महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,55,633

उग्रवीराचा पुर्नःशोध

By Discover Maharashtra Views: 1490 10 Min Read

उग्रवीराचा पुर्नःशोध : नरसिंह – लक्ष्मीनृसिंह :

आपल्या महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत लक्ष्मीनृसिंह आहे. यापैकी अनेकांना त्यांच्या कुलदेवतेविषयी नेमकी माहिती आपण विचारत गेलो तर ते काटेकोरपणे ती माहिती देऊ शकतीलच अशी खात्री देता येत नाही. माझेही असेच झाले. माझ्या मुलाने मला विचारले की, आपलेही कुलदैवत नरसिंह आहे आणि तुम्ही मला ज्या फोटोला नमस्कार करायला सांगता. मी ज्या मूर्तीला रोज पाहतो ती मुर्ती आणि फोटो एकटया नृसिंहाचा नसून लक्ष्मीनृसिंहाचा कसा काय आहे ? त्याचे हे साधे विचारणे मला एकदम अस्वस्थ करून गेले. मला माहित असलेली नृसिंहाची अवतारकथा, त्या अवतारावेळी लक्ष्मीचे आस्तित्व कोठेही उल्लेखीत करत नव्हती. नृसिंहावताराच्यावेळी तेथे लक्ष्मी प्रगट झालेली आख्यायिका नसतानाही अनेक चित्रकारांनी लक्ष्मीनृसिंहाचेच असे अवतारचित्र का काढले असावे याचा शोध मी जेव्हा सुरु केला तेव्हा मात्र आपल्या परंपरेतल्या काही चांगल्या संकेतांचा शोध मला लागत गेला! हे संकेत तसे अनेकांना ज्ञात असतीलही, मला यासाठी मदत झाली ती मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातल्या दुर्मीळ ग्रंथांची. या ग्रंथामध्ये चित्रावशास्त्रींच्या चरित्रकोषाचा आणि संस्कृतीकोषाचा आनंदाने उल्लेख करावासा वाटतो.

भगवान श्री विष्णूचा चवथा अवतार म्हणजे नृसिंहावतार असे आपण मानतो. उन्मत्त झालेल्या राजा हिरण्यकशपुच्या वधासाठी हा अवतार घ्यावा लागला हे सुध्दा साऱ्यांनाच ज्ञात आहे. हिरण्यकशपु राजा हा दानवराज होता. तो कट्टर शिवभक्तही होता. आपलाच

मुलगा विष्णुभक्तीत रममाण होणे त्याला आवडत नव्हते. या उन्मत्त आणि ब्रम्हथाकडून किमान एक हजार वर्षे जगण्याचे वरदान प्राप्त करून घेतले होते. या वरदानकाळानंतरही त्याला कधीही मरण येणार नाही असाही वर त्याला मिळालेला होता. मर्त्य जीवाला ज्या शक्यतांपासून मरण येऊ शकते त्यापासून त्याला कधीही मरण येणार नाही असा त्याला जो वर होता त्यात “घरी किंवा दारी मरण येणार नाही, दिवसा किंवा रात्री मरण येणार नाही, मनुष्याकडून किंवा पशुकडून मरण येणार नाही, सजीवाकडून किंवा निर्जीवाकडून मरण येणार नाही. शुष्काने किंवा आर्द्राने मरण येणार नाही.” ही प्रमुख वरदाने होती.

वरील संदर्भांना क्रमाने आपण तपासत गेलो तर हिरण्यकशुपचा वध उंबरठयावर झालेल्याची माहिती मिळते तर या अवतारापूर्वी अर्धपशु किंवा अर्धमानव असे देहरूप आस्तिवात नसल्याने त्याही वरदानाचा फायदा त्याला मिळू शकला नव्हता. नखांना तर आजवर कोणीही शस्त्र किंवा अस्त्र मानलेले नाही आणि अर्धे शरीर सिंहाचे असलेला कोणताही सजीव तोपर्यंत निर्माण झालेला नव्हता. आजही ते शक्य नाही. शेवटचा जो शुष्क किंवा आर्द्र हा संदर्भ आहे त्यासाठी वैशाखाचे वातावरण लक्षात आणावे लागते. या महिन्यात कातरवेळी वातावरणातील शुष्कता नाहिशी होणे सुरु होते तर आद्रर्ता सुरु होण्याचा प्रहर पुढे येत असतो.. वैशाखातली दुपार स्मरणात आणली तर हे लक्षात येते की, ही दुपारची वेळ रुक्ष आणि शुष्क असते तर कातरवेळ सूर्यास्तानंतर येत असल्याने तशी प्रसन्न वाटते कारण तिथूनच तापलेली हवा थंड होणे सुरु होऊन आर्द्रता

वाढणे होते. हे नेमकेपण एकदा पटले की हिरण्यकशपुच्या वधासाठी हा काळ किती योग्य असेल याची जाणीव होते. आपल्या वरदानप्राप्तीसाठी

म्हणे हिरण्यकशपुने अधःशिर राहून शंभर वर्षे तप केले असल्याची

माहिती मिळते. याच वेळेस त्याची माता “दिती” ही हिरण्यकशपुच्या जन्माआधी दहा हजार वर्षे गरोदर होती असाही विलक्षण संदर्भ मिळतो, हिरण्यकशपुच्याच घराण्यासाठी विष्णुदेवांना दोन अवतार घ्यावे लागले होते. हा संदर्भ वाचून तर आपण थक्क होतो. अविवेकी वर्तनासाठी नृसिंहावतार घेतल्यानंतर आपल्याच भक्तोत्तम प्रल्हादाच्या नातवासाठी अर्थात बळीराजासाठी विष्णुला वामनावतार घ्यावा लागला होता. हिरण्यकशपुच्या वधातून स्थितीकारक मानली गेलेली विष्णूदेवता हा संकेत देते की कार्य माजते तेव्हा उग्ररुपानेच त्याचा नाश करावा लागतो. हा संकेत देण्यासाठी ही सांस्कृतिक कथानके हया जाणीवेसाठी असावीत की कोणताही अतिरेकी अहंकार सर्वनाश घडवून आणतोच. हे संदर्भ, हे संकेत रूचत गेले की नृसिंहावतार प्रगट होण्याचा उद्देश कळत जातो मग लक्षात येते की, हा अतिशय उग्र स्वरूपाचा अवतार होता. ज्या कार्यासाठी नृसिंहदेव या भूतलावर खांबातून बाहेर पडले. मांडीवर हिरण्यकशपुला घेऊन उंबरठयावर बसून त्याचा वध केला त्यानंतर त्यांना कोणीतरी शांत करणे गरजेचे होते. त्यावेळी तर पंचमहाभुतेही त्यांच्या मुखातून, देहातून आपले रौद्र रूप दाखवत होती. ज्या भक्त प्रल्हादासाठी ही नृसिंहदेवता प्रगटली होती त्या भक्त प्रल्हादालाच त्यांच्यासमोर उभे करणे हा एकमेव पर्याय तेव्हा होता. तो पर्यंत सारा राजदरबार हादरलेला होता. जमलेल्यांची अंगे थरथरत होती. सिंहगर्जनांनी कर्णपटले बधीर झालेली होती. क्रौर्याची परिसिमा सान्यांनी

अनुभवलेली होती. उन्मत्त गर्वष्ठ आणि अहंकारी राजाला क्रौर्य हाच उपाय पाहून सारी उपस्थीत मंडळी भेदरलेली होती. भक्त प्रल्हादाला आपल्यासमोर पाहून ही नृसिंहदेवता हळूहळू शांत होत गेली. उग्रावतारातून सौम्य रूप धारण करत गेली. आक्राळविक्राळ सिंहरूपसुध्दा लोभस वाटत गेले आणि कधीतरी साऱ्यांच्या नकळतपणे त्या चर्तुभूज शरिराच्या डाव्या बाहूतून श्री लक्ष्मी प्रगट झाली!

हे सारे वर्णन पुढे मुर्तीरुपात प्रगट झाले तर कधी चित्ररुपात. या मागे असा संदर्भ दिला गेलेला आहे की, ज्या ज्या वेळी विष्णू अवतार घेतो त्या त्या वेळी लक्ष्मीसुध्दा सहचरी होण्यासाठी अवतार घेते. ही कल्पना मनाने मान्य केली तर वामनावतारातील पद्मा, परशुरामावतारातील धरणी, रामावतारातील सीता आणि कृष्णावतारातील रुक्मीणी यांचे स्थान मनात स्पष्टपणे सामोरे येते. हाच धागा पकडून विष्णूच्या अवताराचा संदर्भ जर जुळवण्याचा साधा प्रयत्न केला तर असे लक्षात येते की, हा अंशकालीन अवतार असल्याने लक्ष्मीसुध्दा अवतारपूर्तीसाठी प्रगट झाली असावी. वैशाखातील त्रयोदशीला प्रगट झालेल्या विष्णूच्या या नृसिंहावताराला आजही सारी सात्विक मंडळी नम्रपणे आपली भक्ती जेव्हा अर्पीतात तेव्हा त्याच वेळेस त्याच्या कोपकल्पनेवर अनेक संवेदनाशील मनात घाबरतात कारण हा उग्रवीर आहे. विष्णुचे महारुप आहे. अति घोर चूका केलेल्यांना शासन करणारा आहे. जो अवतार उत्तरेकडील गंगानदीपासून ते दंडकारण्यातील कयाधू नदीपर्यंत पसरलेल्या एका सम्राटाचा निव्वळ आपल्या रुपाने वध करतो त्याचा राग आपल्यावर येऊ नये, ही इच्छाही त्यात असावी. या मागे एक शाश्वत भावना अशी आहे की इतिहासाची पुनरावृत्ती होतेच यावरचा

ठाम विश्वास! ही पुनरावृत्ती मात्र घटना आणि काळ बदलून नव्या रुपाने होत असते. नृसिंहावताराचे मुख्य कार्य होते निष्ठुर नृपाचा नाश करणे आणि त्याचवेळी भक्तिमार्गाला श्रेष्ठत्व देतो. क्रौर्य हे दुरुन अनुभवायला चांगले वाटते. दुरस्थ कुर पुरुषाविषयी कधी-कधी अनेकांना आपलेपणाही वाटतो. तो भ्रामक आपलेपणा टाळून आपल्यातीलच सात्विक आणि सत्शील व्यक्तीमत्वांनाच हृदयस्थ करा हा अप्रत्यक्ष संकेतसुध्दा नृसिंहावतारातून प्राप्त होतो. या संकेतासोबतच या अवताराचा प्रमुख हेतू हासुध्दा आहे की, दुवर्तन शासकालाही शासन करणारा कोणी ना कोणी प्रगट होतोच, आजकालच्या समाजजीवना प्रमाणे आता भगवान विष्णूचा सामुहिक अवतार प्रगट होत असतो हे गृहीत धरावे लागते आणि यामुळेच मग अशा शासकाच्या सहाराला कारणीभूत ठरणाऱ्या नागरिकांमध्ये जो ईश्वराचा अंश असतो तो कामाला येत असावा. खरेतर जेव्हा जेव्हा सुस्थिती नांदत असते.. स्थैर्य असते आणि लयबध्द जगणे चालू असते, तेव्हा कधीतरी दुर्जनांमधील अपप्रवृत्ती जाग्या होऊ लागतात. अनाचार माजू लागतो. परत एखादा

अवताराचे कारण घडते. पुन्हा त्या दुर्जनाचा नाश होतो. हे असे करीतच  सृष्टीचक्र चालू राहते. या चक्रात मानवदेह कसेही जगले, वागले तरी निसर्ग आपला नियमितपणा कायम ठेवतो. यासाठी नृसिंह जयतींच्या कालावधीतले सृष्टीरुप जर आठवून पाहिले तर या कालावधीत वारं वावधानं सुटलेलं पहायला मिळतं. वादळांचा अनुभव येतो. अवकाळी पाऊस आणि वीजांचा कडकडाटही होऊन जातो वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनाही दिसून जातात. ही सारी निसर्गरूप या जाणीवेसाठी संकेतरूपाने प्रगट होतो की यातून ही जाणीव व्हावी की पुन्हा दुराचरण वाढते आहे, ही अराजकाची वाढती स्थिती

आहे. परंतु अशावेळी मात्र सुखलोलुप आणि बधीर मनोवृत्तींना सावध व्हावे ही जाणीव होत नाही. जेव्हा सावध होण्याची जाणीव अशांना होते तेव्हा वेळ टळलेली असते. ही वेळ गेल्यानंतरची जाणीव होणे हे चूका करणाऱ्याला निश्चितपणे प्रत्येकवेळी होत असावी पण सुखाकर्षणच एवढे घट्ट असते की. तेव्हा बेसावध राहणे आवडतेच. या आवडण्यासोबतच आजकाल आपण हे घडताना पहात आहोत की, सुसूत्र झुंडशाहीला गेल्या काही दशकात राजमान्यता मिळालेली आहे. या सुसुत्र आणि प्रमाणबध्द झुंडशाहीचे एक स्पष्ट वैशिष्ट्य असे आहे की, या झुंडीतील सान्या धुतांनी आपल्यातला एक

सज्जन मुखवटा सामान्य प्रजाननांसमोर नेहमीसाठी ठेऊन त्यांची सुव्यवस्थीतपणे लुटालूट चालू ठेवली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभूत बाबी जगण्यासाठी मिळणे हे प्रत्येकाच्या प्राक्तनात तसे ईश्वरानेच लिहून ठेवल्याने या तीन बाबीनंतरची सुखे मिळणे ही गोष्ट ज्यांना ज्यांना जमून गेली त्यांना आपल्या जगण्याचा कालखंड बरा आहे द्वे वाटते. आजवर कोणालाही आपल्या काळात भगवान विष्णूने अवतार घ्यावा हे प्रकर्षाने जाणवलेले नाही पण ज्यादिवशी ही सामुहिक लूट अतिरेकाकडे जाईल, अतिसामान्यांच्या जगण्याचा मार्ग उखडेल त्या दिवशी नृसिंहावतारा पेक्षाही अति उग्र अवतार निश्चितच प्रगट होईल यात शंकाच नाही. ही शंका खोटी ठरण्यासाठी एकमेव साधा आणि सहज मार्ग जो आहे तो या भूमीला पुर्नवैभव प्राप्त व्हावे म्हणून प्रयत्न करण्याचा! असामान्यांना एवढी जरी जाणीव या निमित्ताने झाली तर तेवढेही पुरेसे आहे..

डॉ. रवी तांबोळी [email protected]

[सदर लेखाचे लेखक हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक श्री लक्ष्मीकांत तांबोळी यांचे चिरंजीव आहेत. यांचे पूर्वज हे संत होते. जिंतूर येथे संत संताजी महाराज यांचा मठ आहे. ते तेथून वरुड येथील नरसिंहाला दिंडी नेत असत. कारण त्यांचे कुलदैवत नरसिंह होते.]

फोटो -नृसिंह मंदिर, मेहकर.
ठिकाण -मेहकर जि.बुलढाणा.
साभार – Kiran Mengale  & Shrihari Pitale  (mehkar)

© वर्षा मिश्रा.

Leave a Comment