महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,24,691

मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९ भाग ३

By Discover Maharashtra Views: 1263 2 Min Read

मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९ भाग ३ –

दिल्ली दरबारात सय्यद अब्दुल्ला च्या विरोध्द बादशहाने त्याचा काटा काढण्यासाठी विविध कारस्थान रचली होती. बादशहाच्या या कारस्थानाना तोंड देण्याकरिता त्याने आपला भाऊ हुसेन यास दिल्लीत त्वरीत निघुन येण्यास २९ सप्टेंबर १७१८ रोजी कळवले. त्याप्रमाणे सय्यद हुसेन दिल्लीस जाण्यास औरंगबादेहुन नोव्हेंबर १७१८ मध्ये मराठ्यासह निघला.त्याच्याबरोबर स्वतःचे ८००० घोडेस्वार आणी मराठ्याकडील सेनापती खंडेराव दाभाडे याच्या नेत्रुत्वाखाली राघोजी शिंदे, प्रधान बाळाजी विश्वनाथ, संताजी भोसले, राणोजी भोसले,उदाजी चव्हाण, नारो शंकर, पिलाजीराव जाधवराव, केरोजी पवार, तुकोजी पवार, आदी प्रमुख सरदारासह आपल्या १६०००सैन्यासह हजर होते.हे मराठा सरदार व सैन्य छत्रपती शाहु महाराज यांच्या हुकुमानेच रवाना झाले होते. सय्यद बंधुस या मदतीच्या बदल्यात करार करवुन घेणे हे धोरण शाहु महाराजानी ठेवले होतै.(मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९ भाग ३)

त्याप्रमाणे दिल्लीत सय्यदबंधुस मराठा सैन्यानी मदत केली व तेथे दोन बादशहा बदलवुन तिसरा आपल्या मर्जीतला बादशहा सय्यदबंधु, शाहु महाराज व अजितसिंहाने बसवला, त्या बदल्यात मातुश्री येसुबाईसाहेब, दुर्गबाईसाहेब, जानकीबाईसाहेब व मदनसिंह व इतर राजकैदीची सुटका , तसेच करारावर शिक्कामोर्तब शाहु महाराजानी सय्यद बंधुसोबत सेनापती खंडेराव दाभाडे यांच्या नेत्रुत्वाखाली सैन्य पाठवुन करवुन घेतले . यात वकिल यादव याने तेथे करारावर शिक्कामोर्तब करण्याचे व प्रधान बाळाजी विश्वनाथ यानी कागदपत्र दक्षिणेत आणण्याचे काम केले.

ब】 छत्रपती शाहु महाराज यानी मोगलांच्या आक्रमक चढाईस आळा घालण्यासाठी इ सन १७१५ च्या सुरुवातीसच खंडेराव दाभाडे, रायाजी प्रभु, राजजी थोरात याना गंगथडीच्या बाजुस मोगलावर पाठवले आणी त्यानी तेथे आक्रमण केले.

क】 २ एप्रील १७१५ रोजी शाहु महाराज यानी खंडेराव दाभाडे व कान्होजी भोसले याना ३०,००० सैन्यानिशी नर्मदा ओलांडुन माळव्यात घुसवले.तसेच आणखी मराठा सैन्य टोळी वढवाहजवळ नर्मदा उतरुन कंपेल परगण्यात घूसवली. येथे मोगल सरदार सवाई जयसिंह व मराठा सैन्य यांच्यात लढाई झाली. परंतु यात मराठा सैन्याचा पराभव झाला.जयसिंहाने या प्रांताची व्यवस्था लावली.परंतु ही व्यवस्था अल्पकाळच टिकली.

लेखन माहिती  :सुरेश  जाधव.
इतिहास माहितीकार

मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९ भाग १

मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९ भाग २

Leave a Comment