महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,74,301

नागाव बीच आणि काशिद बीच

By Discover Maharashtra Views: 4035 1 Min Read

नागाव बीच आणि काशिद बीच

नागाव बीच :
पुणे ते नागाव बीच अंतर १५० किमी आहे (मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे मार्गे). नागाव गावात असलेल्या नारळी-पोफळीच्या बागा आणि त्या बागांच्या मधून जाणारा रस्ता आपल्याला नागांव समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जातो. येथील समुद्रकिनारा सुरक्षित असल्यामुळे पर्यटकांची नागांव समुद्रकिनाऱ्याला पहिली पसंती असते. येथील वैशिष्टय म्हणजे किनार्यायवरील एका रांगेत असणारी डौलदारपणे डुलणारी सुरूची झाडे व रूपेरी वाळूचा स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा त्यावर फेसाळणार्याा अथांग समुद्राच्या पांढर्याेशुभ्र लाटा पर्यटकांना फारच मोहीत करतात. येथे पर्यटकांसाठी नाष्टा जेवण तसेच निवासाच्या भरपूर सोयी आहेत.

काशिद बीच :
पुण्यापासून १७० किमी वर अलिबाग – मुरूड रस्त्यावर वसलेले काशिद हे अलिबाग पासून ३० कि.मी. अंतरावर असून आपल्या निळाशार किनारा, चमचमणारी पांढरी वाळू आणि आजुबाजूला असणाऱया निसर्गासाठी प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी छोटया स्टॉलपासून परिपूर्ण सुविधा असणारी हॉटेल्स रिसॉर्टस् यामुळे काशिद बीच पर्यटकांचे मोठे आकर्षण बनला आहे. तसेच या बीच वर असलेले वॉटर स्पोर्ट्स पर्यटकांना आकर्षित करतात.

माहिती साभार – माझी भटकंती फेसबुक पेज

Leave a Comment