मऱ्हाटे शाही –
मराठ्यांनी अफाट पराक्रम करून नर्मदेपार स्वराज्याचा भगवा ध्वज फडकविला ! शिवछत्रपतींचे स्वप्न पूर्ण केले.अखंड भारतभर मराठ्यांनी हा भगवा ध्वज दुमदुमत ठेवून अगदी अटकेपार झेंडे रोवले. याच मराठे शाहीच्या उत्कर्ष काळात मराठ्यांनी त्या त्या प्रांतात स्वतःच्या सार्वभौमत्व ची नाणी पाडली.मऱ्हाटे शाही
खालील छायाचित्रात दिसताहेत त्यातील पहिले नाणे जे तंजावर इथे पाडलेले तांब्याचे नाणे आहे. ज्यावर कट्यारीच्या दोन्ही बाजूला “राम” असे लिहिलेले आहे. तसेच मराठयांनी अहमदाबाद (गुजरात) येथे इ.स. १७९७ मध्ये पाडलेली चांदीची नाणी आहेत. ही नाणी पानिपत युद्धानंतरची आहेत. पानिपत नंतरच्या काळात ही मराठ्यांचा भगवा बरेच वर्षे उत्तरेत दुमदुमत होताच!
या नाण्यांवर देवनागरी भाषेत मध्ये “राम” अशी लिहिलेले आहे ! यात आपणास अर्धा आणि एक रुपया पाहवायस मिळतो आहे.तसेच त्यावर अंकुश चे चिन्ह ही आहे . मराठयांनी त्यांच्या बऱ्याच नाण्यांवर पवित्र शुभचिन्हे छापवयास सुरुवात केली होती. असेच एक नाणे नुकतेच संग्रहात आले. ते म्हणजे मुघल शासक मुहम्मद शाह याने “अहमदाबाद” इथे १७२४ साली पाडलेले चांदीचे नाणे. या नाण्यावर “राम” असा छाप मारलेला दिसतो. ज्याला नाणक शास्त्रात counter mark असे म्हटले जाते. बरेच वेळेस एखादे अस्तित्वात असलेल्या नाण्यावर असे छाप मारलेले दिसतात, त्यातीलच हे एक नाणे आहे.
मराठ्यांनी त्यांच्या साम्राज्य विस्तार काळात १७ व्या शतकात “अहमदाबाद” येथे पाडलेली ही खास नाणी आजच्या या रामनवमी च्या पवित्र दिवसानिमित्त आपणासमोर माझ्या मराठा नाणी संग्रहातून दर्शवित आहे !
किरण शेलार