मयुरेश्वर मंदिर, मोरगाव, ता बारामती –
मोरगाव, अष्टविनायकातील प्रथम गणपती मयुरेश्वर याचे स्थान. गाणपात्यसंप्रदयाचे आद्यपीठ. क-हा नदीच्या काठावर वसलेले श्रीक्षेत्र मोरगाव. मृदगलपुराणा च्या साहव्या खंडातील कथेनुसार गणपतीने मयुरया वाहनावर बसून सिंधूसुराचा व त्याचा प्रधान कमलासुराचा येथे वध करून देवांची बंदिवासातून सुटका केली. मयुरावर बसून गणपतीने दैत्यासुरांचा वध केला म्हणून हे गाव मोरगाव व येथील गणेश मयुरेश्वर म्हणून प्रसिध्द आहे. मयुरेश्वर मंदिर. या क्षेत्रात ब्रम्हा विष्णु महेश शक्ती व सुर्य यांचे कायमचे वास्तव्य आहे.
मोरगावतील पेठेत उंच भागी हे मंदिर आहे. मंदिराभवती उंच तटबंदी असून मंदिर उत्तराभिमुख असून मंदिराला भव्य नगारखाना आहे. मंदिराच्या खालच्या दिपमाळे समोर मृषकमंडपात पायात लाडू घेउन भला मोठा दगडी उंदिर आहे. या मंडपावर एक शिलालेख असून तो दुर्लक्षित झाल्याने पुर्ण झिजला आहे.
पाय-यावर चढून गेलो की चौथ-यावर नंदीमंडप असून त्याचे तोंड गणपतीकडे आहे. खरतर गणपतीपुढे त्याच वाहन उंदिर समोर पाहीजे पण येथे गणपती समोर नंदी आहे. उपलब्ध माहिती नुसार हा नंदी मोरगाव मार्गे भुलेश्रर मंदिरात बसवण्यासाठी जाताना मोरगाव येथे नंदीच्या वजनाने याचा गाडा तुटला नंतर हा नंदी येथेच मंदिरा समोर बसवण्यात आला.
काही कालांतराने श्रीगणेशयोगींद्राचार्य यांना नंदीने स्वप्नात जाऊन सांगेतलीकी मला येथून गणेशाचे दर्शन होत नाही मला वर बसवावे. तेव्हा खालचा नंदीहा वर मृषकाच्या जागी आला व मृषक नंदीच्या जागी गेला.
मंदिरासमोर दोन दिपमाळ असून भव्य सभामंडप व गाभारा असे दोन भाग आहेत. गाभा-यात गणेशाची शेंदुराची डाव्यासोंडेची पुर्वाभिमुख मूर्ती आहे. मंदिराचे बांधकाम सोळाव्या शतकातील सांगितले जाते. गोळे घराण्याने या मंदिर बांधल अस समजत. हे देवस्थान चिंचवडच्या देवस्थानाच्या अंर्तगत असून याचे व्यवस्थापन चिंचवड वरून केले जाते.
मोरगावच्या द्वारयात्राही भाद्रपद प्रतिपदाते चतुर्थी असते.त्याचे एक वेगळे महत्व आहे. शिवाय येथे आनेक धार्मिक स्थाने आहेत.
“गणपती, पहिला गणपती, मोरगावचा मोरेश्वर लई मोठ मंदिर हो अकरा पायरी हो, अकरा पायरी हो
नंदी कासव सभा मंडपी नक्षी सुंदर हो
शोभा साजरी हो, हो शोभा साजरी हो
मोरया गोसाव्यानं याचा घेतला वसा.
अष्टविनायका तुझा महिमा कसा.”
(मंदिर सकाळी पाच पासून ते रात्री ७ आरती पर्यंत उघडे आसते. )
संतोष मुरलीधर चंदने, चिंचवड ,पुणे.