महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,232

महिषासुर मर्दिनी, निलंगा

Views: 1351
2 Min Read

महिषासुर मर्दिनी, निलंगा –

निळकंठेश्वर मंदिर (निलंगा, जि. लातुर) मंदिराच्या मंडोवरावरील देवकोष्टकात ही मूर्ती आहे. महिषासुराचा वध करण्यासाठी देवीने नउ दिवस उपासना केली. देवीला सर्व देवांनी आपली शस्त्रे बहाल केली. मग ती युद्धावर गेली अशी कथा आहे. या मूर्तीतील वेगळेपण माझ्या डोळ्यात चटकन भरले ते म्हणजे देवीच्या हातातील शंख व चक्र ही विष्णुची आयुधे. अभ्यासकांना ( Dr-Arvind Sontakke  आणि Maya Shahapurkar Patil )  मी विचारले की ही महिषासुर मर्दीनीच आहे का? चक्र धरण्याची पद्धतही जरा वेगळी आहे.(महिषासुर मर्दिनी, निलंगा)

शिल्पकाराने चारच हात दाखवले आहेत. सहसा आठ किंवा जास्त हात दाखवले जातात. महिषासुर केवळ डोके न दाखवता पूर्ण दाखवला आहे. खाली रेडाही पूर्ण आहे. डाव्या बाजूला सिंह आहे पण तो नीट दिसत नाही.

देवीचा त्रिशुळ जो भंगला आहे तो  जोरकसपणे तिरका महिषासुराच्या देहात घुसवला आहे. देवीचा एक पाय महिषासुराच्या देहावर एक तिरका जमिनीवर. अतिशय सुरेख कलात्मक असा तोल साधलेले शिल्प. तिचे किमान दागिने, चेहर्‍यावरचे ठाम भाव, नाजूकता स्त्रीची स्वाभाविकता न सोडता शक्ती प्रकट करायची मोठं अवघड कसब इथे साधल्या गेले आहे. किमान अलंकरण  आणि कमाल परिणाम असे हे शिल्प आहे.तिचे किमान दागिने, चेहर्‍यावरचे ठाम भाव, नाजूकता स्त्रीची स्वाभाविकता न सोडता शक्ती प्रकट करायची मोठं अवघड कसब इथे साधल्या गेले आहे. किमान अलंकरण  आणि कमाल परिणाम असे हे शिल्प आहे.

छायाचित्र सौजन्य दत्ता दगडगावे  लातूर.

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

Leave a Comment