महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,512

मस्तानीसाहेब!

By Discover Maharashtra Views: 3714 4 Min Read

मस्तानीसाहेब!

पुस्तक लेखमाला क्रमांक -१०.

मस्तानी हे नाव जरी उच्चारले तरी आताच्या पिढीला आठवते ते “बाजीराव मस्तानी” चित्रपटात नृत्य केलेली आणि त्यांच्या फक्त प्रेमात अखंठ बुडालेले बाजीराव पेशवा.या झाल्या मसाला भरून बनविलेल्या चित्रपट आणि कादंबरी यांच्या गोष्टी.मराठा इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांपासून ते पेशवाई पर्यंत अशी कैक उदाहरणे आहेत, जी कादंबरी कारांनी अतिशय विचित्र पद्धतीने अक्षरशः “रंगविली”. पण आपण जर मस्तानीसाहेब यांच्यावर अभ्यास करावयास गेलो तर प्रत्यक्षात मात्र काही वेगळेच चित्र पहावयास मिळते.

बुंदेलखंड च्या राजा छत्रसाल यांनी मदत मागताना “राखो  बाजी लाज” असे लिहिलेले पत्र तर सर्वज्ञ आहेच. त्या वेळेस त्यांना मदत करून परत येताना बाजीरावांनी मस्तानीसाहेब यांना पुण्यात आणले असा उल्लेख आहे.त्याच संदर्भानुसार मस्तानीसाहेब या राजा छत्रसाल यांची कन्या असा उल्लेख सापडतो. त्यांना अजून दोन भाऊ ही होते अशी माहिती मिळते. पुण्यात आल्या त्यावेळी त्यांचे वय जेमतेम १६-१७ वर्षे असल्याचा समजते. त्यावेळी बाजीरावांनी “खांडा” पद्धतीने मस्तानीसाहेब यांच्याशी बुंदलेखंड इथे विवाह केला असा उल्लेख आहे. पण त्यानंतर पुण्यात येऊन त्यांनी पाबळ च्या इथे त्यांच्याशी विधिवत विवाह केल्याचा उल्लेख आहे.

त्यावेळेस मस्तानीसाहेब यांना “पाबळ, लोणी आणि केंदूर” या तीन गावांची स्वतंत्र जहागिरी देण्यात आली होती.

बाजीराव अणि मस्तानीसाहेब यांना एक पुत्र प्राप्ती ही झाली. त्याचे नाव “समशेर बहादुर” किंवा ” कृष्णसिंग” असे आढळते. हाच वीर पुढे पानिपतात मराठयांच्या तर्फे लढताना धारातीर्थी पडतो.

पहिले बाजीराव यांचा रावेरखेडी इथे ज्वराने  मृत्यू झाल्यावर काशीबाई साहेब या रावेरखेडी ला गेल्याचा उल्लेख सापडतो. पण त्याच वेळेस मस्तानीसाहेब यांचाही थोड्याच दिवसात मृत्यू होतो.मस्तानीसाहेब यांच्या मृत्यू हा त्यांच्या वयाच्या अवघ्या २६-२७ व्या वर्षी झालेला आहे.याचा अर्थ बाजीराव आणि त्यांचा सहवास हा अवघा १० वर्षे चा आहे.सध्या मस्तानीसाहेब यांची  समाधी पाबळ इथे आपणास पहावयास मिळते.आपण जर कधी छत्रपती शंभूराजे यांची समाधी “वढू” इथे पाहण्यासाठी गेलात तर तेथूनच अंदाजे २१ किमी वर “पाबळ”हे गाव आहे.तिथे गावाच्या बाहेर मस्तानी समाधी किंवा मस्तानी मशिद हे ठिकाण आहे.

मस्तानीसाहेब आणि काशीबाईसाहेब यांचे संबंध जिव्हाळ्याचा असल्याचे जाणवते. पण या विषयी बरीच मतांतरे आहेत. याचे कारण की मस्तानीसाहेब यांच्याविषयी असलेले कमी प्रमाणात लिहिले गेलेले  साहित्य. मग ते पेशवे दप्तर असो की बखरी,मस्तानीसाहेब यावर अगदी “पेशव्यांची बखर” मध्ये ही थोडकाच उल्लेख आढळतो.

त्यातून प्रमोद ओक यांनी लिहिलेल्या”पेशवे घराण्याचा इतिहास” या दोन खंडी ग्रंथात बऱ्याच पैकी उल्लेख आढळतो मस्तानीसाहेब यांच्यावर.

पण मराठी भाषेत फक्त मस्तानी यांच्यावर चरित्र लिहिण्याचे श्रेय जाते ते श्री द.ग. गोडसे यांना. त्यांनी १९७९ साली महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रांत याविषयी लेख लिहावयास सुरुवात केली.

त्यांच्या “समंदे तलाश”हा ग्रंथात तो लेख वाचावयास मिळतो. मात्र समर्पित चरित्र अभ्यासायला मिळते ते  त्यांनी लिहिलेल्या “मस्तानी मस्तानी” याच ग्रंथात.१९८९ साली लिहिलेला ग्रंथ अतिशय माहितीपुर्ण व उपयुक्त आहे.

त्यानंतरच्या काळात २००० साली लिहिल्या गेलेल्या प्रा.विद्या सप्रे यांनीही “मस्तानी!कंचनी नव्हे कुलकामिनी” या ग्रंथात बऱ्यापैकी संदर्भ मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यातील काही माहिती ही अगदीच विचार करण्याजोगी आहे.

त्यानंतर मस्तानी या विषयावर २०२० या वर्षी जानेवारीत अजून एक महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे.डॉ.सौ.लता अकलूजकर लिखित “मस्तानी एक नवीन दृष्टीकोन”. याही संदर्भ ग्रंथात त्यांनी खूपच महत्वाची माहिती लिहिलेली आहे.

अशी ग्रंथ निर्मिती होणे हीच काळाची गरज आहे.कारण त्यातूनच अनेक महत्वाची आणि योग्य माहिती आपणासमोर येत राहते.

आपणही योग्य संदर्भ ग्रंथ वाचन करीत राहावे आणि योग्य माहितीचे आकलन करीत राहावे हाच या पोस्ट मधील एकमेव उद्देश.

बहुत काय लिहिणे?अगत्य असे द्यावे.

किरण शेलार.

Leave a Comment