महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,665

तंजावरकर सरदार मानाजीराव जगताप

Views: 4219
4 Min Read

तंजावरकर सरदार मानाजीराव जगताप

तंजावर येथील मराठेशाही साम्राज्य म्हणजे इतिहासातील प्रत्येक मराठी व मराठ्यांचा अस्मिता, शौर्य, याचां प्रतीक आहे तसेच तेथील स्थानिक पातळीवर युध्द संघर्ष पण प्रचंड झाले आहे यासाठी संशोधन झाले पाहिजे असे वाटते.छत्रपती शहाजी राजे यांच्या नंतर मराठ्यांचा तंजावरकर गादीवर प्रतापसिंह महाराज सत्ताधारी झाले यावेळी इंग्रज, अर्काटचे नवाब, याच्याशी प्रचंड संघर्ष सुरू झाला कारण इंग्रज अधिकारी यांना तंजावर मध्य प्रदेशात शिरकाव करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते

रघुजी भोसले व फत्तेसिगं भोसले यांना चंदासाहेबाचा पराभव करून त्याला कैद केले, १७४९मध्ये तंजावरकर मराठे साम्राज्यात हस्तक्षेप करणार नाही या अटींवर सातारा कर छत्रपती नी चंदासाहेबाची सातारच्या कैदेतून सुटका झाली हिच गोष्ट तंजावर च्या मराठेशाही साम्राज्य साठी मारक ठरणार होते कारण त्यानंतर चंदासाहेबाने
कनार्टकात उपद्व्याप करण्यास सुरुवात केली त्यानंतर चंदासाहेबाने तंजावरकर मराठ्यांनी आव्हान दिले प्रथम अर्काटचा नवाब अनवरुद्दीखानाचा पराभव केला व तंजावर येथील प्रतापसिंह महाराजांनी आव्हान दिले.
चंदासाहेबाने प्रतापसिंहाकडे पैशाची मागणी केली ती छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी नाकारून निजामाचा मुलगा नासिरजंग याची मदत घेतली त्यामुळे तंजावरावर स्वारी करूनही चंदासाहेबचे अपयश आले कारण यावेळी अर्काटचा नवाब अनवरुद्दीखानाचा मुलगा नवाब महंमद अली याने प्रतापसिंह महाराजांनी मदत केली याचा राग चंदासाहेब यास आले, त्यामुळे चंदासाहेबाने फ्रेचांची मदत घेऊन महंमद अली विरूध्द युध्द पुकारले
ईकडे महंमद अलीने इंग्रजांची मदत घेतली..

महंमद अली यांच्या मदतीला छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी आपले सरदार मानाजी जगताप यास मदतीस पाठविले.. जून १७५२मध्ये घनघोर युद्ध झाले, मानाजी जगताप व चंदासाहेब यांच्यात लढाई झाले तेव्हा मानाजी जगताप यांना चंदासाहेब याचा पराभव केला व पकडून ठार मारले यामुळेच मानाजी जगताप यांची पराक्रमी प्रतापसिंह महाराज व नवाब महंमद अली यांच्या नजरेस आले.

या लढाईत मुरारराव घोरपडे व म्हैसूरचा नंदराज दलवाई यांना नवाब महंमद अली याने मदत केली होते यावेळी या विजयामुळे महंमद अली एवढा खूश झाला की त्याने तंजावरास दहा वर्षाची खंडणी माफ केली व कोईलाडी व यलंगाडू हे दोन परगणे मानाजीराव जगतापस जहागीर दिले पण चंदासाहेब विरोधात नवाब महंमद अली यास मदत करणार मुरारराव घोरपडे व नंदराज दलवाई यांना जहागीर म्हणून अनुक्रमे त्रिचनापल्ली व श्रीरंगम दोन शहरे मागितली पण मानाजीराव जगताप सारखे मात्तबर मराठे लढवय्ये व प्रतापसिंह महाराज सोबत आहेत म्हणून नवाब महंमद अली यांनी नकार दिल्याने फ्रेचांची मदत घेऊन नवाब महंमद अली विरूध्द युध्द पुकारले तसेच दलवाई व घोरपडे यांनी छत्रपती प्रतापसिंहाचा दिवाण सखोजी नाईक याला लाच देऊन फितूर एवढेच नाही तर मोठ्या हिंमतीने सरदार मानाजीराव जगताप यास बडतर्फ करण्यास भाग पाडले..
यावेळी १७५३/१७५४ या दोन वर्षात नानासाहेब पेशव्यांनी कनार्टकात तीन स्वारी केलाय श्रीरंगपट्टणला शह दिल्यावर म्हैसूर कर जेरीस येतील व तंजावर चे संकट आपोआपच दूर होईल पेशव्यांनी केले पण प्रत्यक्षात तंजावराकरच्या मदतीस महाराष्ट्र तुन मदत आले नाही उलट गुत्तीकर मुरारराव घोरपडे , महैसुरकर नंदराज दलवाई, व फेंच्र याचा मदतीने घोरपडे याचा सुयंक्त फौज तंजावर वरात चालून आले हे दुर्दैव म्हणावे लागेल.

यावेळी चंदासाहेब विरोधात विजय मिळवून देण्यार सरदार मानाजीराव जगताप यांच्या बडतर्फ रद्द करून पुन्हा मराठा सैन्याचे नेतृत्व प्रतापसिंह महाराजांनी दिले या लढाईत मानाजीराव जगताप यांना महाराष्ट्रातील सरदार मुरारराव घोरपडे याचा पराभूत केले व तंजावर मधून हाकलून दिले तंजावर येथे आपले वखार मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार फ्रेंच वखारवाले म्हैसूर कर पराभवाचा सामना करावा लागले तो मराठ्यांचा सरदार मानाजीराव जगताप यांच्या मुळे मराठ्यांचा तंजावरकर साम्राज्य पुन्हा एकदा कायम ठेवली तो मानाजीराव जगताप यांना हे मात्र निश्चित.

यावेळी तंजावरकर प्रतापसिंह महाराजांनी या लढाईनंतर ताबडतोब बडतर्फ केले हे दुर्दैव या मानाजीराव याचा दुसऱ्या वेळी बडतर्फ मुळे मराठ्यांचा तंजावर साम्राज्य खिळखिळी झाले हे मात्र खरे आहे कारण दलवाई, घोरपडे, फ्रेंच याचा पराभव करणार सरदार मानाजीराव जगताप यांच्या प्रतापसिंह महाराजांनी मोठ्या पदावर नेमणे आवश्यक होते..
परंतु तंजावरचे मुख्य दिवाणी सखोजी नाईक यांच्या पुन्हा चिथावणी वरून मानाजीराव याचा तंजावर दराबरातुन बडतर्फ करण्यात आले हे दुर्दैव असे
इतिहासातील एक अप्रकाशित वीरांच्या स्मृती जागृत करण्यासाठी प्रयत्न करावेत येवढे प्रयत्न आम्ही केली बाकी.

Leave a Comment