महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,11,436

मेणवली घाट – वाई (सातारा)

Views: 4968
2 Min Read

मेणवली घाट

मेणवली घाट – ‘स्वदेस’ चित्रपटातील शाहरुख खान ज्या नदीकाठावर बसतो तो मेणवलीचा नदीकाठ, ‘सिंघम’ चित्रपटातील अजय देवगण चे टायटल सॉंग, तसेच गंगाजल मधील पारावरील दुश्ये ही सगळी मेणवली घाटावरीलच आहेत.

या ठिकाणी छोटय़ा पडद्यावरील काही मालिका ही येथेच शूट झालेल्या आहेत. जसे ‘अगले जनम मोहे बिटिया किजो’, छोटी बहू, भाग्यविधाता, बैरी पिया, गंगा, महाभारत, काशी. तसेच इथे सर्जा, युद्ध, जिस देस मे गंगा रेहता है, गंगाजल, मृत्युदंड आणि बोल बच्चन अशा अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.

वाईपासून धोम धरणाकडे जाण्याच्या वाटेवर चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर हे मेणवली गाव आहे. संथ वाहणारी कृष्णा नदी, आजूबाजूस असणारी दाट गर्द हिरवीझाडी, निरव शांतता मनाला मोहून टाकते. कृष्णा नदीवरील घाटही पाहून मन प्रसन्न होते. येथील घाट शांत व सुंदर आहे. येथे बांधण्यात आलेला घाट हा चंद्रकोराकृती आहे. येथे दोन मंदिरे आहेत. एक विष्णू देवाचं आणि दुसरं मेनेश्वराचं (शंकराचं). या मंदिरातील गर्भगृहात पायऱ्या उतरून खाली जावे लागते. येथे ६ ते ७ फुट खाली शिवलिंग आहे.

या मंदिरासमोरील एका मंडपात एक अजस्त्र घंटा बांधलेली आहे. श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसईच्या किल्ला जिंकल्यानंतर विजयाची आठवण राहावी म्हणून तेथील चर्चमधील घंटा येथे आणली आहे. यावर १७०७ असा उल्लेख आहे. घंटा पंचधातूची असून त्यावर मदर मेरी ची प्रतिमा आहे.

नाना फडणीसांनी १८व्या शतकात इथे एक मोठा वाडा, घाट आणि मेणेश्वराचे व विष्णुचे मंदिर बांधले. एका बाजुला पांडवगड तर दुसऱ्या बाजुला पाचगणीला घेऊन जाणारा पासरणीच्या घाटाचा रस्ता आणि त्या दोघांमधून वाहणारी कृष्णा नदी. कृष्णेवर बांधलेला हा घाट पाहिला की मेणवलीच्या प्रेमातच पडायला होते. इथली शांतता आणि निवांतपणा मनाला एका क्षणात भावतो.

माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti

Leave a Comment