मोडीची गोडी : परिचय

Views: 3720
1 Min Read

मोडीची गोडी : परिचय

सर्व इतिहास प्रेमींचे मराठी माणसाचे काही श्रद्धा स्थान असेल तर ते म्हणजे आपला दैदिप्यमान इतिहास. आज भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे, किंवा पेशवा दफ्तर, डेक्कन कॉलेज पुणे, एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई, आणि अशा अनेक संस्था आहेत जिथे लाखो नाही करोडो अप्रकाशित कागद जतन करून ठेवले आहेत. यातले बरेचसे कागद मोडी लिपी मधले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, त्या आधी तसेच त्या नंतर अगदी इंग्रजांच्या कळत देखील पत्रव्यवहार हे मोडी लिपीतून सुरु होते. त्यांचे वाचन झाले तर नक्की इतिहासात मोलाची भर पडेल. हा आपल्या दैदिप्यमान इतिहासाचा अनमोल ठेवा आहे.

जर हा दडलेला इतिहास आपल्या पुढच्या पिढीसमोर आणायचा असेल तर whatsapp वर फिरणाऱ्या खोट्या इतिहासावर विश्वास ठेऊन चालणार नाही.

आपल्याला मोडीचा अभ्यास करावा लागेल. म्हणून आम्ही आमच्या videos च्या माध्यमातून मोडी लिपी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून ज्यांना मोडी वर्गांना काही कारणामुळे जाणे शक्य नाही त्यांना घरी बसून आपल्या smart phones वर आमचे videos पाहून मोडी लिपी शिकता येईल.

Leave a Comment