महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,36,594

मराठ्यांचं मावळातलं मूळ

By Discover Maharashtra Views: 1721 2 Min Read

मराठ्यांचं मावळातलं मूळ!

राष्ट्रकूट राजा धारावर्ष ह्याचा शिलालेख इ .सन ७८० मधला‌ विंग येथे सापडला.मावळात सातवाहनांच्या महारठी पदनामे युक्त असलेले प्राचीन उल्लेख ही भेटतात. शिवकाळात ,शिवपूर्वकाळात आणि आज घडीला मावळात सर्वात जास्त सेंद्रक तथा शिंदें घराण्याची लोकवस्ती आढळते .(मराठ्यांचं मावळातलं मूळ!)

अलिकडचे अतिशय सन्मान्य असलेले एक लेखक मित्र म्हणाले होते.देशमुखी वतन हे मुसलमान पातशाहीने दिले तेव्हाही आम्ही हेच म्हणालो होतो कि मराठे हे जुन्या सामंत आणि राजवंशाचेच वंशज आहेत .फक्त त्यांच्या पूर्वापार वतनातल्या पदाचे संदर्भ मुसलमानी राजवटीनुसार देशमुख असे लागले.प्रस्तुत छायाचित्रातील ताम्रपटाचे वाचन हे महामहोपाध्याय वा वि मिराशी ह्यांनी केले आहे.रा चि ढेरे आदित्यवर्मा ह्या सेंद्रक राजाचा “लज्जगौरी “पुस्तकात ओझरता उल्लेख करतात. वर्मा ह्या क्षत्रिय उपाधीने व्यक्त असल्याचा बळकट पुरावा रा ना कदम सरांनी कदंब घराण्याच्या क्षत्रियत्वाच्या संदर्भात दिला आहे . पण मिराशींनी हा ताम्रपट पुर्ण वाचला असून त्यात उल्लेख केलेले स्थळ हे पवन मावळात येते आणि पवनमावळची पुरातन देशमुखी वतन हे शिळिम च्या शिंदेंचे.गुंजणमावळचे वतनदार शिळिमकर हे सुद्धा इथलेच.नाणे मावळचे गरूड देशमुख ,कर्यात मावळच चे पायगुडे देशमुख,रोहिडमावळ भोर तर्फेचे जेधे देशमुख,भूगाव तर्फे चे करंजावणे देशमुख हे सर्व सगोत्र .आजही ह्यांच्यात बेटी व्यवहार होत नाही.सह्याद्रीच्या लगतच्या भागात राष्ट्रकूटांचे सामंत असलेले सेंद्रक तथा शिंदे कोकणात ही आपला प्रभाव राखून होते.

विशेष म्हणजे ताम्रपटात आदित्यवर्मा स्वताला फणींद्रवंशीय म्हणवतो .तसेच आजही शिंदे तथा सेंद्रकांच्या ह्या शाखा स्वतास फणींद्रवंशीय म्हणवतात.ह्यातील जेधे ह्या सेंद्रक कुळाने तर आंबवडे येथील नागनाथाचे भव्य देवालय उभारून आपल्या मूळ वंशाची आठवण ठेवली आहे.

मावळातल्या जुन्या राजसत्तेचे संदर्भ सकस आहेत समृद्ध आहेत  .त्यांची घडण इतकी मजबूत आहे कि तकलादू युक्तीवादाने ते ढासळणारे नाहीत.

सचिन शिवाजीराव खोपडे देशमुख.

बारा मावळ परिवार.

Leave a Comment