महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,52,863

मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९ भाग २

By Discover Maharashtra Views: 1386 2 Min Read

मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९ भाग २ –

मराठा स्वराज्याचे विस्ताराचे जनक छत्रपती शाहु महाराज व इ सन १७१९ चा करार –

इ सन १७१५-१६ या काळात सेनाखासखेल खंडेराव दाभाडे, सरलष्कर सुलतानजी निंबाळकर, नेमाजी शिंदे व कान्होजी भोसले आदी मराठा सरदारांनी मोगलाचा दक्षिण सुभेदार सय्यद बंधुपासुन पुणे, माळवा व कर्नाटक  हे प्रांत पराक्रमाने जिंकुन घेतले. परिणामी सय्यदबंधुस शाहु महाराजांसोबत करार करणे भाग पडले. तसेच याच काळात दिल्लीत देखिल सय्यदबंधुस विरोध होत होता. हा करार इ सन १७१८ साली झाला आणी तो खुद्द छत्रपती शाहु महाराज व सय्यद हुसेन यांच्यात झाला, याची कलमे पुढील प्रमाणे.(मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९ भाग २)

१) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळेस स्वराज्यात असलेले सर्व प्रांत , तमाम गडकोटासह शाहुंच्या हवाली करावे.

२) सय्यद अलीकडुन मराठा सरदारानी जिंकलेले प्रदेश म्हणजे खानदेश, गोंडवण, वऱ्हाड, हैद्राबाद, कर्नाटक व माळवा या भागातले नमुद केल्याप्रमाणे मोगलानी सोडुन देऊन मराठ्यंच्या स्वराज्यात सामील करावे.

३) मोगलांच्या दक्षिणेतील मुलुखावर चौथ,व सरदेशमुखी हक्क मराठ्यानी स्वतः वसुल करावे,या चौथाईचे मोबदल्यात आपली १५,००० फौज मराठ्यानी बादशहाचे मदतीस ठेवावी आणी सरदेशमुखीच्या मोबदलात मोगलांच्या मुलुखात चोऱ्या वगैरेचा बंदोबस्त करावा.म्हणजे संरक्षण करावे.

४) कोल्हापुरच्या संभाजीस शाहुनी उपद्रव देऊ नये.

५) मराठ्यानी बादशहास दहा लाख रु खंडणी द्यावी.

६) शाहुंचे कुटुंब , बंधु मदनसिंह वगैरे दिल्लीच्या कब्जात आहेत त्याना मुक्त करुन स्वदेशी मराठ्यांच्या ताब्यात पावते करावे.

यात विशेष एक बाब अशी आहे की,या बाबतचे बादशहाचे लेखी फर्माण पुढे यायचे होते, शाहु महाराजानी मात्र हा तह , लगेच अमंलात आणण्यास सुरुवात केली.त्या संबंधीचे शाहु महाराजंचे हुकुम १ ऑगस्ट १७१८ चे उपलब्ध आहेत.

यावरुन छत्रपती शाहु महाराज बादशहाच्या या लेखी फर्मानास काय किंमत देत होते हेच सिद्ध होते.

तसेच कलम दुसरे , खुप महत्वाचे आहे. यात इ सन १७१५-१६ साली मराठा सरदारानी (खंडेराव दाभाडे,सुलतानजी निंबाळकर,कान्होजी भोसले, नेमाजी शिंदे आदी) जिंकलेले मोगल प्रदेश खानदेश,माळवा,पुणे ,गुजराथ व कर्नाटक हे मराठ्यांकडे ठेवावे. म्हणजे इ सन १७१५-१६ सालीच शाहु महाराजांच्या हुकुमाने मराठा सरदारानी मराठा स्वराज्याचा विस्तार चालु केला होता हेच सिद्ध होते.

लेखन माहिती  :सुरेश  जाधव.
इतिहास माहितीकार

मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९ भाग १

Leave a Comment