मोरे गढी, सानप गढी, सौताडा –
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सौतडा गावात दोन गढी आहेत. सौतडा हे गाव मराठवाड्यातील विंचरणा नदीवर असलेल्या भव्य धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे. पण गावात मोरे आणि सानप यांच्या गढ्या आहेत. दोन्ही गढ्या अखेरची घटका मोजत आहेत. सौतडा गाव पाटोदा या तालुक्याच्या गावापासून १८ कि.मी अंतरावर आहे.
सानपांची गढी थोड्याफार प्रमाणात तग धरून उभी आहे. गढीची तटबंदी आणि बुरूज आजपण मजबूत आहेत. खालचे काम दगडी आहे तर वर वीटांचे काम होते ते काळाच्या ओघात पडून गेले व पांढरी माती पहायला मिळते. गढीत प्रवेश करताना दारातच एक छोटेसे मंदिर आहे. लहान प्रवेशद्वार आहे. आतमध्ये पडक्या वाड्याचे अवशेष आहेत.
मोरे गढीची तटबंदी, बुरूज पूर्णपणे ढासळले आहेत. तुरळक तटबंदी आणि प्रवेशद्वार पहायला मिळते. प्रवेशद्वाराचे वीटांनी केलेले रेखीव काम आहे. असा हा सौतडा गावाचा वारसा आहे. वंशज पुण्यात असतात स्थानिक पण उदासीन असल्याने ह्याचे जतन नाही. इतिहास पण माहित नाही तरी जाणकारांनी इतिहासावर प्रकाश टाकावा.
टीम – पुढची मोहीम