नारायणेश्वर मंदिर – नारायणपूर
नारायणपूर हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. याच गावात प्राचीन नारायणेश्वर मंदिर गतवैभवाची साक्ष देत आजही उभ आहे.
पुणे बंगलोर हायवरील कापुरहोळ गावापर्यंत आल्यानंतर हायवे सोडून कापूरहोळ – सासवड रस्ता पकडावा. याच रस्त्यावर साधारण ३.५ किमीवर बालाजीचे प्रसिध्द मंदिर आहे. पुढे १५ किमी वर नारायणपूर गाव आहे.
पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या प्रसिद्ध नारायणपूर गावात हे प्राचीन नारायणेश्वर मंदिर आहे. रस्त्याला लागुन असलेल्या नारायणेश्वर मंदिरा भोवती ६ फूट उंच तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या छोट्या दरवाजातून मंदिराच्या परीसरात प्रवेश करता येतो.
नारायणेश्वर मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिरा बाहेरील सभामंडप कोसळलेला आहे. या सभामंडपाचे खांब शाबूत आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी नंदीची मुर्ती आहे. मंदिराच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. व्दारपट्टीच्या मधोमध गणपती आहे. दरवाजाच्या दोनही बाजूस २ फूट उंचीच्या गणेश मुर्ती आहेत. त्यातील एक उजव्या सोंडेची गणेश मुर्ती आहे.
मंदिरात प्रवेश केल्यावर पितळेचा नंदी दिसतो. मंदिराच्या आतील सभामंडप ४ मोठ्या दगडी खांबांवर तोललेला दिसतो. या खांबांच्या मधोमध असलेल्या दगडी जमिनीवर मोठे कासव कोरलेले आहे.
मंदिरातील गाभार्याीच्या दरवाजा बाहेर दोन ५ फूटी अप्रतिम मुर्ती कोरलेल्या आहेत.हे दोन्ही शंकराचे गण आहेत. दिसायला या दोनही मुर्ती जरी सारख्या असल्या तरी त्यात एक छोटासा फरक आहे. एका मुर्तीच्या तोंडातून त्याचा सुळा बाहेर आल्याच दाखवण्यात आलेले आहे. सुळा बाहेर आला आहे तो “राक्षस” गण असून दुसरा “देव” गण आहे. गाभार्याहच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे.
गाभार्याषत उतरल्यावर काचेखाली दगडात कोरलेले एक मोठा वर्तुळाकार खड्डा दिसतो. त्याच्या आतमध्ये यांच्या तीन स्वयंभू पिंडी आहेत. त्यांना ब्रम्हा, विष्णू व महेश म्हणतात.
सभामंडपाच्या उत्तरेकडील दरवाजाच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षी आहे. नारायणेश्वर मंदिराचा आजूबाजूचा परिसर अत्यंत मोठा असून आजही थोडे बहुत प्राचीन शिल्प मंदिराच्या आवरात पडलेली आपल्याला पाहायला मिळतात.