गोकुळ/ कवी कलश याचा उल्लेख – फ़ुतुहात-इ आलमगिरी :
*फार्सी*(कवी कलश याचा उल्लेख)
गुरेख्तन सिवा ज़लालत नुमा अज़ कैद व रफ्तन मुल्क-इ खुद
फर्द दर हंगाम-इ शाम की जम-इ तुरानी इस्तेख्लास आन न-कोहीदा(?) अंजाम बुद. दर सबद-ए निशस्ता अज़ हबस बर आमदा
शबा शब ब-पाए मर्दी हिम्मत ब मतहारा रसीदन व ब-खाना गोकुल नाम जुनारदार मतहरीया के पुरोहित ऊ बूद सकुनत गिरफ़्त
चुनांची बर इन्कीज़ा-इ पाए अज़ शब अव्वल खबर फरारश
ब-अर्ज अकदस रसीदा ब-गुर्जबरदारान व अहदीयान वगैरा हुक्म शुद की दर हर मकान व हर महल व गुजरदर्या व सराया वा रसीदा हर जा की बियाबीद दस्तगीर कर्दा बर्द गाह वाला हाज़ीर साज़ीद
ग़र्ज की सिपाहा ता सी रोज़ चे लवाज़िम तरद्दुद ओ तलाश बूद बे तकदीम मी रसानिदन अम्मा असर मी अज़ आन गुमशुदा पैदा ना शुदा. हकिकत ना याफ्त. मअरुज़ दाश्तंद व बे इन ज़मन कुंवर कीरत सिंग रा मुआकब व मुखातब नमुदा अज़ मनसब बरतर्फ नमुदंद
व सिवा ए बद अतवार रोज़ ए चंद ब-खाना हमान जुनारदार बसर बुरदा व बाद अज़ आन ब-लिबास फकीरान सनीयासी बर अन्दाख्ता व ब-रफाकत आन जुनारदार अज़ मतहरा बर आमदा व ब-रसम गदायान ब-बनारस व गया की मुआबिद हिंदुआन अस्त रफ्ता व दर आँजा हर पुजा ब-मुजीब दीन व आईन दर हिंदुवान अस्त ब-जा आवरदा. अज़ औंजा ब-राह झारखंड अज़ीमत मुल्क-इ खुद नमूदा व दश्त बयाबान नवर्दीदा व बाद मुल्क-इ खुद पैवस्ता ब-किला राजगड दर याफ्त व इन मथुरिया रा की रफीक तरीक ऊ बूद बर आकीबत ज़द हा सुर्ख ऊ सफेद व फिलान व अस्पान व जागीर सीर मा महल सीर चष्म गर्दानीदा बे कीताब कब कलश नामुर खास ओ आम साख्त
*मराठी*(कवी कलश याचा उल्लेख)
सिवाचे (छत्रपती शिवाजी महाराज) कैदेतून पलायन आणि त्याच्या मुलुखात जाणे
एके दिवशी संध्याकाळी तुराण्यांच्या गराड्यातून त्याने (छत्रपती शिवाजी महाराजांनी) आपली सुटका करून घेतली. पेटाऱ्यात बसून तो त्याला कैद केलेल्या जागेतून बाहेर पडला आणि मोठी हिंमत करून रातोरात मथुरेला गेला. गोकुळ नावाच्या आपल्या ब्राह्मण पुरोहीताच्या घरी आश्रय घेतला.
रात्रीच्या पहिल्या प्रहरानंतर त्याच्या (छत्रपती शिवाजी महाराजांच्या) फरार होण्याची खबर बादशहांच्या (औरंगजेब) कानावर गेली. हे ऐकून बादशहाने गुर्झबरदार, अहदी वगैरे लोकांना हुकुम दिला की प्रत्येक घर, महाल, नदीवरची प्रत्येक होडी, सराई आणि तो जिथे गेला असेल ती प्रत्येक जागा शोधून, त्याला कैद करुन दरबारात हजर करावे.
थोडक्यात सांगायचे तर शिपायांनी तीन दिवस बरेच कष्ट घेऊन त्याचा (छत्रपती शिवाजी महाराजांचा) शोध घेतला पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यांनी ही गोष्ट बादशहांना कळवली. या वेळी बादशाहांनी कुंवर कीरत सिंग याला शिक्षा केली आणि त्याच्या मनसबीवरुन त्याला बडतर्फ केले.
शिवाने (छत्रपती शिवाजी महाराज) काही दिवस मथुरेतील त्या ब्राह्मणाच्या घरी घालवले व नंतर संन्याशाचा वेष करून, त्या ब्राह्मणाला सोबत घेऊन तो मथुरेच्या बाहेर पडला आणि हिंदूंची तीर्थक्षेत्रे असलेल्या बनारस व गया येथे गेला. तिथे त्याने हिंदू रितीरिवाजांनुसार सर्व धार्मिक विधी केले. नंतर झारखंड मार्गे वाटेतील मैदाने, वाळवंट वगैरे पार करत तो त्याच्या मुलखात पोहोचला आणि राजगड किल्ल्यावर दाखल झाला.
त्याच्या सोबत आलेल्या मथुरेतील ब्राह्मणाला त्याने सोने, चांदी, घोडे, हत्ती , समृद्ध जहागिरी आणि कवी कलश असा किताब देऊन सन्मानित केले.
~ फुतुहात-इ-आलमगिरी, ईश्वरदास नागर
टीपा
१) बादशाहाने कीरतसिंग याला शिक्षा करून त्याला मनसबीवरुन बडतर्फ केले असे ईश्वरदास नागरने लिहिले आहे, ते चुकीचे असून तिथे कीरतसिंग ऐवजी रामसिंग असे असायला हवे.
२) छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात परत आल्यानंतर त्यांच्या सोबत आलेल्या मथुरेतील ब्राह्मणाला कवी कलश अशी पदवी देऊन सन्मानित केले असे ईश्वरदास नागर लिहितो. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत प्रसिद्धी पावलेला कवी कलश हाच असावा का? कारण याबद्दलची माहिती कोणत्याही ही इतर साधनात मिळत नाही आणि कवी कलश महाराष्ट्रात नेमका कधी व कसा आला याबद्दल फारशी माहिती मिळत नाही.
सत्येन सुभाष वेलणकर
पुणे