महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,35,487

मार्टेलो टॉवर

By Discover Maharashtra Views: 1303 1 Min Read

मार्टेलो टॉवर –

“मुंबई.” अनेक इतिहास आपल्या उराशी बाळगून जगाच्या अर्थकारणाचा कणा असलेले महानगर होय. पोर्तुगीज, इंग्रज, शिवकाळ, शिवउत्तरकाळ, पहिले भारतीय स्वातंत्र्यसमर, भारतीय स्वातंत्र्यलढा, भारतीय स्वातंत्र्य, संयुक्त महाराष्ट्र लढा एक ना अनेक घटनांची ही मायानगरी साक्षीदार आहे. या साऱ्या गोष्टींच्या खाणाखुणा आपणास इथे पदोपदी मिळतील. इथल्या “असण्याला”  इतिहास आहे अन “नसण्याला” सुद्धा इतिहासच आहे. हा इतिहास कधी दिसतो तर कधी उशिरा दिसतो. तसंच हे मार्टेलो टॉवर, माऱ्याची जागा.

या मुंबई (तत्कालीन बॉम्बे) वर राज्य करायचे असेल तर या भूभागाच्या दोन्ही बाजूला असलेल्या पाण्यावर वर्चस्व गाजवावे लागेल. याच कारणासाठी “अँटॉप हिलच्या” पूर्वेस असलेल्या खाडीमुखावरील हा “मार्टेलो टॉवर”.  शत्रूंच्या जहाजांपासून आपल्या भूभागाचे रक्षण करणारा किल्ल्यासम बुरुज.

१० ते १५ सैनिक बसू शकतील एवढी जागा, दोन-चार तोफा राहू शकतील असा वरचा भाग, तोफेसाठी लागणाऱ्या दारूचा साठा करण्यासाठी तळमजला अशाप्रकारे या वास्तूची एकंदर रचना असते. बघायला गेलो तर मोठा बुरुजच. पण जणूकाही छोटा किल्ला. अवश्य पहा.

Mohan Farade 

Leave a Comment