महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,11,460

मुंगूसादेव | सातपुड्याचे अश्मयुगीन विश्व भाग 3

Views: 1311
5 Min Read

मुंगूसादेव, सातपुड्याचे अश्मयुगीन विश्व भाग 3 –

या आधी आपण सर्वांनी भाग एक मध्ये अंबादेवी येथील अश्मयुगीन शैलचित्रे (रॉक पेंटिंग) यांची माहिती घेतली, त्यानंतर याच शृंखलेतील दुसरा भाग गायमुख येथील प्रगत युद्धाचे प्रसंग असलेल्या पेंटिंग आपण पहिल्या , प्रत्येक वेळी पेंटिंग चा शोध घेतल्यानंतर आम्ही डॉ विजय इंगोले सर (ज्यांच्या टीम ने सर्वप्रथम या पेंटिंग 2007 मध्ये शोधल्या) त्यांचे मार्गदर्शन घ्यायला गेलो, सरांच्या तोंडून या पेंटिंग शोधतांना त्यांना किती परिश्रम घ्यावे लागले याची जाणीव होत होती, माहिती सांगताना ते आम्हाला पुढच्या वळणावर काय करावं याच मार्गदर्शन करत आणि त्यांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही आता निर्धार पक्का केला आता मुंगूस देव येथील पेंटिंग बघण्याचा.

प्रवास खडतर आहे याची कल्पना आम्हाला डॉ विजय इंगोले सर यांच्या अश्मयुगांतर या पुस्तकातून झाली पर रिक्स नही तो इश्क नही अस मनाशी ठरवत मी आणि शिवा दादांनी ठरवलं यावेळी मुंगूसादेव, मुंगूसादेव हे आदिवासी दैवताचे नाव स्थानिक आदिवासीं बांधव तिथे जाऊन पूजाअर्चा करतात. बहुदा ते ज्या खुणांना किंवा चित्रांना देव मानतात ते ऐतिहासिक मोठा ठेवा आहे याची यत्किंचितही त्यांना जाणीव नसेल, पण यामुळेच या पेंटिंग हजारो वर्षे झाल्या सुरक्षित आहे.

ठरल्याप्रमाणे आम्ही 25 लोक सज्ज झालो रविवार पक्का झाला पण शनिवारी रात्री रिपरिप पावसाची सुरवात झाली मनात धास्ती होती की पावसाचा जोर वाढला तर मोहीम कॅन्सल, सकाळी 5 वाजता उठलो पाऊस सुरू होता दादांना कॉल केला काय करायचं, त्यांनी नेहमीप्रमाणे सांगितले ठरलं तर निघायचंच, रिपरिप पावसात मी बाईक काढली रेनकोट चढवला नि निघालो. चांदुर बाजार पोहोचेपर्यंत पाऊस बंद झाला जिवंत जीव आला, ठरल्याप्रमाणे सर्व साहित्य घेऊन निघालो धारूळ च्या वाटेने भोरकप ला अंबा देवीच्या पार्किंग मध्ये गाड्या पार्क केल्या.

तिथेच आमचे वाटाडे मित्र सुरेश भाऊ यांचे दुकान तिथं मस्त चहा घेतला काही नवीन लोक सोबत जुळले होते त्यामुळं थोडा परिचय घेतला, जेवणासाठी ऑर्डर केलेल्या भाकरी बेसन सर्वांच्या बॅग मध्ये टाकल्या अन इथून सर्वात झाली ती एका अद्भुत विश्वाची खरं तर आतापर्यंत च्या शोधा त आम्ही विविध चित्र पहिली मग ती गायमुख येथील युद्धाचे प्रसंग असो की अंबा देवी रॉक वरील विविध अविस्मयक चित्र असो पण खूप दिवसापासून उत्सुकता लागली होती ती मात्र मुंगूसादेव येथील चित्र पहायची त्याच कारणही तसंच होत, इंगोले सरांच्या पुस्तकात आम्ही जे फोटो पाहिलेत त्यावर त्या शलटर वर पूर्ण प्राणिसंग्रहालय उभं केलेलं होत, विविध पशु पक्षी या रॉक वर मोठ्या प्रमाणात रेखाटलेले होते. याच चित्रांची एक मोठी मनमोहक पेंटिंग इंगोल सरांनी त्यांच्या घरी फ्रेम करून ठेवली आठवण म्हणून

आता प्रवास सुरु झाला आम्ही सर्व उत्साही होतो, खरं तर आमच्यापैकी बऱ्याच लोकांना आम्ही कुठं अन कश्यासाठी चाललोय याची काहीच कल्पना नव्हती ते फक्त जंगलात फिरायला मिळणार म्हणून आले, पण ज्यांना माहिती होत ते मात्र जीव ओतून चालतांना प्रत्येक दगड बघत चालले होते. खरं तर जेव्हापासून रॉक पेंटिंग हा विषय डोक्यात आला तेव्हापासूनच जंगलात फिरतांना आमच्या नजरा संशयी झाल्यात, प्रत्येक दगडाला संशयित असल्यासारखे पाहायचं तिथं काही मिळत का हे बघायचं, अस करत निघालो , मधात एक नाला लागला नाला ओलांडल्या बरोबर एक भला मोठा आंब्याचं झालं दिसलं त्याच्या खोडाचा व्यास खूप मोठा त्यामुळं कुतूहलाने आम्ही एकमेकांचे हात हातात पकडून ते किती मोठा आहे हे मोजण्यासाठी गोल केला 7 लोकांचा मोठा परीघ म्हणजे त्या झाडाचं खोड होत.

तिथून आम्ही पुढल्या वाटेला लागलो जंगलात अनेक वळण घेत वर जायला लागलो साधारणतः 2 ते 2.30 किलोमीटर चालल्या नंतर आम्ही एका गुफेजवल पोहोतलो असंख्य मेलेल्या जनावरांच्या हाडाचे तुकडे तिथं विखुरलेल्या अवस्थेत होते, वाटाड्याने आम्हाला सांगितले की ही बिबट्या ची गुफा आहे तिथून पुढं आणखी थोडं वर चढल्यावर आम्ही निर्धारित मुंगूसादेव डोंगरावर होतो, तिथं उभ्या असलेल्या एका भल्या मोठ्या दगडावर खूप लालसर रंगाचे चित्र आम्हाला दुरूनच दिसत होते त्यामुळे आमची उत्सुकता आणखीच वाढली चालायचं वेग वाढला आणि जस आम्ही त्या शैलश्रयाजवळ पोहोचलो आमचे डोळे विस्फारले असंख्य छोट्या मोठ्या आकृत्या त्यावर रंगवलेली होत्या, आम्ही कुतूहलाने एक एक बघत होतो अन अंदाजा लावत होतो सोबत इंगोले सरांचं पुस्तक होत.

कित्येक चित्र अस्वल,गेंडा,शहामृग ,कोल्हा,सायल,हरीण अशी कितीतरी विविध चित्र तिथे होते सोबत अनेक आकृत्या तिथे होत्या त्या बघत आम्ही सुखावत होतो ,कित्येक आकलनाच्या पलीकडच्या आकृती होत्या कित्येक पुसट झाल्या होत्या, दगडात कोरलेल्या स्त्री योनीच्या आकृती हे सर्व पाहिल्यानंतर या पेंटिंग कडे शासनाने केलेल्या दुर्लक्षा ची कीव आली नंतर वाटत बर आहे निदान अज्ञानात सुख असत याप्रमाणे इथं लोकांचा वावर कमी त्यामुळे आणखी काळ तरी या टिकतील किंवा या बघणारे आम्ही शेवटचे असू अश्या अनेक विचारांना मनात घेऊन आम्ही कुक्कुडसा येथिल पेंटिंग पाहायला पुढल्या वाटेने निघालो

(क्रमश)

प्रतीक पाथरे
स्वराज्य सेवा प्रतिष्ठान
8275417766

Leave a Comment