महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,46,153

सुभेदार मल्हारराव होळकर

By Discover Maharashtra Views: 1773 2 Min Read

सुभेदार मल्हारराव होळकर –

पुण्यश्लोक छत्रपती थोरले शाहु महाराज यांच्या नेतृत्वात उत्तर हिंदुस्थानात शिंदे घराण्याचा संगतीने मराठा जरीपटका फडकवणारा वीर योद्धा,पेशव्यांच्या घरात वडीलकीचा मान असलेला मायाळू व्यक्ती सुभेदार मल्हारराव होळकर. मल्हारबांचे वडील लहानपणी लवकर गेले त्यामुळे त्यांचे बालपण मामाकडे म्हणजे भोजराज बारगळ यांच्यापाशी आमच्याच “तळोदे” गावात गेले..आज हि त्यांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा तळोदेवासी जपताय. मल्हारबांच्या तळोदे येथील निवासाबद्दल होळकरांच्या कैफियत मध्ये आलेले काही उल्लेख खालील प्रमाणे.

कैफियत कैलासवासी मल्हारजी होळकर यांनी स्वपराक्रम करून दौलत उभी केली, त्याचा इतिहास इस्तकबिल तागाईतअखेर येणेप्रमाणे :

(१) मौजे होळ मुरूम, नीरेचे काठी जेजुरीजवळ आहे. तेथे खंडूजी वीरकर खुटेकर धनगर चौगुले राहत होते. त्याजला “मौजे तळोदें परगणे सुलतानपूर” येथील “भोजराजजी बारगळ” याने आपली बहीण दिल्ही होती. तिचे पोटीं पुत्र जाहला.

त्याचे नाव मल्हारजी होळकर. तो काही दिवस त्या गावींच होता त्याचा पिता मृत्यु पावला. मल्हारजी होळकर मूल, तीन वर्षांचे असता, भाऊबंद मुलाची हेळसाड करू लागले बाईचे काही चालू दिले नाही वतन वाटा आपणच दाबून वहिवाट चालविली. बाईस नित्यकृत्याचाही आधार नाही. मुलास काही अपाय होईल असें समजून चिरजीवासुद्धा माहेरी भावापाशी येऊन राहिली. मल्हारजी होळकर मूळचे होळचे राहणारे म्हणून ‘होळकर’ नाव चालले काही मोठे झाल्यावर बारगळ यांनी भाच्यास घरची मेढरे चारावयास लाविलें दररोज रानात जाऊन मेंढया चारून सायंकाळी घरास यावे हा क्रम चालत असता, कोणे एके दिवशी अरण्यात दोन प्रहरा झाडाखाली मल्हारजी निद्रिस्त झाल्यावर, वारुळातून नाग निघून (त्याने) मुलावर फणीची छाया केली. तितक्यात मातुश्री घरीहून भाकरी घेऊन आली. तिने पाहिले भयभीत होऊन माघारी जाऊन भावास वगैरे वर्तमान कळवून त्याजसुद्धा तेथे आली. तो भुजग सर्वानी तसाच पाहिला. मनुष्याची भीड नागाचे दृष्टीस

पडल्यावर नाग वारुळात गेला. नतर मुलास सावध करून पाहिले असता, अन्य विचार दृष्टीस न पडला तेथेच मुलास भोजन घालून घरास घेऊन आले.

संदर्भ – होळकरांची कैफियत.

– प्रसाद पाठक

Leave a Comment