महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,36,938

माथेरान | भटकंती

By Discover Maharashtra Views: 3675 2 Min Read

माथेरान

मुंबईपासून एकशे दहा किलोमीटरवर असलेले माथेरान थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. रायगड जिल्ह्यातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण समुद्रसपाटीपासून साधारण ८०३ मी. म्हणजेच २६०० फूट उंचीच्या पठारावर आहे. मुंबई-पुणे लोहमार्गावर कर्जतच्या अलिकडे असलेल्या नेरळ या स्थानकावरुन माथेरानला जाण्यासाठी मिनी ट्रेनची व्यवस्था आहे.

माथेरानची झुकझुकगाडी, लहानग्यांच्या आवडीची ही झुकझुकगाडी नेरळवरून वर चढते. २१ कि.मी.चे अंतर दोन तासांत पार करते. ह्या छोटेखानी गाडीतल्या प्रवासाची मौज लुटणे हे माथेरानच्या सहलीतले एक महत्त्वाचे आकर्षण आहे. माथेरानच्या सौंदर्याचे, ताजेपणाचे रहस्य म्हणजे, माथेरान मध्ये गाड्या आणण्यास परवानगी नाही. नेरळहून डांबरी रस्त्याने वर आले की दस्तूरी नाक्याजवळ गाड्या उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे माथेरानचे हवामान आणि सौंदर्य प्रदुषणापासून सुरक्षित राहिले आहे. दस्तुरी नाक्यावरून चालत ३० ते ४० मिनीटांच्या अंतरावर मध्यभागी मार्केट आहे. आगगाडी मात्र आपल्याला सरळ मार्केट पर्यंत घेऊन येते. बहुतेक हॉटेल्सही ह्या मार्केटच्या अवतीभवती आहेत.

केवळ घोडा, माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा आणि पायीच या ठिकाणी हिंडता येत. शनिवार, रविवार व इतर सुट्टींच्या दिवशी माथेरान पर्यटकांनी फुललेले असते. आरोग्यदायक व उत्साहवर्धक हवामान, अतुलनीय निसर्ग सौंदर्य व जोडीला थंड हवा यामुळे माथेरानला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पर्यटकांसाठी हॉटेल, एमटीडीसीची निवासगृहे, काही छोटी हॉटेल्स आहेत. बाजार, उद्याने आदीं सोयी आहेत. गावात दवाखाना, शाळा यांसारख्या सुविधाही आहेत. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे.

संपूर्ण माथेरानचा परिसर हा विपुल वृक्षांनी सजलेले आहे. गर्द हिरवीगार झाडी हे त्याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेच. बेहडा, हिरडा, खैर, जांभूळ, आंबा अशी अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. या हिरवाईमुळे उन्हाळ्यातही उन्हाचा त्रास येथे होत नाही.

पोईंत (स्थळे) : पॅनोरमा, गार्बट, अलेक्झांडर, हार्ट, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पॉक्युर्पाइन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल आदी पार्इंटस पाहण्यासारखे आहेत.

माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti

Leave a Comment