मार्लेश्वर | भटकंती
रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर नावाचा एक छोटासा तालुका आहे. त्याच तालुक्यात देवरुख ह्या गावापासून २० किमी अंतरावर मार्लेश्वर हे शिवाचे प्रसिद्ध ठिकाण आहे. हे शिवस्थान डोंगरावरील गुहेत आहे.
गावापासून दूर असलेल्या छोट्याश्या गुहेत असलेले हे ठिकाण निसर्गरम्य व हिरव्यागार वनराईने नटलेले आहे. पायथ्यापर्यंत गाडी जाते. ५२० पायऱ्या चढून पार केल्यानंतर मार्लेश्वर हे गुहा मंदिरातील देवस्थान येते. ह्या गुहेत दोन शिवपिंडी आहेत, त्यातील एक मल्लिकार्जुन तर दुसरी मार्लेश्वर ह्या नावाने ओळखल्या जातात. येथे दर मकर संक्रांतीला शिव-पार्वतीचे लग्न लावले जाते . मार्लेश्वर हा वर तर साखरपा ह्या गावाची भवानी मंदिर (गिरिजादेवी) ही वधू समजून लग्न लावले जाते. ह्या शिव पिंडी स्वयंभू आहेत.
ह्या स्थानाचे एक आकर्षण म्हणजे येथे वाहणारा धबधबा. सुमारे २०० फूट उंचीवरून पडणारा हा धबधबा धारेश्वर ह्या नावाने ओळखला जातो. सह्याद्रीच्या कडेकपारीतील निसर्गाची खरी शोभा येथूनच पाहायला मिळत असल्याने पावसाळी पर्यटनासाठी येथे मोठी गर्दी होत असते.
माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti