महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,35,464

मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९ भाग १

By Discover Maharashtra Views: 1310 3 Min Read

मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९ भाग १ –

पार्श्वभूमी  :

१७०७ च्या दरम्याने परिस्थितीच अशी झाली होती की  मराठ्यांच्या सततच्या आक्रमणामुळे मोगल त्रस्त झाले होते . अहमदाबादच्या संरक्षणासाठी नुकतीच मोठी खंडणी द्यावी लागली होती . छत्रपती शाहूंना कैदेत ठेऊन  धोका वाढू लागला होता .  दक्षिणेतही  मोगलांना सुरक्षा आवश्यक वाटू लागली होती . अशावेळी शाहूंशी मैत्रीपूर्ण संबंध हाच एकमेव मार्ग होता . मोगलांना  स्वतःच्या सुरेक्षेसाठी महाराज स्वतंत्र राहणे गरजेचे होते . शाहू मोगलांच्या प्रांतात आक्रमण करणार नाहीत आणि प्रसंगी मदतीला येतील  असा  भरवसा मोगलांना होता . अशा परस्पर समजुतीने शाहू महाराज महाराष्ट्रात आले . तरीही प्रसंग कठीण होता . महाराजांच्या मातोश्री व बंधू मोगलांच्या ताब्यात होते . तरीही महाराजांनी  आक्रमक भूमिका घेतली यात त्यांची पूर्वतयारी दिसते .(मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९)

छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी १७०७ पासून लगेचच  हालचाली करून विस्ताराची वाट मोकळी करून दिली . दिशा मिळताच मराठा सरदारांनी सरस कामगिरी करून शाहूंचे धाडसी निर्णय यशस्वी केले . मराठा स्वराज्यावरील ही त्यांची निष्ठा होती .

खानदेश, गोंडवण, वऱ्हाड, हैद्राबाद, कर्नाटक व माळवा स्वराज्यात आले . चौथ , सरदेशमुखी वसुलीस सुरुवात करून आर्थिक नियोजनास दिशा दिली .

तरीही बरेच लहान मोठे लेखक मराठा साम्राज्य विस्ताराबद्ल व त्यातील छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेविषयी बोलताना , याने पाठिंबा दिला , त्याने सहाय्य केले  अशी मांडणी करतात . पण वास्तव हे आहे की ,  कैदेत असतानाच छत्रपती शाहू महाराज प्रमुख मराठा सरदार व  राजपूत राजे यांचे संपर्कात होते .

महाराज महाराष्ट्रात आल्यानंतर मेवाडचे महाराणा , सवाई जयसिंग व अजितसिंह यांनी एकत्र येऊन सवाई जयसिंगामार्फत पत्र लिहून त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा केली होती . त्यासाठी आपल्या पूर्वजांच्या एकमेकाशी असलेल्या स्नेहबंधांची आठवणही करून दिली . हा शाहूंबद्दलचा त्याचा आत्मविश्वास म्हणजे त्यांच्या समर्थ नेतृत्वाची कबुलीच आहे .

महाराष्ट्रात आल्यावर त्यांना येऊन मिळाले ते मराठा साम्राज्याचे निष्ठावंत राजसेवक होते . शाहूंचे नेतृत्व आणि सामर्थ्य जाणूनच ते शाहूंसोबत होते . वारसाहक्काने राज्य छत्रपती थोरले शाहू महाराज यांचेच होते .

शाहूंकडे जे आले त्यांच्या कर्तबगारीला राजाश्रय मिळाला . शाहूंचे नेतृत्व , आर्थिक पाठबळ , पूर्वनियोजित रणनीती याने जे आले त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला , ते यशस्वी झाले  .  राजाच्या सेवेतच राजाने दिलेल्या पदाच्या अधिकारात  कर्तृत्व उजाळले .

शाहूंबद्दल अनेकांनी आशीही आवई उठवून दिलीय की त्यांनी बादशहाचे मांडलिकत्व मान्य केले होते . पण राज्यविस्तारासाठी केलेली व्यूहरचना पाहता त्यात काही तथ्य दिसत  नाहीय . छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत मोगलांची पर्वा न करता साम्राज्य विस्तार केला हे निर्विवाद सत्य आहे .

लेखन माहिती  :सुरेश  जाधव.
इतिहास माहितीकार

मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९ भाग २

मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९ भाग ३

Leave a Comment