महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,870

मोहिते घराण्याचा कुलवृत्तांत

By Discover Maharashtra Views: 6532 3 Min Read

मोहिते घराण्याचा कुलवृत्तांत

शहाजीराजे भोसले यांच्या बरोबरीची महाराष्ट्रात पवार निंबाळकर शिर्के मोरे शिळीमकर जेधे धुमाळ बांदल मोहिते जाधवराव अनेक क्षञिय कुलोत्पन्न घराण्यातील शुर आणि धाडशी माणसे परकीय राज्यकर्त्यांसाठी जिवाचे रान करून एकमेकांशीच लढत होते .
हिंदवी स्वराज्याचे उघड्या डोळ्यांनी पहिले स्वप्न शहाजीराजे यांनी बघितले आणि हे सर्व मंडळी एकञ करून शिवरायांकडे पाठवली त्यातील मोहिते हे शहाजीराजे यांच्या बरोबर आदिलशाहीत सेवा रूजवत असलेले रतोजी यांची नोंद मिळते .

निजामशाहीत पराक्रमाच्या जोरावर मर्दुमकी मिळवली आणि बाजी किताब मिळवला . मोहिते वसंतगडाखाली तळबीड येथील स्थायिक होतं रतोजीस संभाजी व तुकोजी हे पुञ तुकोजी शाही कामगिरीवर बाहेर असताना गावातील पाटिलकी डुमगूडे या मुतालिकाने मोहित्यांकडील माणूस मारून स्वतःहाकडे घेतली. वतनासाठी देशमुखांमध्ये नेहमी चढाओढ चालत असे .
मोहिते घराण्याचा कुलवृत्तांत
तुकोजीस दोन मुल संभाजी धाराजी व एक कन्या तुकाबाई
संभाजीस घाटग्यांची कन्या तर धारोजीस घोरपडेंची आणि तुकाबाई हे शहाजीराजे यांच्या पत्नी झाल्या. घाटगे व घोरपडे आदिलशहाचे सरदार असल्याने मोहित्यांना 1622 ला आदिलशाहीत आणले. शहाजीराजे यांच्या भातवडीच्या पराक्रमानंतर मलिकअंबर द्वेष करू लागल्याने शहाजीराजे यांना आदिलशहाने बाजूस ओढून घेतले फर्ज॔दगी दिली . मलिकअंबरने शहाजीराजे यांना संपवण्याचा प्रयत्न करत्यावेळी संभाजीने साथ दिल्याने तळबीडची पाटिलकी आणि सरदेशमुखी शहाजीराजे यांनी आदिलशाहीकडून मीळवून दिली . पुढे शिवकाळ ते शंभूकाळात हंबीरराव नावाने मोहिते घराणे अधिकच नावरूपास आले ते धारोजींचे नातू होतं . शिवछञपतींच्या तालमीत तयार झालेले हंबीरराव हे शिवछञपतींच्या राज्याभिषेक वेळी सेनापतीपदावर आले. शिवरायांच्या मृत्यूनंतर मंञ्यांच्या कटास बळी न पडता संभाजी महाराज यांच्या बाजूने खंबीर साथीने उभे राहून दक्षिणेत उतरेल्या बादशाही फौजेस खडा सात वर्षांचा लढा त्यांनी एक चमकणार्या विजे सारखी तलवार चालून दिला आणि स्वराज्यासाठी धारातीर्थ पडले.अशा पराक्रमी मोहीते घराण्याचा कुलवृतांत पाहू…मुळ कुळ चहमान तथा चव्हाण
वंश वेद सुर्यवंशी
गादि संबरीगड, रणथंब
देवक अष्टव , कळंब, पांढरे सिंहासन , पांढरा निशाणउपनावे उर्फ आडनावे म्हणजे पोटकुळे :- अडसुळे , आगे आचाटे कामरे कुलगूडे कुलूंगुडे काये काटे कामर खंडाळे गांगढेंगे ढेकणे खरनाट गुलंगुडे ढेंगरे ढेंगे ठेंगे ठेकणे ताकटे तवटे दुंदने धुंधळे मनिवडुगे धुंदले धुधुळ निवडूंगे पितळे बगळे बहाले बंडे मराटे सोने सोते बहाळे बाईडिंगे बोभाटे भोरे भालेराव मोहोड सेनापती होने हांबर थोठे
मोहिते वाकडे पारदि रणदिवे कडू डेरे गव्हाणे ताखेडे हंबरराय काशिद भोरे नाईक मालसिंगे दुसिंगे ढेरे मते ठोंबरे चोभे भापकर नवले चोहटमेल इत्यादि आडनावे मोहिते कुळात येतात.

#सरसेनापती
#स्वराज्यनिष्ठ

माहिती साभार:- गडप्रेमी बाळासाहेब पवार

Leave a Comment