महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,84,887

मंजुघोषा | कोरवलीच्या सुरसुंदरी

By Discover Maharashtra Views: 1287 2 Min Read

मंजुघोषा –

कोरवलीच्या सुरसुंदरी लेख क्र.४ –

कोरवलीच्या मंदिराच्या मंडोवरावर अनेक स्वर्गीय ललना  कलाकारांनी मोठ्या खुबीने तयार केलेल्या आहेत. इतर सुंदरीपेक्षा या मंदिरा वरच्या सुरसुंदरी ह्या वेगळ्या वाटतात. कोरवली मंडोरावरील सुरसुंदरी हि मंजुघोषा या नावाने ओळखली जाते. इतर सुरसुंदरी पेक्षा ही वेगळे वाटते, ती तिच्या डाव्या आणि उजव्या हातात तिने कलात्मकरीत्या पकडलेल्या दोन खड्गांमुळे.  दोन्ही शत्रे धारदार सूर्‍यासारखी वाटतात.  जशी हातात कट्यार असते तशी ही शस्रे आहेत.

आपल्या संपूर्ण देहाचा भार डाव्या पायावर तोलून आणि उजवा पाय पूर्णपणे गुडघ्यापर्यंत उचलून नृत्य करणारी ही नृत्यांगणा कोरवली या ठिकाणी पहावयास मिळते. मंजुघोषा म्हणून ओळखली ही सुरसुंदरी फार तुरळक प्रमाणात कोणत्याही मंदिरावर पहावयास मिळते. महाराष्ट्रात सुरसुन्ंदरी साठी प्रसिद्ध असणारी  मंदिरे आहेत. त्यामध्ये होट्टल, निलंगा, धर्मापुरी, पानगाव, मार्कंडा, खिद्रापूर येथे अतिशय देखण्या सुरसुंदरींना मंदिरांवर स्थान दिलेले.परंतु मंजुघोषेचा अंकन अगदि मोजक्या मंदिरांवर आहे. अनेक स्वर्गीय अप्सरांच्या जोडीला मंजुघोषा दर्शवली जाते. कोरवलीची हि मंजुघोषा तिच्या हालचाली मध्ये पूर्णपणे गुंगलेली तरीही आपल्या घाटदार शरीराचा भार तोलत उभी आहे.

या सुरसुंदरी ची केशरचना मनाला भुरळ पाडणारी आहे .तिच्या किंचीत पण लंबगोलाकार चेहऱ्यास अधिक उठावदार देणार गोलाकार पर केशरचना असून दर्शनी भागावर काही कुंतलबटांना नक्षीदार पद्धतीने बसवण्यात आलेल्या आहे. तिच्या मस्तकावरील थोडेसे केस दोन्ही बाजूस तिच्या कानापर्यंत आकर्षक रीतीने बसवलेले असून एका कानापासून डोक्यावरून दुसऱ्या कानापर्यंत येणारे तिचे मुलायम केस महिरपी प्रमाणे वाटतात चेहरा स्पष्टपणे दिसत नाही तथापि तिचे नेत्र कमल, नासिका  उठावदार आहे.

भलीमोठी कर्णफूले लयबद्ध हालचाल करीत असल्याचे दिसते. उजवा हात काटकोनात वर उचललेला असून त्यामध्ये घट्ट पकडलेले शास्त्र हातातील अलंकार दंडातील केयूर अर्थात वाकी  कोरलेले आहेत. कटी सूत्र, मुक्तदाम पादवलय आणि पादजालक , वस्र, आभूषणे तिच्या एकंदरीतसौंदर्यात अधिकच भर टिकतात. नृत्याचा ताल धरलेल्या तिच्या दोन्ही पायाच्या मागून तिच्या हालचालीबरोबर लयबद्ध हलणारा तिच्या वस्त्राचा सोगा दाखवण्यास कलाकार विसरलेला नाही. अशीही नेत्राची पारणे फेडणारी मदनिका कोरवली च्या मंदिरावर स्थित आहे.

सुरसुंदरी असली तरी ती शत्रू मर्दिनी आहे .नृत्यात मग्न झालेली हातामध्ये शस्त्र पकडलेली ही विरांगणा सुरसुंदरीला काहीतरी संदेश भक्तांना द्यावयाचा आहे. खूप रेखीव  स्वरूपाचे हे शिल्प पर्यटकांना व कलाप्रेमींना आकर्षक करणारे आहे.हेशिल्प घडवित असताना कलाकाराने आपल्या हातचे कोणतेही कसब राखून ठेवलेले नाही.

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

Leave a comment