महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,870

मिरज संस्थान | बखर संस्थानांची

By Discover Maharashtra Views: 2985 2 Min Read

मिरज संस्थान | बखर संस्थानांची –

मिरज संस्थान हे पेशव्यांच्या काळातली एक जहागिर आणि ब्रिटीशांच्या काळातील संस्थान होते. ह्या संस्थानाचे अधिपत्य पटवर्थन घराण्याकडे होते. पुढे भाऊबंदकीत मिरजेची विभागणी ४-५ संस्थानांमध्ये झाली. ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्वीच्या मुंबई इलाख्यातील दक्षिण महाराष्ट्रातील एक संस्थान. थोरल्या माधवराव पेशव्यांनी १७६२ मध्ये गोविंदराव पटवर्धनांना मिरजेचा किल्ला आणि आजूबाजूचा बराच प्रदेश जहागीर म्हणून दिला.

परशुरामभाऊ पटवर्धनांच्या मृत्यूनंतर कुटुंबात अंतःकलह माजून गंगाधरराव पटवर्धन वेगळे झाले आणि पटवर्धनास, जहागिरीच्या १८०८ मध्ये झालेल्या वाटण्यांत मिरज सांगलीपासून अलग होऊन गंगाधररावांकडे आले. १८२० मध्ये इंग्रजांच्या संमतीने मिरजेच्या चार वाटण्या झाल्या. त्यांपैकी औरस पुत्र नाही म्हणून १८४२–४५ मध्ये दोन वाटण्या खालसा झाले.

उरलेल्या दोन वाट्यात थोरल्या पातीकडे ८३९ चौ. किमी. चा प्रदेश आला. त्यात मिरज-लक्ष्मेश्वर धरून ५ शहरे आणि धारवाड-सोलापूर-सातारा जिल्ह्यांतून विखुरलेली ५९ खेडी होती. थोरल्या पातीची राजधानी मिरज ठरविण्यात आली. तिचे उत्पन्न पाच लाख रुपये होते.

थोरल्या पाती ही संगीताच्या वाद्यांसाठी प्रसिद्धी होती. धाकट्या पातीत ५०७ चौ. किमी. चा प्रदेश असून त्यात तीन शहरे व ३१ खेडी होती; ती बंकापूर (धारवाड जिल्हा), पंढरपूर (सोलापूर जिल्हा), तासगाव (सातारा जिल्हा) या तालुक्यांना लागून असून चार इनाम गावे पुणे जिल्ह्यातही होती. धाकट्या पातीची राजधानी बुधगाव असून उत्पन्न तीन लाख रुपये .

दोन्ही पात्यांचे संस्थानिक पहिल्या दर्जाचे सरदार असून त्यांना दत्तकाचे तसेच न्यायदानाचे पूर्ण अधिकार होते. आंदोलनामुळे १९३८ मध्ये दोन्ही पात्यांत मर्यादित जबाबदारीची राज्यपद्धती अस्तित्वात आली. दोन्ही पात्या १९४८ मध्ये मुंबई राज्यात विलीन झाल्या.

१८२० साली मिरज राज्याचे थोरली पाती आणि धाकटी पाती असे दोन भाग झाले.

मिरज संस्थान  (थोरली पाती.) इ.स. १७६१ – इ.स. १९४८ राजधानी मिरज

मिरज संस्थान (धाकटी पाती) इ.स. १८२० – इ.स. १९४८ राजधानी बुधगाव.

हे घराण गणेशभक्त असल्याने त्यांच्या जहागिरीच्या दोन्ही पातीच्या स्टँप पेपरवर गणपती पाहावयाला मिळतो.

संतोष मु चंदने. चिंचवड

1 Comment