महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,47,938

स्वराज्य रक्षिका महाराणी ताराराणी

By Discover Maharashtra Views: 4959 4 Min Read

महाराणी ताराराणी म्हणजे इतिहासातील स्ञीयांचे एक महत्वाचे पान

स्वराज्य रक्षिका महाराणी ताराराणी – Maharani Tararani

मराठ्यांच्या स्वातंञ्य युध्दाचे पहिले पर्व छञपती संभाजी महाराज यांची कारकिर्द आणि दुसरे पर्व छञपती राजाराम महाराज यांची कारकिर्द चालू असतांना 3 मार्च रोजी औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याचा बिमोड करून किल्ले सिंहगडी अकाली मृत्यू झाला…. यावेळेस सातारचा वेढा पडला होता पण छञपती मृत्यू पावल्याची वार्ता ऐकून मराठे त्वेषाने शौर्याने लढत होते मराठ्यांच्या स्वराज्याची सुञे ताराराणींनी(Maharani Tararani) हाती घेतली….

महाराणी ताराराणी आपल्या पतीच्या हयातीतच या राज्यकारभारात व लष्करी मोहिमांत भाग घ्यावयास सुरूवात केली होती….

मोघल इतिहासकार खाफीखान म्हणतो … ” ताराराणी ही राजारामाची थोरली बायको होय ती बुध्दिमान आणि शहाणी होती सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवर्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक झाला होता….

ताराराणींनी आपला पुञ शिवाजीराजे यांना गादिवर बसवून स्वराज्याची सुञे हाती घेतली यावेळी धनाजी जाधवराव दुसरे हंबीरराव मोहिते दुसरे राणोजी घोरपडे नेमाजी शिंदे शंकराजी नारायण परशुराम ञिंबक रामचंद्र अमात्य असे कुशल सेनानी होते….

मोघलांशी होणारा संघर्ष आता मराठ्यांसाठी आत्मीयतेचा ठरत होता हा संघर्ष १८_१९ वर्ष चालू होता राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांची बाजू थोडी कमजोर वाटू लागल्यास ताराराणींनी धैर्याने व हुशारीने आपली बाजू सावरली…

स्वातंञ्ययुध्दातील महाराणी ताराराणींचे चरीञ फार अभ्यासनीय आहे पंचवीस वर्षीय एक विधवा राणी औरंग्यासारख्या मुरब्बी हुशार कपटनीती असलेल्या सम्राटास लष्करी संघर्ष करावयास उभी राहते….

एक तरूणी सतत सात वर्षे लढून त्यास नेहमी पराभूतच करते ही घटनाच ताराराणींची किर्ती समजावून जाते मराठा राज्यकारभाराच्या सर्व सुञे त्या हालवीत होत्याच शिवाय त्या लष्करी मोहिमांच्या आखण्या ही करीत होत्या त्यांच्या राज्यकारभाराच्या कौशल्याबद्दल व लष्कराबद्दल शञूने काढलेले उदगार पाहू…

खाफीखान म्हणतो .. ” राजारामाची राणी ताराराणी हिने विलक्षण धुमधाम माजवली आहे तीच्या सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांचे व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधुम दिवसेंदिवस वाढतच गेली”

स्वराज्य रक्षिका महाराणी ताराराणी – Maharani Tararani

मराठ्यांच्या स्थितीचे वर्णन करतांना खाफीखान म्हणतो बादशहाने मराठ्यांच्या देशात शिरून त्यांचे गगनचूंबी किल्ले घेतले मराठ्यांना बेघर करून सोडले पण मराठ्यांचा पराक्रम वाढतच गेला बादशहा आणि त्याचे उमराव डोंगराळ प्रदेशात आहेत….

हे पाहून मराठे मोठमोठे सैन्य घेऊन बादशाही मुलखात घूसून आक्रमण करून उच्छाद मांडू लागले ताराराणींचे सरदार जेथे जेथे जात आपले कायम बस्तान बसवीत तेथे आपले कामविसदार नेमित तेथे आपले बायकामुले घेऊन माणसे हत्ती सैन्य तंबू इ. घेऊन वर्षांच्या वर्षे ते राहू लागले.

त्यांनी प्रदेश जिंकून घेऊन तो आपआपसांत वाटून घेतले आणि बादशाही पध्दतीने आपले कामविसदार सुभेदार राहदार इ. अधिकारी नेमले….

मराठ्यांनी चौथाई वसूल करण्यासाठी कामविसदार नेमले होते मराठे कर वसूलही करीत प्रत्येक सुभ्यात ते गढी बांधू लागले आणि भोवतालच्या मोघली सैन्यास लुटून ते तेथे मालमत्ता ठेवत…

मराठे ताराराणींच्या नेतृत्वाखाली अमदाबाद गुजरात पर्यंत लुटालुट करत पसरले होते मावळा अमदाबाद हे लुटून धुळीस मिळवले याचा परीणाम असा झाला की एका परगाण्यात दोन दोन सरंमजामदार निर्माण झाले शेवटी मराठेच टिकाव धरीत होते….

ताराराणी राजकुटूंबात जेष्ठ असल्याने राज्याची सुञे तर हाती घेतलीच पण त्यांचा राजकीय , लष्करी गुण दिसून आला एका पंचवीस वर्षीय तरूणीने अखेर औरंग्यास सळो की पळो करून सोडले होते मुरब्बी उमराव व सरदारांना ताराराणींनी स्वतः मोहिमा आखून बुडवले….

या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेली महीला एक भद्रकालीचे रूपच असते हेच ताराराणींचे कर्तुत्व दर्शवून जाते…

रणचंडी भद्रकाली स्वराज्यरक्षिका महाराणी ताराराणीसाहेब

जागर_इतिहासाचा जागर_नारीशक्तीचा

Leave a Comment