महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,96,895

महामाया | आमची ओळख आम्हाला द्या

Views: 1415
3 Min Read

महामाया | आमची ओळख आम्हाला द्या –

भारतीय मूर्तीकलेचा इतिहास जर आपण बारकाईने अभ्यास असला तर बऱ्याच बाबी निदर्शनास येतील. भगवान बुद्धांच्या निर्वाणानंतर काही शतकात बौद्ध धम्मात हीनयान व महायान असे दोन पंथ निर्माण झाले. महायान पंथाच्या अनुयायांनी बौद्धांच्या मूर्तींची जागोजागी मंदिरात स्थापना करून तिची उपासना सुरू केली.सुरूवातीला स्तूपाच्या स्वरूपात पूजा केली जात असे.  त्याचे अनुकरण म्हणून हिंदूंनी मूर्ती पूजेच्या स्वरूपात ईश्वराची उपासना सुरू केली. प्रारंभी बौद्धांच्या विशिष्ट भागांचे अवशेष जतन करून त्यावर चैत्य बांधून पूजा करण्यास सुरुवात झाली. कालांतराने त्याचे रूपांतर बौद्धमूर्ती तयार करण्यात आली. परिणामी हिंदूंना ही त्यांच्या देवतांच्या मूर्तीची स्थापना करण्यास भाग पाडले. त्यांनीही विविध देवदेवतांच्या मूर्ती स्थापन करून मंदिरे बांधण्यास सुरुवात केली. हा इतिहास  कोणीही नाकारू शकत नाही.महामाया.

बौद्ध व जैनां मधील बर्‍याच मूर्ती हिंदू धर्मात  नव्या नावाने, रूपाने पुजल्या जाऊ लागल्या. बौद्ध धम्माची प्रतीक, चिन्ह ,आसन, अलंकार, मुद्रा यांचे अनुकरण हिंदू मूर्ती शास्त्रात केले गेले. हे जाणकारास नव्याने सांगण्याची जरूर नाही.

अशाच पद्धतीचे महामायेचे गजलक्ष्मी म्हणून झालेले रूपांतरण आपण पाहिले आहे. प्रस्तुत लेखात आपण शालभंजिका म्हणून ओळखली जाणारी सिद्धार्थ गौतमाची माता महामाया पाहणार आहोत. भारतीय मूर्ती शास्त्रात 32 प्रकारच्या देवांगणांचे  वर्णन व उल्लेख आहे. त्यात शालभंजिका  नावाची देवांगना आढळून येत नाही. शालभंजिका म्हणजे झाडाची फांदी तोडणारी स्त्री होय. या शिल्पातील स्त्री उभारलेल्या अवस्थेत दाखवली जाते. एका हाताने अथवा दोन्ही हाताने तिने झाडाची फांदी धरलेली दाखवली जाते. अंगावर विपुल प्रमाणात अलंकार देखील दाखवले जातात.

अशीच शालभांजीका हि होट्टलच्या सिध्देश्वर मंदिराच्या मंडोवरावर आहे. त्रिभंगावस्थेत उभी असलेली देवी द्विभुज असून तिने तिच्या दोन्ही हातांनी डोक्यावरील झाडाची फांदी घट्ट पकडली आहे. केशरचना अतिशय सुबक आहे. कानात चक्राकार कुंडले गळ्यात ग्रीवा, हार केयूर,कटकवलय,कंगन, पादवलय व पादजालक इत्यादी अलंकार परिधान केलेले आहेत. मुक्तद्दाम ,उरूद्दाम, नेसूच्या च्या वस्त्रारावरील मोत्याच्या लडी कलात्मकरीत्या अंकित केलेल्या आहेत. देवीने तिची मान डावीकडे झुकलेली आहे. चेहऱ्यावर स्मितहास्य आहे .

मुळात हे शिल्प सिद्धार्थ गौतमाचीमाता महामाया हिच्या शिल्पा पासून प्रेरित होऊन तयार झालेले शिल्पा आहे. लुंबिनी वनात सिद्धार्थाला जन्म देताना महामायेने झाडाच्या फांदीला धरून उभ्यानेच सिद्धार्थाला जन्म दिला. त्या वेळी तिने झाडाची फांदी हातात पकडलेली होती. अशा शिल्पांचे अंकर आपणास सांची स्तुपावर देखील दिसून येते. त्यामुळे हे शिल्प महामायेच्या शिल्पा पासून प्रेरित होऊन तयार झालेले शिल्पा आहे .त्यामुळे हिला  शालभंजिके ऐवजी महामाया म्हणणे उचित ठरेल. बौद्ध धम्मातील अशा अनेक मूर्ती आहेत की ज्यांच्यापासून प्रेरित होऊन हिंदू धर्मातील अनेक मूर्ती तयार झाल्या आहेत.त्यापैकीच हि एक होय.

डाॅ.धम्मपाल माशाळकर.
मूर्ती अभ्यासक,मोडी लिपी व धम्म लिपी तज्ञ,सोलापूर

Leave a Comment