मराठी भाषा –
इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी,अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करता,करता ब्रम्हविध्या म्हंटले आहे,शब्दब्रह्मही म्हंटले आहे।याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते।अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो. महाराष्ट्रातील मराठीभाषा प्रत्येक प्रांताची निराळी. ती तेथील लोकांची होते आणि ती आवडते. आपली मराठी भाषा संस्कृत भाषेतून आली. तशा भारतातल्या बहुतेक सर्व भाषा संस्कृत भाषेपासून निर्माण झाल्या.
आपली मराठीभाषा सर्व महाराष्ट्राची जरी एक असली तरी तीच दर बारा कोसावर बदलते. लेखी भाषातीच असली तरी बोलीभाषेत फरक होतात. तिचे हेल वेगळे होतात. मराठी भाषेतसुद्धा असे वेगळे प्रकार होतात. कोकणातली मालवणी भाषा, घाटावरची घाटीभाषा, देशावरची भाषा, वऱ्हाडी भाषा वेगळी, मध्यप्रांत/मध्यप्रदेशातली हिंदी मिश्रित मराठी भाषा आणि गोव्याकडील कोंकणीभाषा वेगळी असते. मराठीभाषा लवचिक आहे थोड्या थोड्या फरकाने शब्दाचे अर्थ बदलतात. मुंबईची मराठीभाषा हल्ली खिचडी भाषा झाली आहे. शुद्धमराठी राहिली नाही. तिच्यात हिंदी, मराठी, इंग्रजी यांची भेसळ झाली आहे. हिंदी आणि इंग्रजी सिनेमा पाहूनभाषा अशी झाली आहे.
पूर्वी मराठीला राजभाषेचा मान नव्हता, पण आता काही प्रमाणात आहे. कशीही असो ती मराठीच म्हणून मराठी माणसाला आवडते. आपल्या भाषेचा आपल्याला आभिमान असतो. मी कोणीही असतोतरी चाललं असतं. पण मी मराठीआहे याचा मला अभिमान आहे. कारण अमृताशी पैजा जिंकणारी माझीभाषा आहे. मी मराठीत ओव्या गातो आणि शिव्याही मराठीतच देतो. या भाषेच्या प्रत्येक शब्दात, मला तोच आईचा गोडवा जाणवतो. जगाच्या पाठीवर फिरतो कुठेही, तरी जिभेवर असते मराठी. अडलं नाही अजून कुठेही, कारण रक्तात आहे मराठी !
© अचिंत्य