महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,39,195

महाराणी व कैसर व्हिक्टोरिया माटोबा तलाव

By Discover Maharashtra Views: 1329 2 Min Read

महाराणी व कैसर व्हिक्टोरिया माटोबा तलाव, यवत ता.दौंड –

इ.स.१८७६ मधे दुष्काळ पडला होता त्यावेळी हिंदुस्थानवर ब्रिटिशांची सत्ता होती. मूठा कालव्याचे अतिरिक्त असलेल्या पाण्याची साठवणूक करून त्या पाण्याच्या वापर मूठा-मुळा नदीच्या परिसरातील शेतीला व्हावा म्हणून ” माटोबा तलाव” निर्माण करण्याची योजना तयार करण्यात आली. यासाठी यवत जवळ असलेल्या माळरानावर माटोबा तलाव तयार करण्याचे निश्चित केले. दुष्काळी परिस्थितीत स्थानिक लोकांना रोजगार देखील निर्माण होणार होता.

इ.स.१८७६ मधे सुरू झालेले तलाव खोदण्याचे काम सलग १८ महिने सुरू होते.दररोज सरासरी ३१०० लोकांनी काम केले असून एका दिवशी जास्तीतजास्त मजुर संख्या ८३०० इतकी नोंदविली गेली आहे. ४१० एकर क्षेत्रफळ असलेल्या तलावाची पाणी साठवण क्षमता २२९० लक्ष घनफूट असून मजुरी व धर्मार्थ मदत मिळून १,९८,००० रुपये इतका खर्च झालेला आहे, मात्र झालेले काम हे १,४०,००० रुपये मुल्याचे आहे. आॕक्टोबर १८७८ मधे या तलावातून शेतीसाठी पाणी मिळण्यास सुरूवात झाली. या तलाव निर्मितीसाठी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून उड्रलिव क्लार्क यांनी काम पाहिले.

अशा या तलावाच्या काठावर पूर्वाभिमुखी श्री. माटोबा मंदिर प्रेक्षणीय आहे. भव्य सभामंडप असून भक्तांनी अर्पण केलेल्या लहानमोठ्या घंटा समुहाने छतास लटकविलेल्या आहेत. अंतराळ प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला पुरातन दोन शिल्प असून त्यापैकी एक धनुर्धारी वीराचे आहे. मंदिराच्या गर्भगहात माटोबाची मूर्ती व पिंड स्वरूपात अधिष्ठान आहे. मंदिर परिसरात वेगवेगळ्या प्रकारची शोभेची झाडे व दगडी दीपमाळ आहे.मंदिर व दीपमाळ दरम्यान एक वीरगळ देखील आपले ऐतिहासिक महत्त्व दर्शविते. या तलावातील पाणी शेतीला सोडण्यासाठी असलेली व्यवस्था आजही सुस्थितीत आहे.

सुरेश नारायण शिंदे

Leave a Comment