महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,152

महाबळेश्वर | भटकंती

By Discover Maharashtra Views: 3704 2 Min Read

महाबळेश्वर

महाबळेश्वर चे सदाबहार निसर्गसौंदर्य आणि भन्नाट पॉइंटस् हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. येथील स्ट्राबेरी, रासबेरी, जांभळं, लाल रंगाचे मुळे प्रसिध्द आहेत. महाबळेश्वरचे मध खूपच चविष्ट आणि प्रसिध्द आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळत असल्यामुळे पर्यटकांना निसर्गाच्या सहवासाबरोबरच रानमेव्याचा देखील चांगलाच लाभ घेता येतो.

वेण्णा लेक : महाबळेश्वरचा वेण्णा तलाव म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी. महाबळेश्वर दर्शन करताना निसर्गसौंदर्याचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी वेण्णा तलावाला आवर्जून भेट दिलीच पाहिजे. बोटिंग, मासेमारीबरोबरच निसर्गाच्या सानिध्यात राहून तिथल्या एन्टरटेनमेन्ट सेंटरमधले विविध प्रकारचे स्टॉल्स, खेळ पर्यटकांना वेगळाच आनंद देतात. येथे घोडेस्वारीही करता येते.

आर्थर सीट पॉईंट : महाबळेश्वरातील सर्वात प्रसिद्ध पॉईंट म्हणून ओळखला जातो. या पॉईंटच्या डावीकडे खोल दरीतून कोंकणात जाणारी सावित्री नदी आहे तर उजवीकडे घनदाट जंगले आहेत यालाच ब्रम्हारण्य असेही म्हणतात हि सर्व मनमोहक आणि आकर्षक दृश्ये इतर गोष्टींचा विसर पडायला भाग पाडतात. याच मार्गावर ‘टायगर स्प्रिंग’, ‘इको पॉईंट’, ‘एलफिस्टन पॉईंट’ आहेत.

ईको पॉईंट : आर्थर पॉईंटच्या मार्गावरच मनमोहक ,आरोग्यदायक आणि नैसर्गिक दृष्टया समृद्ध असा ईको पॉईंट आहे. इथे खोल दऱ्या, उंच पर्वत पहावयास मिळतात.

बॉम्बे पॉईंट : हा महाबळेश्वर मधील सर्वात प्रसिद्ध पॉईंट आहे.सर्व पर्यटक इथे मावळत्या सूर्याचे दर्शन घेण्याकरिता येत असतात.यालाच ‘सनसेट’ पॉईंट असेही संबोधतात.

विल्सन पॉईंट, कार्नेक पॉईंट, हेलन पॉईंट, एल्फीन्स्टन पॉईंट, बाबींग्टन पॉईंट, बॉम्बे पॉईंट, फॉकलंड पॉईंट, केट पॉईंट अशा अनेक उंचावरील ठिकाणांपासून खाली दिसणारी निसर्गदृश्ये नजरेत साठवता येतात. चिनमन फौल, धोबी फौल, लिंगमळा फौल्स अशा अनेक जलप्रपातांनाही अवश्य भेट दिलीच पाहिजे.

वर्षभरात कधीही जा, महाबळेश्वरचा निसर्ग आपल्याला कधीच निराश करणार नाही. पावसाळ्यात तर सरीआडून याचे सौंदर्य अधिकच खुलून येते.

माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti

Leave a Comment