महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,037

मराठ्यांची सैन्य रचना

Views: 3980
2 Min Read

मराठ्यांची सैन्य रचना

घोडदळात पागा आणि शिलेदार असे दोन विभाग होते. पागेच्या रचनेत प्रत्येक एक घोडयास एक बारगीर व पंचवीस बारगिरांस एक मराठा धारकरी म्हणजे हवालदार
पांच हवालदार वर एक जुमलादार व
१०जुमलादारावरचा अधिकारी तो हजारी
पाचहजारीवरीचे एक अंमलदार तो पंच हजारी
पाच पंच हजारीवरचा एक सरनोबत
पंच हत्यारी म्हणजे लष्करी सुभेदार व त्यासारखा सप्त हजारी तो लष्करी सरसुभेदार.
हजारी, पंच हजारी, सरनोबत यांजजवळ वाकनिसाचे कारकून, हरकारे, व जासूद असत.
जासुदांचा मुख्य नाईक बहीरजी जाधव होय

हशम व पावलोक -पायदळ -या खात्यात बहुधा मावळे लोकांची भरती असे. दहा लोकांस एक नाईक, पन्नास लोकांस पंच नायकी, त्यावर हवालदार..
असे दोन दोन। हवालदार मिळुन एक जुमलेदार व दहा जुमलेदाराचां एक हजारी
सात हजारी चा ” सरनोबत “अशी सैन्याची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकाळात होते
नेताजी पालकर, मालोजी घोरपडे, आणि येसाजी कंक हे सरनोबत पदावर होते….
मराठ्यांचा सैनिकाजवळ मोठा लवाजमा नसे. मावळे एक कांबळ्यानिशी, कंबरेला तलवार लावून सहज घोड्यावर बसून युद्धास सतत सज्ज असते
अशा मावळयांना गनिमी काव्यासारखी युध्दकला सहज अवगत होत असे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या कार्यकाळात ठेवता येण्याजोगी लढाईची सर्व सामुग्री सज्ज होती. त्याच्या जवळ घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि आरमार मराठ्यांनी कडे होते।।

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे.
यापेक्षाही जास्त माहिती असेल तर निश्चितच मार्गदर्शन करावेत.

Leave a Comment