महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,38,434

शिवरायांच्या सावत्रआई नरसाबाईंच्या नावावरून नरसापूर

By Discover Maharashtra Views: 1584 2 Min Read

शिवरायांच्या सावत्रआई नरसाबाईंच्या नावावरून नरसापूर –

छत्रपती शिवरायांना एंकोजी, भिवजी, प्रतापजी, संताजी, रायभानजी व इतरही सावत्रभाऊ असल्याचे उल्लेख मराठी रियासत खंड 1 किंवा श्रीशिवछत्रपतींची 91 कलमी बखर वा इतरही अनेक संदर्भ ग्रंथात सापडतात. पैकी बर्‍याच  साधनात एंकोजीच्या आई तुकाबाई यांच्या एकाच नावाचा उल्लेख सापडतो. शहाजीराजेंच्या इतर पत्नीचा उल्लेख सापडत नाही. त्यामुळे कदाचित त्यांना दासीपुत्र म्हटलेले आहे.(नरसापूर)

ज्यावेळी 91 कलमी बखरीच्या पृष्ठ क्रमांक 66 वर शहाजीराजेंची पुण्यातील कलावंतीन असणारी रक्षा सुलतान नुरुद्दीन हिचा रखेली म्हणून उल्लेख येतो, मात्र त्याचवेळी राजेंच्या  सावत्रभावांनी आपापल्यापरीने पराक्रम करूनही कुठेही त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आढळून येत नाही. यातील रायभानजीने पुढे छत्रपती शाहूमहाराज मोगली कैदेत असताना खूप मोलाची मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांचा उल्लेख रायभानजी काका असा येतो. मात्र त्यांच्याविषयी सखोल माहिती मिळत नाही. इतरांची हीच अवस्था आहे.

यातील संताजी हे सुरूवातीला एंकोजीराजेकडे कर्नाटकात असून छत्रपती शिवरायांनी कर्नाटक मोहीम आखून ज्यावेळी एंकोजीच्या भेटीला गेले त्यावेळीसंताजी राजे शिवरायांच्या गोटात दाखल झाले. एवढेच नाहीतर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासोबत संताजीराजेनी एंकोजी विरोधातील युद्धात भाग घेऊन पराक्रम दाखवत विजयhi मिळविला. अशा या संताजी भोसले यांनापण इतिहासकारांनी  दुय्यम स्थान दिले. मात्र अस्सल सनदापत्रात संताजीराजेंच्या आईचे नाव “ नरसाबाई ” म्हणून उल्लेखतर आहेच शिवाय त्यांनी शके 1609 ( इ.स. 1687 ) पौष वद्य 30, वार रविवार या दिवशी  दिलेले एक दानपत्र उपलब्ध असून त्यात नरसाबाई यांचा उल्लेख श्री शहाजी राजे भोसले यांची स्त्री, राजेश्री संतोजीराजे यांची माता याप्रमाणे   सापडतो.

यासोबतच त्यांच्याच नावावरून एका गावाला नरसांबपूर ( नरसापूर ) असे नाव पडले. नरसापूर हे नेमके कोणते याचा उल्लेख नसलातरी राणी नरसाबाई या मुळच्या कर्नाटकातील असून 1637 साली ज्यावेळी शहाजीराजे आदिलशाहीत दाखल झाले. तेव्हा त्यांनी नरसाबाईसोबत लग्न केले असावे. उपरोक्त पत्र हे 1687 सालचे असून नरसाबाई या पुढे बरेच दिवस हयात होत्या.  यातील  नरसापूर म्हणजे कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील  नरसापूर असावे असे वाटते. कारण कोलार हे बरेच दिवस शहाजी राजांच्या ताब्यात असल्याचे कोलार गॅझेटमध्ये आढळून येते.

Dr. Satish kadam

Leave a Comment