महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,23,442

नारायणेश्वर महादेव मंदिर, नारायणपूर

By Discover Maharashtra Views: 4521 3 Min Read

नारायणेश्वर महादेव मंदिर, नारायणपूर, पुरंदर –

पुरंदर आणि वज्रगड किल्याच्या परिसरात बरीच छोटी छोटी ऐतिहासिक गावे लपली आहेत. पुरंदर किल्याची जी ऐतिहासिक लढाई झाली होती तेव्हा त्या संपूर्ण परिसरात मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेरखान यांची छावणीच या संपूर्ण प्रदेशात उभारली गेली होती.पुरंदर किल्यांच्या कुशीमध्ये वसलेले नारायणपूर नावाचे प्राचीन गाव आहे. या  गावी प्राचीनतेची साक्ष देणारे एक सुंदर यादवकालीन मंदिर आजही उन पावसाचा मारा झेलत उभे आहे. नारायणपूर या गावाच्या पंचक्रोशी मध्ये उभे असलेले हे मंदिर ‘नारायणेश्वर’ या नावाने प्रसिद्ध आहे.(नारायणेश्वर महादेव मंदिर)

सासवडपासून १० कमी अंतरावर असणारे नारायणपूर श्री दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. दत्तमंदिराच्या शेजारीच आहे २००० वर्षापूर्वीचे नारायणेश्वर. हेमांडपंथी बांधकाम यादव काळातील असावे. भूमिज स्वरूपातील हे मंदिर कलाकुसरीने भरलेले आहे. नारायणेश्वराच्या प्राचीन मंदिराचा आजूबाजूचा परिसर अत्यंत मोठा असून आजही थोडेबहुत प्राचीन शिल्प मंदिराच्या आवरात पडलेली आपल्याला पाहायला मिळतात. पुरंदर किल्य्याच्या पायथ्याशी असून मंदिरामागील चंद्रभागा नावाचा बारव किल्लीवरुन येणाऱ्या पाण्याने भरतो अशी श्रद्धा आहे.  मंदिराच्या आवारामध्ये हेमाडपंथी मंदिरांचे अनेक पुरावे मिळतात. नारायणेश्वर मंदिराच्या बाहेरील सभामंडप कोसळेला असून जुने यादवकालीन खांब बघावयास मिळतात. मंदिरासमोर एक सुंदर नंदीची मूर्ती आहे हि मूर्ती थोडीशी भंगलेली असून नंदिवरची कलाकुसर बघण्यासारखी आहे. संपूर्ण मंदिर हे २० खांबांवर उभारले गेले आहे. मंदिरातील खांब हे देखील कलाकुसर केलेले आहेत. मंदिरात त्रिपिंड पाहायला मिळते जे ब्रम्हा विष्णू महेश यांचे प्रतीक मानेल जाई.

राजमाता जिजाबाई यांनी  मंदिरात सुवर्णमुकुट अर्पण केल्याचे सांगितले जाते. तसेच या रेखीव मंदिरात प्राचीन शिलालेख असून. काही शिलालेख हे तेराव्या शतकातील म्हणजे यादव काळातील आहेत तर तिसरा शिलालेख हा थोडा प्राचीन आहे. मंदिराच्या खांबांवर विविध भारवाहक यक्ष बघायला मिळतात. तसेच या सुंदर मंदिराच्या आजूबाजूला आणि मंदिराच्या कळसापर्यंत कोरलेली विविध नर्तिकांची शिल्पे तसेच काही अप्सरांची शिल्पे पाहण्यासारखी आहेत.  या मंदिराबाबत काही ऐतिहासिक पुरावे जे मिळतात त्यामध्ये येथे पूर्वी एक विष्णूमंदिर होते जे आता नामशेष झालेले आहे या मंदिरामध्ये विष्णूची भव्य हरिहर रूपातील एक मूर्ती होती जी सध्या मुंबई येथील ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’ म्हणजेच आजचे ‘छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय’ येथे आहे. तसेच काही विष्णूच्या मूर्ती देखील मंदिराच्या मागच्या बाजूला कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात.

मंदिराच्या चारही बाजूंनी दगडी तटबंदी उभारली आहे. शेजारी श्रीदत्त मंदिर, बाजूला असणारा पुरंदर, आणि निसर्गाने मुक्तपने केलेली सौंदर्याची उधळण यामुळे हा परिसर प्रेक्षणीय आहे हे नक्की.

– Nitin Borawake

Leave a Comment