मत्स्यावतार –
मत्स्य म्हणजे भगवान विष्णूने माशाच्या स्वरूपात घेतलेला अवतार, वैदिक वाङमयात मत्स्य हे प्रजापतीचे रूप होते व सृष्टीच्या विकासासाठी प्रजापतीनी ते धारण केले होते असे म्हटले आहे. पौराणिक कल्पना वेगळी आहे. हयग्रीव किंवा शंख या नावाचा एक असुराने ब्रह्मदेवाकडचे चारी वेद चोरले. ते घेऊन तो समुद्रात गायब झाला. ते चोरलेले वेद परत मिळवन्यासाठी श्री विष्णूंनी मत्स्यरुप घेतले आणि हयग्रीव राक्षसाला मारले आणि त्याच्याकडचे वेद परत मिळवून ब्रह्मदेवाच्या हवाली केले.(मत्स्यावतार)
मत्स्यावताराची प्रतिमा दोन प्रकारांनी केलेली आढळते. पहिली प्रतिमा फक्त मत्स्यरूप असते, म्हणजेच पूर्ण मासा आणि दुसरी प्रतिमा कमरेखालील भाग माशाच्या शेपटीसारखा तर वरचा भाग चतुर्भुज विष्णुरूपात आढळतो.
सदर शिल्प हे यवत च्या भुलेश्वर मंदिराच्या बाह्यांगावरील आहे.
– श्रद्धा हांडे, भ्रमणगाथा