महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,11,254

माडू पुरातन घातक हत्यार

Views: 2525
2 Min Read

माडू पुरातन घातक हत्यार –

आज आपण एका नैसर्गिक पण अतिशय घातक हत्याराची माहिती घेणार आहोत माडू.

माडू म्हणजे काळवीट या प्राण्याच्या शिंगापासून बनवलेलं हत्यार.काळवीट ची शिकार करून त्याच मांस, कातडं माणसाने वापरलं पण त्याच्या शिंगा चा पण वापर पुरेपूर करून घेतला.काळवीट हा प्राणी दिसायला ओबडधोबड असला तरी त्याच शिंग जर कोणा प्राण्याला लागलं तर ती जखम लवकर  भरून येत नाही किंवा कधीकधी भरूनही येत नाही अगदी मरेपर्यंत. याच गोष्टीचा शोध लावून माणसाने काळवीट च्या शिंगचा वापर करून एक हत्यार बनवलं ज्याला #माडू नावानं ओळखलं जातं.

काळवीट च्या दोन टोकदार शिंगाना  एकमेकाला परस्पर विरोधी खिळ्याच्या साहाय्याने किंवा लाकडाच्या साहाय्याने बांधून त्याला धरायला मधोमध जागा करून हे हत्यार तयार केलं.जेव्हा लढाई व्हायची तेव्हा घोडेस्वार,पायदळ हे हत्यार वापरायचे  याची ताकद इतकी होती की तलवारीचा वार सुद्धा माडू वर झेलला जायचा आणि लढत असताना याचा वार झाला आणि याची टोक मानवी हाडाला लागली तर ती जखम लवकर भरून येत नसे.

शिवकाळा अगोदर ह्या हत्यारांचा वावर केला जात होता. पुरातन शस्त्र संग्रह करणारे काही निवडक संग्रहक यांच्याकडे हे हत्यार संग्रहित आहे. सदर फोटोतील हत्यार हे आमच्या घराण्यातील पुरातन शस्त्र पैकी एक असून याचा एक भाग काळाच्या ओघात किंवा स्थलांतर करताना हरवलं असल्याची शक्यता आहे.याची एकंदरीत स्थिती पाहता हे 250 ते 300 वर्ष पुरातन असलं पाहिजे असलं पाहिजे.

मंगेश गावडे पाटील

Leave a Comment