarde sir.

Varsha Mishra

Leave a Comment