महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,27,865

मेणवली घंटेचे मंदिर

By Discover Maharashtra Views: 1438 3 Min Read

मेणवली घंटेचे मंदिर –

मार्च १७३७ ते मे १७३९, असे तब्बल २६ महिने चालेले निकराचे युद्ध आणि सरतेशेवटी मराठ्यांचा भगवा जरीफटका वसई किल्ल्यावर फडकला तो दिवस होता १२ मे १७३९.(मेणवली घंटेचे मंदिर)

“निदान माझे शिर तरी तोफेच्या गोळ्याने वसई किल्ल्यात उडवून द्या” म्हणणाऱ्या राजमान्य चिंतामण उर्फ अंताजी बल्लाळ म्हजेचं चिमाजी अप्पानी १५३६ पासून २३ मे १७३९ पर्यंत,असे सुमारे दोन शतक उत्तर कोकणात ठाण मांडून बसलेल्या पोर्तुगीजांना उखडून टाकले आणि साष्टी,फिरंगण,३४० गावं,८ शहरे, बावीस किल्ले, वसई, सोपारा, ठाणे, दमन यासारखी ठाणी,२५ लाख असर्पु्या,दारुगोळा,जहाजे ,लहान मोठ्या अशा ५९३ तोफा हा सरंजाम काबीज केला. आणि घंटा ही(पोर्तुगीजांनी चौल ते डहाणू पर्यंत ७७ चर्चेस बांधले असे म्हणतात आणि त्या किल्ल्यातील आणि चर्चेस वरील घंटा) या मोठ्या विजयाचे विजयचिन्ह म्हणून पोर्तुगीजांच्या प्रार्थना मंदिरातील (इगर्जी मधील-पोर्तुगीज भाषेत चर्च ला इगर्जी म्हणतात)प्रचंड आकाराच्या घंटा मराठी सरदारांनी आपआपल्या उपास्य देवतांच्या देवालयाला अर्पण केल्या.

जसे त्या मंदिरामध्ये अर्पण केल्या गेल्या, तश्याच त्या वितळवून फटकड्या(लहान प्रकारच्या तोफा) करण्यासाठी ही वापरण्यात आल्या. त्यामुळे फिरंगण्यात किती इगर्जी होत्या आणि त्यावर किती घंटा होत्या हे आजही इतिहास अभ्यासकांना आणि संशोधकाना पडलेले कोड आहे.

त्यातील एक घंटा मेणवली मध्ये मेणेश्वर महादेव मंदिरा बाहेरील घंटेच्या मंदिरा पहावयास मिळते, मोजमापा आधारे ही नारो शंकारांनी नाशिकच्या रामेश्वर मंदिरात अर्पण केलेल्या घंटे नंतरची दुसरी मोठी घंटा आहे, अर्थातच त्याच लोलक काढून ठेवले गेले आहे.

मेणवली च्या घंटेवर लहानग्या येशू ला कडेवर घेतलेली मदर मेरी आहे आणि १७०७ सालचा आकडा. या आकड्याच्या खाली तोंडापाशी गोलाकार लॅटिन बायबल मधील वचन कोरलंय त्याचा इंग्रजी अर्थ

“PRAISE THE LORD ON CYMBALS”(means loud ringing sound)

आणि मराठीमध्ये,”उच्च स्वरात वाजणाऱ्या घंटानी परमेश्वराची स्तुती करा”

ही घंटा तेथे कशी पोहचली हे न कागदपत्रां अभावी एक कोडेच आहे,कारण वसई मोहीम आणि नाना फडणीसांचा काहीही संबंध नाहीय. त्यांनी एखाद्या सावकाराकडून ती विकत घेतली असावी असे इतिहास संशोधकाचे अनुमान आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर येथील अशीच घंटाही पेशव्यांचे कारभारी ‘बाळाजी जनार्दन भानू’ ऊर्फ ‘नाना फडणीस’ यांनीच जीर्णोद्धार केल्यानंतर तेथे अर्पण केली असेही म्हटले जाते. अशाच वसई किल्यातून नेलेल्या व आजवर हिंदू तीर्थ क्षेत्री असलेल्या ज्ञात ३८ घंटां, ९ जिल्ह्यात आहेत.

अधिक माहिती साठी खालील पुस्तके नक्की वाचावी.

लेखन संकलन : किरण प्रभा सुर्याकुमार साळुंखे

संदर्भ साभार:
हिंदू देवालयातील पोर्तुगीज घंटा – लेखक महेश तेंडुलकर सर.
नवयुगाच्या प्रेषिता- लेखक मोन्सेनियर फादर फ्रान्सिस कोरिया

Leave a Comment