श्री मुंजोबा मंदिर, पुणे –
सूर्या हॉस्पिटल कडून पोवळे चौकात जाताना रस्त्याच्या उजव्या हाताला श्री मुंजोबा मंदिर अशी पाटी दिसते. ते ठिकाण पुण्याच्या इतिहासाची एक प्राचीन खूण आहे.
इसवी सनाच्या १५ व्या शतकात पुण्याचे स्वरूप अगदीच लहानसे होते. तेव्हा पुणे म्हणजे एक लहानशी पांढरीची, म्हणजेच निवासी घरांची वसाहत होती. त्या वसाहतीच्या आणि मुठा नदीच्या मधल्या भागात एक टेकडीवजा, माथ्यावर अंदाजे १ एकर क्षेत्र भरेल एवढा सपाट, मोकळा भाग असलेला नैसर्गिक उंचवटा होता. त्याच्या मध्यभागी लहानसे श्री मुंजोबा मंदिर पाराखाली होते आणि आजही ते मंदिर आहे. बाळोबा मुंजोबा या नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहे. रोकडोबा, म्हसोबा, मुंजोबा या वेशीवरच्या क्षेत्रपाल देवता. या मुंजोबाची स्थापना तिथे कधी झाली ह्याबाबत अजून तरी खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही.
नंतरच्या काळात त्या पाराभोवती एक छोटेसे मंदिर बांधले गेले. मंदिराच्या आवारात शेंदूर लावलेल्या १/२ वीरगळ आहेत.
संदर्भ: मुठेकाठचे पुणे – श्री. प्र. के. घाणेकर
पत्ता : https://goo.gl/maps/vAAgg3c9jDQCveii7
आठवणी इतिहासाच्या