नर्मदा व मराठे…
उत्तर भारत तथा आर्यावर्त व दक्षिणपथ यांची नॆसर्गिक सीमा म्हणजे नर्मदा नदी. आधुनिक साधने होईपर्यंत ही नदी अोलांडणे महाकठीण. भारताचे दोन भागच यामुळे झालेले. उत्तरेच्या चक्रवर्ती राजाने नर्मदा अोलांडून दक्षिणेत येणे याचा परिचय आपणास असतोच उदाहरणार्थ अशोक, समुद्रगुप्त , अर्थात अशोकास अोरीसा वा पुर्व विदर्भ मार्गे दक्शिणेत उतरणे सोपे होते. पण दक्षिणेच्या राजाने नर्मदा अोलांडणे याला ही महत्त्व आहे. पुलकेशीने दिग्विजयी हर्षाचा नर्मदेच्या काठी पराभव करून त्यास दख्खनमध्ये येण्यासाठी अटकाव केला व नर्मदा ही सीमारेषा केली. पुढं ती ओलांडून दक्षिणेच्या राष्ट्रकूटांनी कनॊज राजधानी केलेली व भारतभर राज्य केले. कनोज म्हणजेच जणू त्यावेळची दिल्ली. षष्ठ विक्रमादित्याने नर्मदा हीच उत्तर सीमा केलेली.
पुढे मुघलांच्या काळात, ते दोन मार्गे दक्षिणेत उतरत, इलिचपूरहून बाळापूर असा विदर्भ मार्ग वा बर्हाणपूर मार्गे खडकी म्हणजे अॊरंगाबाद. म्हणून उत्तरेस नर्मदा अोलांडून जाण्याचे याकाळात श्रेय शहाजीराजे यांना.बऱ्हाणपूर वेढ्यात अतिशय तरुण शहाजी महाराज होते काही प्रमाणे शहाजी महाराज अगदी पंजाबमध्ये गेले असावेत हे सूचवितात. पुढे शिवराय व मोगलांशी संघर्ष करताना शिवराय मलकापूर पर्यंत , जे बऱ्हांण पुरच्या दक्षिणेस आहे तेथे पोहोचल्याची नोंद आहे , तद्नंतर हंबीरराव मोहिते (नोव्हेंबर १६८०)यांनी बर्हाणपूर लुटले. राज्यावर आल्यावर संभाजी महाराजांनी तिकडे स्वारी केली, तेथे धुमाकूळ घातला, बादशहाचे साम्राज्यच हादरलं, त्यामुळे बिचारा दक्षिणेत उतरला; पण मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धात अॊरंगजेब दक्षिणेत आल्यावर राजाराम महाराजांना पित्याने दक्षिणेत केलेला राज्य विस्तार कामी आला पण पुन्हा जिंजीहून महाराष्ट्रात परतल्यावर त्यांनी उत्तरेस विस्तार योजना बनवली तेव्हा दस्तुरखुद्द ओरंगजेब येथेच होता. २२मार्च १६९८ ला राजाराम महाराज विशाळगडावर आले , मराठे त्यामुळे उत्तर दिशेने हालचाल करु लागले, बागलाणात येसाजी व खंडोजी दाभाडे, खानदेशात नेमाजी शिंदे, विश्वासराव पवार, वर्हाडात परसोजी भोसले, मध्य महाराष्ट्रात धनाजी, हणमंतराव निंबाळकर, दक्षिणेत घोरपडे असे सरदार प्रांत आक्रमत होते. बुर्हाणपरावर १६९८ला “नेमाजी शिंदे व धनाजी ” मोठी फॊज घेवून गेले. नर्मदा अोलांडून पुढे माळव्यात जायची त्यांची योजना होती. नेमाजी शिंदेने महापराक्रम केला. तिकडे कोकणात कान्होजी अांग्रे याने सिद्धी, पोर्तुगीज, मोगल यांच्या संयुक्त फॊजेस सपाटून हरविले व प्रदेश ताब्यात घेतला. स्वतः राजाराम महाराजांनी उत्तर कर्नाटक स्वारी केली.
—कृष्णा गेली नर्मदेपार—
“कृष्णा सावंत” एप्रिल १६९९ पासून वर्हाडात मोगलांना भिडू लागला. दसर्यानंतर राजाराम महाराज सुरत लुटण्यास बाहेर पडले, मध्य महाराष्ट्रात धुमाकुळ घातला मराठ्यांनी. अाॅक्टोबर १६९९ मध्ये कृष्णा सावंताने नर्मदा अॊलांडून तो माळव्यात घुसला, मुसलमान सुलतानापासूनच्या सगळ्या काळात म्हणजे १३व्या शतकापासूनच पहिल्यांदा आताच मराठ्यांनी नर्मदा अोलांडली असे मोगल बोलू लागले, माळवा गुजरात व दक्षिणेचे व वर्हाडी हे मोगली सुभे मराठ्यांच्या हाती मोकळे झाले, बादशहाची नुस्ती धांदल उडाली. तो मराठ्यांच्या प्रदेशात असताना त्यास हा करारी जबाब राजाराम महाराजांनी दिला.
पोस्ट साभार Neeraj Salunkhe सर 🚩